50MP Selfie कॅमेरा, 16GB RAM आणि 125W चार्जिंगसह लाँच झाला हा पावरफुल फोन, स्टाईल पण आहे खास

Motorola ने आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत चीनमध्ये नवीन मोबाईल Moto X50 Ultra लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 16GB RAM, 1TB Storage आणि Snapdragon 8s Gen 3 च्या ताकदीसह आहे. सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी तसेच कमालचा कॅमेरा असणारा हा फोन मोटो एक्स 50 अल्ट्राचे स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Moto X50 Ultra चे स्पेसिफिकेशन

  • 6.7 इंचाचा ओएलईडी 144 हर्ट्झ डिस्प्ले
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3
  • 16 जीबी रॅम + 1 टीबी स्टोरेज
  • 50 एमपी+50 एमपी+64 एमपी बॅक कॅमेरा
  • 50 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
  • 4,500 एमएएच बॅटरी
  • 125 वॉट टर्बोपावर चार्जिंग
  • 50 वॉट वायरलेस चार्जिंग

डिस्प्ले: मोटो एक्स 50 अल्ट्रा 2712 x 1220 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन OLED पॅनलवर बनली आहे जी 144Hz रिफ्रेश रेटवर चालते. डिस्प्लेवर HDR 10+ आणि 2500nits पिक ब्राईटनेस सारखे फिचर्स पण मिळतात.

प्रोसेसर: Moto X50 Ultra अँड्रॉईड 14 ओएसवर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम Snapdragon 8s Gen 3 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3GHz क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Adreno 735 GPU आहे.

मेमरी: चीनी मार्केटमध्ये मोटो एक्स 50 अल्ट्रा 12GB RAM आणि 16GB RAM वर लाँच करण्यात आला आहे. हे मॉडेल 256 जीबी स्टोरेज, 512 जीबी स्टोरेज तसेच 1 टीबी स्टोरेजला सपोर्ट करतात. हा नवीन मोटोरोला स्मार्टफोन LPDDR5X RAM + UFS 4.0 Storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी मोटो एक्स 50 अल्ट्रा च्या बॅक पॅनलवर एफ/1.6 अपर्चर असलेला 50MP OIS मेन सेन्सर देण्यात आला आहे जो 50MP ultra-wide Samsung JN1 सेन्सर आणि 64MP 3X portrait telephoto Omnivision OV64B लेन्स सह मिळून चालतो.

फ्रंट कॅमेरा: सेल्फी काढणे, व्हिडिओ कॉलिंग करणे तसेच रिल्स बनविण्यासाठी Moto X50 Ultra 50MP Selfie Camera ला सपोर्ट करतो. ही एफ/1.9 अपर्चरवर काम करणारी लेन्स आहे जी auto focus टेक्नॉलॉजीसह आहे.

बॅटरी: पावर बॅकअपसाठी मोटो एक्स 50 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. या मोठ्या बॅटरी सोबत हा फोन 125W TurboPower फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग तसेच 5W रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो.

इतर फिचर्स: Moto X50 Ultra IP68 रेटिंगसह आणला गेला आहे. या फोनमध्ये 3 मायक्रोफोन आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस स्टीरियो स्पिकर सारखे फिचर्स मिळतात. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi 7, Bluetooth 5.4 आणि NFC सारखे पर्याय आहेत.

Moto X50 Ultra ची किंमत

मोटो एक्स50 अल्ट्रा स्मार्टफोनचा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 3999 yuan मध्ये लाँच झाला आहे. ही किंमत भारतीय चलनानुसार 46,000 रुपयांच्या आसपास आहे. तसेच मोबाईलच्या 12GB + 512GB मॉडेलला 4299 yuan म्हणजे जवळपास 50,500 रुपयांमध्ये तसेच सर्वात मोठा व्हेरिएंट 16GB + 1TB ला 4699 yuan (जवळपास 54,500 रुपये) मध्ये लाँच करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here