Reliance Jio लवकरच लॉन्च करेल आपला दमदार स्मार्टफोन, किंमत असेल 8000 रुपयांपेक्षा पण कमी!

Reliance Jio स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची बातमी अनेक दिवसांपासून इंटरनेट वर येत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार कंपनी 4G फीचर फोन युजर्सना स्मार्टफोन्स वर नेण्याची तयारी करत आहे. तसेच आता एक रिपोर्ट समोर आली आहे, ज्यात सांगण्यात आले आहे कि टेलीकॉम कंपनी रिलांयस जियो लवकरच देशात स्मार्टफोन निर्माता वीवोच्या पार्टनरशिप मध्ये एक एक्सक्लूसिव स्मार्टफोन्स लॉन्च करेल. कंपनी आपल्या स्मार्टफोन्स सह OTT प्लॅटफॉर्मचा फ्री अ‍ॅक्सिस आणि वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट सारख्या अनेक ऑफर्स पण देऊ शकते.

रिलायंस जियो अश्याप्रकारे वोडाफोन आयडिया आणि भारती एयरटेल सारख्या कंपन्यांकडून जास्तीत जास्त युजर्सना पण आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. इकनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार रिलायंस जियो लोकल मैन्युफैक्चरर जसे कार्बन, लावा व्यतिरिक्त काही चीनी ब्रँडस सोबत बोलणी करत आहे.

रिपोर्ट मध्ये या संबंधित लोकांचा हवाला देत ET ने सांगितले आहे कि कंपनी हा स्मार्टफोन 8 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. अजूनतरी कंपनीने अधिकृत माहिती दिली नाही.

5G स्मार्टफोन

Reliance Jio ने अधिकृतपणे घोषणा केली आहे की कंपनीने 5G नेटवर्कची तयारी केली आहे आणि भारतात 5जी स्पेक्ट्रम उपलब्ध होताच सेवा सुरू देखील होईल. आशा आहे कि 2021 पर्यंत भारतात 5जी स्पेक्ट्रम लिलावसाठी उपलब्ध होईल आणि त्यानंतर सर्विस पण सुरु होईल. 5जी ची घोषणा करत अंबानीने स्पष्ट केले कि जियो 5जी नेटवर्क पूर्णपणे पूरी ‘मेड इन इंडिया’ असेल. त्याचबरोबर त्यांनी Google सह मिळून आपला स्वतःचा 5G Smartphone बनवेल. कंपनीने फोनचे नाव सांगितले नाही पण एवढे मात्र सांगितले की हा फोन Made In India असेल.

सोर्स

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here