अ‍ॅमेझॉनवरून होईल Lava Blaze 5G ची विक्री

Cheapest 5G Phone in India च्या टॅगसह काही दिवसांपूर्वी Lava Blaze 5G समोर आला होता. लावा ब्लेज 5जी फोन IMC 2022 (India Mobile Congress) च्या मंचावरून संचार आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी सादर केला होता जो India’s first most affordable 5G smartphone म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असेल असं सांगण्यात आलं होतं. आज लावा ब्लेज 5जी भारतात ऑफिशियली लाँच झाला आहे. पुढे Lava Blaze 5G Price, Specifications आणि Sale ची माहिती देण्यात आली आहे.

Lava Blaze 5G Price

कंपनीनं Blaze 5G च्या किंमतीचा खुलासा केला नाही, परंतु या most affordable 5G phone ची किंमत Rs 10,000 आणि Rs 13,000 दरम्यान असू शकते, अशी चर्चा आहे. फोनचे ऑफिशियल फोटोज पाहून वाटत आहे की फोन blue आणि green कलर ऑप्शनमध्ये येईल. तसेच डिवाइस Amazon India वर सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी मोठ्या बॅटरीसह Nokia 2780 Flip 4G फोन लाँच; पाहा किंमत

Lava Blaze 5G Specifications

लावा ब्लेज 5जी स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. Lava Blaze 5G डिस्प्ले Widevine L1 सपोर्ट देण्यात आला जो ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग दरम्यान पण एचडी क्लॉलिटी व्हिज्युअल आउटपुट देईल.

Lava Blaze 5G अँड्रॉइड 12 सह बाजारात येईल. तसेच फोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आला आहे. हा लावा मोबाइल 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर चालतो. लावा ब्लेज 5जी स्मार्टफोन 4 जीबी रॅम सोबतच 3जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो त्यामुळे गरज असेल तेव्हा तुम्ही एकूण 7जीबी रॅमची पावर मिळवू शकता. फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हे देखील वाचा: वनप्लसला बाजारातून हद्दपार करण्याची तयारी; 200W Fast Charging सह येईल iQOO 11 Pro 5G फोन

फोटोग्राफीसाठी Lava Blaze 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. पावर बॅकअपसाठी या लावा स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here