1 ऑगस्टच्या लाँचपूर्वीच Redmi 12 ची किंमत लीक; Redmi Watch आणि TV देखील येणार भारतात

Highlights

  • रेडमी 12 ची प्रारंभिक किंमत ₹9,999 असू शकते.
  • फोन 4GB RAM आणि 6GB RAM सह येऊ शकतो.
  • Redmi Watch 3 Active आणि Xiaomi Smart TV X Series देखील येणार.

Redmi 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल. कंपनी सतत हा फोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करत आहे. हा एक लो बजेट रेडमी मोबाइल फोन असेल ज्याची किंमत पण 10 हजारांच्या बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते. आज फोनच्या भारतीय लाँच पूर्वीच ह्याची किंमत लीक झाली आहे. रेडमी 12 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स चला जाणून घेऊया.

Redmi 12 इंडिया प्राइस (लीक)

टिपस्टर अभिषेक यादवनं दिलेल्या माहिती नुसारचा फोनचा 4GB RAM + 128GB storage मॉडेल भारतात 9,999 रुपये असेल. तर फोनचा दुसरा वेरेईन्ट 6GB RAM + 128GB storage सह सुमारे 11 हजारांच्या आसपास विकला जाऊ शकतो. ही लीक प्राइस आहे त्यामुळे अधिकृत किंमतीसाठी 1 ऑगस्टची वाट पाहावी लागेल.

फक्त Redmi 12 नाही येणार

रेडमी 12 चा लाँच इव्हेंट 1 ऑगस्टला दुपारी 12 वाजता सुरु होईल. ह्या दिवशी Redmi 12 सोबतच Redmi Watch 3 Active आणि Xiaomi Smart TV X Series देखील भारतात लाँच केली जाईल. इव्हेंट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाईल जो शाओमी रेडमीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह अधिकृत वेबसाइट आणि युट्युब चॅनेलवर लाइव्ह पाहता येईल.

रेडमी 12 स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल)

  • डिस्प्ले : ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.79 इंचाच्या फुलएचडी स्क्रीनसह सादर करण्यात आला आहे. स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 12 मीयुआय 14 आधारित वर चालतो. कंपनीनं हा मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसरसह सादर केला आहे. 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार करण्यात आला आहे. जोडीला माली-जी52 2ईईएमसी 2 जीपीयू देण्यात आला आहे.
  • मेमरी : ग्लोबल मार्केटमध्ये Redmi 12 4जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी, 8 जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी आणि 12 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरीसह येतो. तसेच ह्यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि कंपनीनं 18वॉट चा फास्ट चार्जर दिला आहे.
  • कनेक्टिव्हिटी : डेटा आणि कनेक्टिव्हिटीसाठी रेडमी 12 मध्ये तुम्हाला 4जी एलटीईसह ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here