Samsung Galaxy A21s असले कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, दोन स्टोरेज वेरिएंट आले समोर

Samsung टेक विश्वाच्या बातम्यांमध्ये जवळपास रोज येत आहे. फ्लॅगशिप फोन लॉन्च असो किंवा मीड बजेट मोबाईलचे पदार्पण, सॅमसंग सतत काही ना काही तरी नवीन करत आहे. या व्यतिरिक्त लीक्स न्यूज मध्ये पण सॅमसंगचे नाव सगळीकडे दिसत आहे. यातच आज पुन्हा सॅमसंग संबंधित एक मोठी बातमी आली आहे. ताज्या लीक मध्ये Samsung Galaxy A21s चे नाव समोर आले आहे. या लीक मध्ये फक्त ‘गॅलेक्सी ए सीरीज’ च्या नवीन फोनची माहिती देण्यात आलेली नाही तर सोबत Galaxy A21s चे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

Samsung Galaxy A21s संबंधित हि बातमी सॅममोबाईलने आपल्या एक्सक्लूसिव न्यूज मध्ये दिली आहे. सॅममोबाईलने सांगितले आहे कि सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन स्मार्टफोन वर काम सुरु केले आहे आणि कंपनी हा डिवाईस Samsung Galaxy A21s नावाने बाजारात आणेल. रिपोर्टनुसार गॅलेक्सी ए21एस चा मॉडेल नंबर SM-A217F असेल. आपल्या रिपोर्ट मध्ये वेबसाइटने असा अंदाज व्यक्त केला आहे कि कदाचित सॅमसंग गॅलेक्सी ए21एस ग्लोबल मंचाच्या कोणत्याही मार्केट्स मध्ये लॉन्च न होता कंपनी निवडक बाजारांमध्ये हा फोन Samsung Galaxy A21s नावाने सादर करेल.

Samsung Galaxy A21s

समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए21एस चे काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आली आहे. वेबसाइटनुसार हा मोबाईल एक लो बजेट फोन असेल जो एंट्री लेवल स्पेसिफिकेशन्स सह येईल. रिपोर्टनुसार Galaxy A21s दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात बेस मॉडेल 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते.

Samsung Galaxy A21s चा रियर कॅमेरा सेटअप किती सेंसर्स सह येईल हे समजले नाही पण रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी ए21एस च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये एक मॅक्रो सेंसर पण देण्यात येईल जो 2 मेगापिक्सलचा असेल. तसेच सॅमसंग गॅलेक्सी ए21एस ब्लू, ब्लॅक, व्हाईट आणि रेड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. Samsung Galaxy A21s इंडियन मार्केट मध्ये येईल कि नाही हे स्पष्ट झाले नाही.

Samsung Galaxy A51 – Galaxy A71

Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 च्या इंडिया लॉन्च बद्दल द मोबाईल इंडियन वेबसाइटने दावा केला आहे कि सॅमसंग आपले हे दोन्ही स्मार्टफोन फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात लॉन्च करेल. या रिपोर्ट मध्ये फोनच्या लॉन्चची तारीख समजली नाही किंवा लॉन्चच्या नंतर किती दिवसांनी हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात सेलसाठी उपलब्ध होतील हे देखील समजले नाही. वेबसाइटच्या रिपोर्टनुसार या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत इंडियन मार्केट मध्ये 30,000 रुपयांपेक्षा कमी असेल. विशेष म्हणजे 91मोबाईल्सला आपल्या सूत्रांकडून माहिती मिळाली होती कि Samsung Galaxy A51 भारतीय बाजारात 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल तर Galaxy A71 ची किंमत 29,990 रुपये असेल.

Samsung India ने कपंनी माइक्रोसाइट वर ‘Galaxy A’ नावाने नवीन प्रोडक्ट पेज बनवले आहे. कंपनीने या प्रोडक्ट पेज वर Awesome is for everyone लिहिले आहे. प्रोडक्ट पेज वर कंपनीने स्मार्टफोनचा फोटो पण शेयर केला आहे ज्यात फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे. फोटो मध्ये पंच-होल डिस्प्ले दाखवण्यात आला आहे ज्यात होल डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मधोमध आहे. तसेच प्रोडक्ट पेज वर रियर कॅमेरा प्लेटमेंट पण दाखवण्यात आली आहे जी L-शेप मध्ये आहे. या पेज वर फोन मध्ये Awesome Camera, Awesome Screen आणि Awesome Battery असल्याचे सांगण्यात आले आहे. सॅमसंगने अधिकृतपणे गॅलेक्सी ए51 आणि ए71 स्मार्टफोनसाठी ‘Notify Me’ बटण आणेल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here