जियो देत आहे 8जीबी 4जी डाटा मोफत, जाणून घ्या हे मिळवण्याची सोप्पी पद्धत

​रिलायंस जियो ने काही दिवसांपूर्वी आईपीएल फॅन्स साठी 251 रुपयांचा ‘क्रिकेट पॅक’ लॉन्च केला आहे. या पॅक मध्ये कंपनी 51 ​दिवसांच्या एकूण 102जीबी 4जी डाटा देत आहे. तसेच आता आपल्या ग्राहकांना भेट म्हणून जियो कस्टमर्सना 8जीबी 4जी डाटा फ्री देत आहे. या डाटा साठी तुम्हाला वेगळा रिचार्ज करण्याची गरज नाही किंवा कोणत्याही स्पर्धेत घेण्याची पण गरज नाही. जियो हा अतिरिक्त डाटा पूर्णपणे मोफत देत आहे.

काय आहेत फायदे बेनिफिट
– रिलायंस जियो ने कंपनी च्या ग्राहकांना एकूण 8जीबी 4जी डाटा दिला जात आहे
– हा 8जीबी डाटा 4 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो.
– 4 दिवसांसाठी जियो यूजर्सना रोज 2जीबी 4जी डाटा मिळेल.
– दिवसाचा 2जीबी डाटा संपल्यावर ग्राहक 64 केबीपीएस च्या स्पीड ने इंटरनेट वापरु शकतील.

कसे मिळवाल फायदे
– जियो कडून मिळणारे हे फायदे 8जीबी डाटा कंपनी कडून अॅडआॅन पॅक च्या रुपात दिले जात आहेत.
– जियो यूजर 100 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा कोणताही पॅक विकत घेतल्यावर हा 8जीबी डाटा त्या पॅक मध्ये मिळणार्‍या डाटा सोबत मिळेल.
– रिचार्ज साठी माय जियो अॅप किंवा डिजीटल वॉलेट तसेच आॅफलाईन रिचार्ज पण करू शकता.
– 8जीबी फ्री डाटा ची योग्यता माय जियो अॅप वर जाऊन चेक करु शकता.

सांगायची बाब म्हणजे नवीन अॅड आॅन पॅक फक्त डाटा बेनिफिट सह येतो, यात वॉयस कॉल किंवा एसएमएस ची अ​तिरिक्त सुविधा देण्यात आली नाही. पण कंपनी ने हे स्पष्ट केले नाही की हा 8जीबी डाटा वाली फ्री आॅफर कधी पर्यंत चालेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here