आता फक्त 7999 रुपयांमध्ये खरेदी करा Redmi 12C, अशी आहे ऑफर

Highlights

 • Redmi 12C आता स्वस्तात विकत घेता येईल.
 • ऑफर फक्त फोनच्या बेस व्हेरिएंटवर आहे.
 • फोनमध्ये 6.71-इंच HD+ डिस्प्ले.

जर तुम्ही बजेट रेंजमध्ये स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर एक चांगली संधी आली आहे. रेडमीनं आपल्या बजेट स्मार्टफोन Redmi 12C ची किंमत कमी केली आहे. ही कपात मर्यादित कालावधीसाठी आहे. ह्या फोनचं मुख्य आकर्षण पाहता, ह्यात 6.71-इंचाचा HD डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी, मीडियाटेक हेलियो G85 प्रोसेसर, फिंगरप्रिंट सेन्सर आणि 50MP ड्युअल रियर कॅमेरा आहे. हा मॅट ब्लॅक, रॉयल ब्लू, मिंट ग्रीन आणि लव्हेंडर पर्पल कलरमध्ये उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया ह्या फोनवर मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती…

फक्त 7999 रुपयांमध्ये Redmi 12C उपलब्ध

 • Redmi 12C स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत कमी करण्यात आली आहे. बेस व्हेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो.
 • फोन यंदा एप्रिलमध्ये 8,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. सध्या हा अ‍ॅमेझॉन इंडियावर 8,799 रुपयांमध्ये लिस्टेड आहे. त्यामुळे थेट 200 रुपयांची बचत होते, तसेच ऑफरसह खरेदी केल्यास अतिरिक्त 800 रुपये वाचू शकतात.
 • जर Redmi 12C ICICI क्रेडिट कार्ड, HDFC क्रेडिट कार्ड किंवा HDFC डेबिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास 800 रुपयांची तत्काल सूट मिळू शकते.
 • विशेष म्हणजे सूट फक्त ईएमआय ऑर्डरवर लागू आहे. तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून देखील फोन विकत घेऊ शकता आणि अ‍ॅमेझॉन पे वर कॅशबॅक स्वरूपात 800 रुपयांची सूट मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही Redmi 12C 7,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करू शकता.
 • Amazon नं क्रेडिट/डेबिट कार्ड ऑफरसाठी 15 जून शेवटची तारीख सांगितली आहे.

Redmi 12C चे स्पेसिफिकेशन्स

 • डिस्प्ले : फोनमध्ये 6.71-इंच HD+ नॉच डिस्प्ले आहे, जो 500 निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 कंट्रास्ट रेशियो सह येतो.
 • प्रोसेसर : ह्यात मीडियाटेक हेलियो जी85 प्रोसेसर, एआरएम माली-जी52 एमसी2 जीपीयू आहे.
 • रॅम, स्टोरेज : फोनमध्ये 4GB/6GB रॅम, 64GB/128GB स्टोरेज आणि 3GB/5GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे.
 • रियर कॅमेरा : 50MP चा ड्युअल कॅमेरा
 • फ्रंट कॅमेरा : 5MP कॅमेरा
 • कनेक्टिव्हिटी : 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ड्युअल-सिम, ब्लूटूथ v5.0, GPS/AGPS, Beidou, Galileo, एक 3.5mm ऑडियो जॅक, मायक्रो USB पोर्ट.
 • बॅटरी : फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची बॅटरी दिली आहे आणि हा 10W चार्जिंगला सपोर्ट करतो.
 • ओएस : Android 12 वर आधारित MIUI 13 वर चालतो.
 • अन्य फीचर्स : IP52 रेटिंग, फिंगरप्रिंट सेन्सर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here