Samsung Galaxy A21s अखेरीस भारतात लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय मार्केटच्या आधी फोन लंडन मध्ये सादर केला गेला आहे. तसेच हा Galaxy A21 चा नवीन वर्जन आहे, जो एप्रिल मध्ये लॉन्च केला गेला होता. सॅमसंग गॅलेक्सी ए21एस ची पाहता स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 5,000 एमएएच बॅटरी सह सादर केला गेला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए21एस मिड-टायर स्मार्टफोन आहे जो अनेक खास स्पसिफिकेशन सह येतो. चला जाणून घेऊया फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती.
डिजाइन
Samsung Galaxy A21s चा लुक पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा होल डिस्प्लेच्या वर डाव्या कोपऱ्यावर आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे जिच्या खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा आहे. हा कॅमेरा सेटअप वर डावीकडे चौकोनी आकारात आहे जिथे कॅमेरा लेंस L-शेप मध्ये आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ओवल शेप मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर सह पावर बटण आहे. फोनच्या लोवर पॅनल वर 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळेल.
पावरफुल कॅमेरा
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A21s क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A21s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. गॅलेक्सी ए21एस एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह येतो जो सॅमसंग वनयूआई वर चालतो. भारतात हा फोन सॅमसंगच्या एक्सनॉस 850 चिपसेट वर लॉन्च झाला आहे.
भारतात फोन दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे. Samsung Galaxy A21s च्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दूसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. दोन्ही वेरिएंट्स मध्ये कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.
Samsung Galaxy A21s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए21एस मध्ये 15वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत
गॅलेक्सी ए21एस च्या किंमतीची माहिती काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सने एक्सक्लूसिवली दिली होती. आता कंपनीने Samsung Galaxy A21s चा 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपये आणि 6GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. फोन आज पासून सर्व रिटेल स्टोर्स वर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. डिवाइस ब्लू, वाइट आणि ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.















