ChatGPT: तुमची नोकरी घालवू शकतो हा रोबॉट? गुगलपेक्षा फास्ट देतो प्रश्नांची उत्तरे, असं वापरा मोबाइलवर

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) रिसर्च कंपनी OpenAI नं AI बेस्ड चॅटबोट ChatGPT सादर केला आहे. हा चॅटबोट मशीन लर्निंग आणि GPT-3.5 नावाच्या भाषा मॉडेल (language model) चा वापर करून युजर्सनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो. सध्या हा चॅटबॉट लिखित स्वरूपात प्रश्नांची उत्तरे देतो. या AI आधारित चॅटबोटच्या मदतीनं अनेक प्रकारची काम करवून घेता येतात. या चॅटबोटच्या मदतीनं कम्प्युटर कोड देखील लिहता येईल. हा चॅटबोट अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. हा तुम्हाला जोक सांगू शकतो, तुमच्यासाठी कविता लिहू शकतो, निबंध, ई-मेल इत्यादी लिहू शकतो, गणित सोडवू शकतो आणि कायदेशीर सल्ला देखील देऊ शकतो. यामुळे शिक्षक, पत्रकार, लेखक आणि वकील आशा अनेकांची उपजीविका धोक्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला AI बेस्ड चॅटबोट ChatGPT अँड्रॉइड फोनमध्ये कसं वापरायचं हे सांगणार आहोत.

ChatGPT AI चॅटबोट अँड्रॉइड फोनवर कसं वापरायचं

ChatGPT सध्या Google Play Store आणि Apple च्या App Store वर उपलब्ध नाही. परंतु युजर्स सध्या ChatGPT चॅटबोट OpenAI च्या वेबसाइटवर अ‍ॅक्सेस करू कर सक . Android युजर्स हा चॅटबोट स्मार्टफोनमधील ब्राउजरच्या मदतीनं वापरू शकतात. इथे आम्ही तुम्हाला OpenAI चं अकाऊंट सेटअप कसं करायचं याची माहित देणार आहोत. तसेच अँड्रॉइड डिवाइसमध्ये ChatGPT AI चॅटबॉट कसा वापरायचा हे देखील जाणून घेऊया. हे देखील वाचा: सरकारी दरात मिळणार 5G ची मजा! Jio-Airtel चा बाजार बंद करण्यासाठी येतंय BSNL 5G; लाँच डेटचा खुलासा

स्टेप 1: तुमच्या डिवाइसमधील क्रोम ब्राउजर ओपन करा.

स्टेप 2: सर्वप्रथम OpenAI ची ऑफिशियल वेबसाइट ओपन करा. लिंकसाठी इथे क्लिक करा.

स्टेप 3: इथे सर्वात वर ChatGPT ट्राय बटन दिसेल, त्यावर टॅप करा.

स्टेप 4: लॉगइन पेज ओपन होईल, इथे तुम्हाला ईमेल अ‍ॅड्रेस आणि पासवर्डच्या मदतीनं अकाऊंट क्रिएट करा.

स्टेप 5. त्यानंतर तुम्हाला ईमेल अ‍ॅड्रेस व्हेरिफाय करावा लागेल.

स्टेप 6. त्यानंतर वेबसाइटवर तुम्हाला तुमचाअपना फोन नंबर व्हेरिफाय करावा लागेल.

स्टेप 7. त्यानंतर तुम्हाला तुमचं अकाऊंट सेटअप करावं लागेल आणि तुम्ही चॅटबॉटला प्रश्न विचारण्यासाठी मोकळे व्हाल.

अँड्रॉइड प्रमाणे iOS डिवाइससाठी सध्या ChatGPT चॅटबोटचं कोणतंही स्टेंडअलोन अ‍ॅप उपलब्ध नहीं. iPhone, iPad युजर्स ChatGPT AI चॅटबोटचा अ‍ॅक्सेस ऑफिशियल OpenAI वेबसाइटवरून मिळवू शकतात. हे देखील वाचा: खिशाला परवडणाऱ्या किंमतीत 200MP Camera; Redmi Note 12 Pro+ 5G च्या भारतीय लाँचची तारीख समजली

ChatGPT चॅटबोटच्या मर्यादा

तुम्हाला इंग्रजी किंवा हिंदीतून प्रश्न विचारावे लागतील ही सर्वात मोठी मर्यादा आहे. सध्या ChatGPT वर मराठी भाषा उपलब्ध नाही. या चॅटबॉट कडे 2021 पर्यंतचा डेटा उपलब्ध आहे, त्यामुळे त्यानंतर घडलेल्या घटना आणि जगातील बदल यांची माहिती बॉटकडे नाही. तसेच काही प्रश्नांची चुकीची उत्तरे देखील या बॉटनं दिल्याचं युजर्सनी निदर्शनास आणीन दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here