जियो बनवणार देशी शॉपिंग साइट, अमेझॉन-फ्लिपकार्टला मिळेल टक्कर

रिलायंस जियो आल्यामुळे भारतीय टेलीकॉम बाजरीची दिशा बदलली आहे आणि हि बाब कोणीच नाकारू शकत नाही. जियो ने मोफत डेटा आणि वॉइस कॉल देऊन लाखो लोकांपर्यंत इंटरनेटची सेवा पोहचवली आहे. टेलीकॉम इंडस्ट्रीच्या जुन्या कंपन्यांना टक्कर दिल्यानंतर जियो आपल्या गीगाफाइबर सर्विसने ब्रॉडबँड क्षेत्रात पॉल टाकणार आहे. तसेच आता मुकेश अंबानी यांनी अजून एक मोठी घोषणा केली आहे कि कंपनी आता लवकरच आपल्या स्वतःच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हजे जियोची शॉपिंग वेबसाइट पण सुरु करणार आहे.

रिलायंस जियोचे मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी अधिकृत घोषणा केली आहे कि जियो लवकरच आपली स्वतःची शॉपिंग वेबसाइट सुरु करणार आहे. हि वेबसाइट अमेझॉन व फ्लिपकार्ट प्रमाणे असेल जी एकाच प्लॅटफॉर्म वर अनेक प्रकारच्या वस्तू विकेल. जियोच्या या नवीन योजनेमुळे देशातील अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील व मिंत्रा सारख्या शॉपिंग साइट्सना चांगलीच टक्कर मिळणार आहे.

जियो तर्फे बोलताना मुकेश अंबानी ने सांगितले कि जियो लवकरच आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची सुरवात करेल. हि वेबसाइट रिलांयस रिटेल आणि रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआईएल) च्या ऑफलाईन रिटेल सहयोयोगींद्वारा चालवली जाईल. या नवीन प्रोजेक्टची सुरवात गुजरात पासून केली जाईल. मुकेश अंबानी नुसार जियो ई-कॉमर्स वेबसाइट मुळे गुजरात मध्ये 12 लाखापेक्षा जास्त लघु उद्योगांना, दुकानदारांना तसेच रिटेलर्सना लाभ मिळेल.

जियो ई-कॉमर्स वेबसाइट ‘ऑफलाइन-टू-ऑनलाइन’ च्या तत्वावर काम करेल जी येत्या 12 ते 18 महिन्यांत पूर्णपणे सुरु होईल. हि डिजीटल प्लॅटफॉर्म जियो नेटवर्क तसेच रिलायंसशी जोडल्या गेलेल्या उद्योगांच्या मदतीने चालेल. स्थानिक दुकानातील तसेच लघु उद्योगांद्वारा निर्मित सामान जियोच्या या शॉपिंग साइट वर विकला जाईल. प्रत्येक छोटामोठा दुकानदार या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपले सामान दूरवर विकू शकेल .

प्राप्त माहितीनुसार छोटे दुकान व रिटेल स्टोर्स रिलायंस जियो द्वारा कंपनीच्या होलसेल स्टोर्स ​अंतर्गत सामील केले जातील. तसेच या दुकानांत सामान डिजीटली विकले जाईल. आशा आहे कि स्थानिक वस्तूंसोबतच जियो ई-कॉमर्स वेबसाइट वर प्रत्येक कॅटेगरी व ब्रँडच्या वस्तू पण खरेदीसाठी उपलब्ध होतील. ​जियोच्या या घोषणेनंतर सामान्य लोक व जियो फॅन्स खुश आहेत पण ​अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांना चांगली टक्कर मिळू शकते हे निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here