टेलीकॉम क्षेत्रात सर्वात मोठी आणि लोकप्रिय कंपनी बनलेली रिलायंस जियो गेल्या काही दिवसांपासून आपल्या ग्राहकांना झटके देत आहे. यावर्षी कंपनीने आपले अनेक पॉप्यूलर प्लान बंद करून युजर्सना नाराज केले आहे. पुन्हा एकदा बातमी समोर आली आहे, ज्यानुसार जियोने आपला 222 रुपयांचा प्लान 33 रुपयांनी महाग केला आहे. रिलायंस जियोने यावर्षी जून मध्ये युजर्ससाठी नवीन Disney+ Hotstar VIP ऍड-ऑन पॅक मध्ये हा प्लान लॉन्च केला होता.
या ऑफरच्या जागी अजून एक टॅरिफ वाउचर लिस्ट आहे, ज्याची किंमत 255 रुपये आहे. असे वाटत आहे कि कंपनीने चुपचाप 222 रुपयांचा प्लान त्याच बेनिफिट्स सह 33 रुपयांनी महाग केला आहे. या प्लान मध्ये फ्री Disney+ Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन दिले जात आहे.
MyJio ऍप मध्ये नवीन प्राइस सह हा स्पेशल टॅरिफ दिसत आहे. युजर्स नवीन किंमतीसह हा रिचार्ज करू शकतात. जियोचा हा प्रीपेड प्लान 15GB हाई-स्पीड अनलिमिटेड डेटा सह येतो. हा डेटा संपल्यावर स्पीड कमी होऊन 64kbps राहतो.
या प्लान मध्ये Disney+ Hotstar VIP एक वर्षाचे फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटा व्यतिरिक्त कोणताही लाभ मिळणार नाही. हा एक ऍड-ऑन पॅक आहे, ज्याचा ज्याचा वापर तुम्ही तुमच्या चालू प्लान सोबत करू शकता.
काही दिवसांपूर्वी टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी म्हणजे TRAI ने आपल्या लेटेस्ट रिपोर्ट मध्ये वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीच्या पहिल्या महिन्याचे आकडे शेयर केले होते, ज्यात सर्व दूरसंचार कंपन्यांच्या युजर्सची संख्या सांगितली आहे. या रिपोर्टच्या माध्यमातून समोर आले आहे कि जुलै मध्ये Reliance Jio च्या युजर्सची संख्या 40 कोटींच्या पार गेली आहे. या संख्येपर्यंत आजपर्यंत भारतात कोणतीही कंपनी पोहोचली नाही. रिलायंस जियो 40 कोटी सब्सक्राइबच्या या आकड्याला स्पर्श करणारी पहिली कंपनी बनली आहे.
ट्रायच्या रिपोर्टनुसार जुलै मध्ये Jio कंपनीने आपल्या नेटवर्क वर 35 लाखांपेक्षा जास्त नवीन युजर्स जोडले आहेत, हे नवीन ग्राहक जोडल्यामुळे जियोच्या एकूण सब्सक्राइबर्सची संख्या 40 कोटींच्या पार गेली आहे. नवीन ग्राहकांमुळे देशाच्या टेलीकॉम बाजारात रिलायंस जियोचा मार्केट शेयर पण वाढून 35 टक्क्यांच्या वर गेला आहे.















