Jio 5G Welcome Offer: मोफत वापरायचं आहे का 5G? अशाप्रकारे करा इन्व्हाईटसाठी अप्लाय

Jio 5G Welcome Offer how to get the invite 5G plans 5g speed

Jio 5G Welcome Offer: Reliance Jio (रिलायन्स जियो) नं दसऱ्याच्या दिवशी आपली 5जी सेवा म्हणजे ‘जियो ट्रू 5जी’ (Jio True 5G Service) चं बीटा ट्रायल सुरु केलं आहे. सोबतीला कंपनीनं वेलकम ऑफर (Jio Beta Trial Welcome Offer) देखील सादर केली आहे. त्यामुळे कंपनी काही निवडक जियो युजर्सना इन्व्हिटेशन पाठवून आपली 5जी सर्व्हिस (5G Service) देत आहे. जर तुम्ही एक Jio युजर असाल आणि 5G स्मार्टफोन वापरात असाल तर आम्ही तुम्हाला इथे Jio 5G वेलकम ऑफर कशी मिळवायची हे सांगणार आहोत.

Jio 5G Welcome Offer म्हणजे काय?

Jio 5G वेलकम ऑफर पाहता Jio मोबाइल नंबर युजर्ससाठी हा ट्रायल बेस्ड प्रोग्राम आहे ज्यामुळे 5जी मोफत वापरण्याची संधी मिळते. परंतु कंपनी आपोआप काही जियो युजर्सना इन्व्हिटेशन पाठवून 5G सर्व्हिस वापरण्याची संधी देत आहे. हे देखील वाचा: Upcoming Smartphones October 2022: नवीन फोन घेण्याची घाई नको; दिवाळीच्या आधी बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतायत हे दणकट स्मार्टफोन

Jio 5G Launch Speed 1gbps Unlimited 5g Data 5g Sim

अशाप्रकारे मिळेल Jio 5G Welcome Offer invite

Jio 5G वेलकम ऑफर इन्व्हाईट मिळवण्यासाठी, तुम्ही Delhi, Mumbai, Kolkata आणि Varanasi चे रहिवाशी असणं आवश्यक आहे जिथे Jio 5G सेवा उपलब्ध आहे. तसेच तुमच्याकडे 5G-सक्षम डिवाइस असला पाहिजे. वेलकम ऑफर इन्व्हाईट (Welcome Offer invite) तुम्हाला MyJio App मध्ये मिळेल. चला जाणून घेऊया की कशाप्रकारे जियो 5जी वेलकम ऑफर मिळवण्यासाठी अप्लाय करता येईल.

Jio 5g Plan Price In India

Jio 5G Welcome Offer invite साठी असं करा अप्लाय

जर तुम्हाला इन्व्हाईट मिळालं नसेल तर Jio 5G चा वापर करण्यासाठी ‘वेलकम ऑफर’ टेस्टिंगमध्ये तुमचं नाव तुम्ही देऊ शकता.

Jio 5G Welcome Offer how to get the invite 5G plans 5g speed

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘MyJio’ अ‍ॅप ओपन करा
  • त्यानंतर वरच्या बाजूला ‘जियो वेलकम ऑफर’ बॅनर दिसेल. जर कोणताही पर्याय नसेल तर त्याचा अर्थ असा की तुमच्या मोबाइल नंबरसाठी इन्व्हाईट अजूनपर्यंत आलं नाही.
  • त्यानंतर, ‘आय एम इंट्रेस्टेड’ बटनवर क्लिक करा
  • नेक्स्ट स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘Done’ वर टॅप करा
  • बॅकएन्डमध्ये, Jio तुम्ही जिथे आहात तिथे 5G उपलब्धतेची माहिती घेईल, तसेच तुमच्या स्मार्टफोनची 5G कम्पॅटिबलिटी टेस्ट करेल.
  • ही प्रक्रिया एकदा पूर्ण झाली की, तुमची निवड 5G टेस्टिंगसाठी करण्यात आली आहे की नाही, याची माहिती देण्यात येईल.

वेलकम ऑफरसाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या ग्राहकांना वास्तवात 5G कधी मिळेल, हे निश्चित सांगता येत नाही. Jio नं आधीच सांगितलं होतं की ते दिवाळीपर्यंत ही सेवा सुरु करण्याची योजना बनवत आहे. किंवा सुरुवातीला इन्व्हिटेशन-आधारित बीटा टेस्टरकडून फीडबॅक घेऊन त्यानंतर पुढील महिन्यात पूर्णपणे Jio 5G रोलआऊट केलं जाऊ शकतं. हे देखील वाचा: New 5G Smartphone Guide: 5G नेटवर्क दारात आलं म्हणून घाई नको; नवीन 5G स्मार्टफोन घेताना या 7 गोष्टींची काळजी घ्या

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here