Redmi Smart Fire TV 4K सीरीज झाली लाँच, जाणून घ्या किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन

अलीकडेच Xiaomi X Pro QLED आणि Smart TV X 2024 च्या लाँचनंतर, ब्रँडने आता भारतात Redmi Smart Fire TV 4K ची घोषणा केली आहे. स्मार्ट टीव्ही परवडणाऱ्या किमतीत दोन वेगवेगळ्या आकारात येतो. यात बेझल-लेस डिझाईन, 60 हर्ट्स रिफ्रेश रेट, 4K एचडीआर डिस्प्ले, एमईएमसी तंत्रज्ञान, ड्युअल-बँड वाय-फाय, एअरप्ले 2 आणि बरेच काही आहे. चला , पुढे तुम्हाला Redmi Smart Fire TV 4K सीरीजची किंमत, फिचर्स आणि इतर माहिती देत आहोत.

Redmi Smart Fire TV 4K सीरीजची किंमत आणि विक्री तपशील

  • Redmi Smart Fire TV 4K सीरीजमध्ये 43 इंच आणि 55 इंचाचे दोन मॉडेल्स सामाविष्ट आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे 24,999 आणि 35,999 रुपये आहे.
  • तथापि, आयसीआयसीआय बँकेकडून 1,500 रुपयांच्या सवलतीनंतर स्मार्ट टीव्हीला 23,499 रुपये आणि 34,499 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.
  • विशेष बाब म्हणजे हे 18 सप्टेंबरपासून कंपनीच्या अधिकृत साईट आणि फ्लिपकार्टवरून खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.

Redmi Smart Fire TV 4K सीरीजचे स्पेसिफिकेशन आणि फिचर्स

Redmi Smart Fire TV 4K सीरीज 4K एचडीआर सह बेझल-लेस डिझाईनने सुसज्ज आहे, ने शार्प इमेज, चांगले कॉन्ट्रास्ट आणि उजळ रंगांसह तल्लीन पाहण्याचा अनुभव देते. यादरम्यान, एमईएमसी तंत्रज्ञान अस्पष्टता कमी करते आणि जलद गतीतील दृश्ये स्मूथ बनविण्यास मदत करते.

तर 43 इंचाचा व्हेरिएंट 24 वॉट स्पीकरने सुसज्ज आहे. 55 इंचाचे मॉडेल प्रभावी ऑडिओ आऊटपुटसाठी 30 वॉटचा स्पीकर सिस्टम पॅक करते. नुकत्याच जाहीर झालेल्या रेडमी स्मार्ट फायर टीव्ही 4K सीरीजमध्ये डॉल्बी ऑडिओ, डीटीएस-एचडी आणि डीटीएस व्हर्च्युअल:एक्स 3डी साऊंड इफेक्ट देखील समाविष्ट आहेत.

Redmi Smart Fire TV 4K सीरीज मध्ये 64-बिट क्वाड-कोर प्रोसेसरसह 2 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. हे स्मार्ट टीव्ही फायर टीव्ही ओएस 7 वर चालतात आणि वापरकर्त्यांना ॲप स्टोअरद्वारे 12,000 हून अधिक एप्लीकेशनमध्ये ॲक्सेस करण्याची परवानगी देतात. यात अलेक्सा व्हॉईस-सक्षम रिमोट देखील समाविष्ट आहे.

रेडमी स्मार्ट टीव्ही ब्लूटूथ v5.0 कनेक्टिव्हिटी देते आणि त्यात ड्युअल-बँड वाय-फाय, मिराकास्ट आणि एअरप्ले 2 सपोर्ट आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये PiP (पिक्चर-इन-पिक्चर) मोड देखील आहे. हे इतर तीन एचडीएमआय 2.1 पोर्ट आणि दोन यूएसबी पोर्टसह इतर पोर्टने सुसज्ज आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here