Jio चे बंपर प्लान्स, 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या अधिक माहिती

भारतातील नंबर वन टेलीकॉम ब्रँड Reliance Jio कडे सध्या सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज उपलब्ध आहेत. ग्राहक आपल्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त किंमतीचे प्लान्स निवडू शकतात. डेटा बद्दल बोलायचे झाले तर रिलायंस जियो प्रति दिन 1 जीबी पासून 3जीबी डेटा असलेले पॅक ऑफर करते. पण या प्लान्स मध्ये मिळणारी वैधता आणि फायदे वेगवेगळे आहेत. आज आम्ही तुम्हाला Jio च्या त्या बेस्ट प्लान बाबत माहिती देणार आहोत जे रोज 3जीबी डेटा देतात. जियो कडे 349 रुपये, 401 रुपये आणि 999 रुपयांचे प्रीपेड प्लान्स आहेत, ज्यात 3जीबी डेटा सह अनिलमिटेड कॉल्स पण मिळतात.

349 रुपयांचा प्लान

सर्वात आधी जियोच्या 349 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर या प्रीपेड रिचार्ज मध्ये यूजर्सना 28 दिवसांची वैधता मिळते. तसेच या पॅक मध्ये रोज यूजर्सना 3 जीबी हाई-स्पीड डेटा मिळेल. याचा अर्थ असा कि एकूण या पॅक मध्ये 84जीबी डेटा सब्सक्राइबर्सना मिळेल. डेटाची मर्यादा संपल्यावर पण 64Kbps स्पीडने यूजर्स डेटा वापरू शकतात. तसेच या प्रीपेड पॅक मध्ये जियो-टू-जियो नेटवर्क वर अनलिमिटेड आणि इतर नेटवर्क वर कॉलिंगसाठी 1,000 मिनट्स दिले जातील. इतकेच नव्हे तर या पॅक मध्ये ग्राहकांना रोज 100 एसएमएस आणि जियो ऍप्सचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.

401 रुपयांचा प्लान

349 रुपयांच्या प्लान प्रमाणेच या प्लानची वैधता 28 दिवस आहे. तसेच या प्लान मध्ये पण रोज 3जीबी डेटा मिळतो. पण कंपनी या प्लान मध्ये एकूण 84जीबी डेटा सह 6जीबी डेटा एक्स्ट्रा देते. आशाप्रकारे 401 रुपयांचा रिचार्ज पॅक सब्सक्राइबर्सना एकूण 90 जीबी डेटा मिळवून देतो. तसेच या प्रीपेड पॅक मध्ये जियो-टू-जियो नेटवर्क वर अनलिमिटेड आणि इतर नेटवर्क वर कॉलिंगसाठी 1,000 मिनट्स दिले जातील. इतकेच नव्हे तर या पॅक मध्ये ग्राहकांना रोज 100 एसएमएस आणि जियो ऍप्सचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. या प्लानची खास बाब अशी आहे कि यात Disney+ Hotstar चे एक वर्षाचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.

999 रुपयांचा प्लान

जियोच्या 999 रुपयांच्या रिचार्ज पॅकची वैधता 84 दिवस आहे. या पॅक मध्ये पण यूजर्सना रोज 3 जीबी डेटा मिळेल. म्हणजे या पॅक मध्ये एकूण 252 जीबी डेटा दिला जात आहे. ग्राहक रोज मिळणारा डेटा संपल्यावर 64Kbps स्पीडने इंटरनेट वापरू शकतात. तसेच जियो नेटवर्क वर अनलिमिटेड आणि इतर नेटवर्क वर कॉलिंगसाठी 3000 मिनट्स मिळतील. या पॅक मध्ये रोज 100 एसएमएस मोफत मिळतात. तसेच जियो ऍप्सचे सब्सक्रिप्शन पण फ्री दिले जात आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here