जर तुम्ही मिड रेंज सेग्मेंट मध्ये एक चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे Samsung Galaxy A71 बद्दल जाणून घेण्याची. सध्या मिड रेंज सेग्मेंट मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व स्मार्टफोन मध्ये याला बेस्ट म्हणता येईल. या फोन मध्ये अनेक चांगले फीचर्स उपलब्ध आहेत जे याला दुसऱ्या फोन्सच्या तुलनेत पुढे नेऊन ठेवतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल कि कोणत्या अश्या गोष्टी आहेत ज्यामुळे हा फोन वेगळा ठरतो? तर Galaxy A71 मध्ये अश्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मोठा परिणाम करतात. आता पर्यंत तुम्ही याच्या स्टाइलिश, डिजाईन, मोठी बॅटरी लाइफ, शानदार क्वाड कॅमेरा आणि दमदार परफॉर्मन्सने प्रभावित झाला असाल पण यात अनेक असे मजेदार फीचर्स पण आहेत जे या प्राइस रेंज मध्ये या फोनला बेस्ट फोन बनवतात. चला एका नजर टाकूया त्या फीचर्स वर.
Samsung Pay सह करा स्विफ्ट आणि सुरक्षित पेमेंट
आजकाल POS टर्मिनल्सवर स्मार्टफोन आधारित पेमेंट फक्त NFC च्या माध्यमातून केले जात होते, Samsung Pay एक क्रांतिकारी सेवेच्या स्वरूपात समोर आला, खासकरून त्या बाजारांमध्ये जिथे NFC-enabled टर्मिनल्स उपलब्ध नव्हते. पेमेंटची हि नवीन टेक्नॉलॉजी Galaxy A71 मध्ये पण उपलब्ध आहे जिथे तुम्ही MST च्या माध्यमातून कोणत्याही खरेदीचे पेमेंट आपल्या फोन वरून करू शकता. याचा अर्थ असा कि, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा वापर कोणत्याही अश्या टर्मिनल वर करू शकता, जिथे तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड सुरक्षितरित्या स्वाइप करण्यासाठी POS मशीन उपलब्ध आहे. सर्वात खास बाब म्हणजे Samsung Pay अशाप्रकारची सुविधा देणारे एकमेव सर्विस आहे.
कारण यात माहिती टोकनाइज्ड फॉरमॅट मध्ये ठेवली जाते आणि मग POS वर पाठवली जाते, त्यामुळे जेव्हा तुम्ही Samsung Pay चा वापर करता तेव्हा सुनिश्चित करतो कि तुमच्या कार्डची सर्व माहिती सुरक्षित राहील. Galaxy A71 मध्ये याचा वापर सोप्पा पण आहे. होम बटन वर स्वाइप करून तुम्ही Samsung Pay मध्ये स्टोर केल्या गेलेले सर्व कार्ड ऍक्सेस करू शकता. तसेच जेव्हा तुम्हाला एखादे पेमेंट करायचे असेल तेव्हा पेमेंट टर्मिनल वर फोन टॅप करण्याआधी तुम्हाला फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन देऊन तो ऍक्टिव्ह करावा लागेल. जर तुम्हाला वाटत असेल कि इतकी सुरक्षा पुरेशी नाही तर तुम्हाला सांगू इच्छितो कि यात Samsung Knox ची सिक्योरिटी आहे जी संभावित धोक्यासाठी तुमच्या फोन वर नजर ठेवते. चांगली बाब अशी कि जर तुमचा फोन हरवला तर तुम्ही Samsung Pay रिमोटली डिएक्टिवेट करू शकता. इतकेच नव्हे तर जर कधी तुमचे कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर ‘Find My Mobile’ सर्विस मध्ये जाऊन एकदाच तुम्ही सर्व कार्ड ब्लॉक करू शकता.
Alive Intelligence फीचर्स खास तुमच्यासाठी
Make for India कार्यक्रमच्या अंतर्गत एक पाऊल टाकत Samsung ने अनेक खास Alive Intelligence फीचर्स सादर केले आहेत. जसे कि Useful cards, Multilingual typing, Finder & Smart crop. हे नवीन फीचर्स Gen Z वापरकर्त्यांसाठी खूप उपयोगी आहे ज्यांना फास्ट आणि आर्गेनाइज्ड लाइफ हवी आहे.
Useful Cards फीचर्स तुमच्या इनबॉक्स मधून महत्वपूर्ण मेसेजेसची ओळख करून ते चांगल्या आणि योग्य पद्धतीने कार्ड स्टाइल मध्ये व्यवस्थित करतो. यामुळे फक्त तुम्हाला इनबॉक्स सुव्यवस्थित होतो तसेच सहज वापरण्यालायक पण बनतो, त्यामुळे कोणताही महत्वपूर्ण मेसेज नजरेतून सुटत नाही. उदाहरणार्थ जर तुम्ही ऑनलाइन वरून काही ऑर्डर केले आणि त्या संबंधित आर्डर ट्रॅक करण्यासाठी एखादा मेसेज आला, तर हा फीचर फक्त तुमचे मेसेज ऑर्गेनाइज करत नाही तर तुम्हाला इन्स्टंट कॉल बटन उपलब्ध करून देण्यास पण मदत करेल, ज्यामुळे तुम्ही सहज आर्डर ट्रॅक करू शकाल. यामुळे माहिती मॅन्युअली शोधावी लागत नाही.
Multilingual typing, Alive Intelligence चा अजून एक मजेदार फीचर आहे. Multilingual keyboard मेसेजिंग फीचर क्षेत्रीय भाषा, ज्यांचा तुम्ही तुमच्या फोन मध्ये वापर करता, त्याच अंदाजात शब्द प्रडिक्ट करतो आणि तुम्हाला शब्द सुचवतो. यामुळे तुम्ही जसे बोलता त्याप्रमाणे मेसेजिंग पण करू शकता. Alive Intelligence मध्ये पावरफुल सर्च बार पण आहे ज्याला Finder चे नाव देण्यात आले आहे. याच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट तुमच्या आवडीच्या इंटरनटेनमेंट, फूड डिलिवरी, ट्रॅव्हल आणि ई-कॉमर्स ऍप मध्ये इथूनच थेट सर्च करू शकता. ते ऍप ओपेन करून सर्च करण्याची गरज नाही. शेवटी यातील अजून एका खास फीचरचा उल्लेख कारेन जयचे नाव आहे Smart Crop; जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट घेता तेव्हा हा स्वतःहून महत्वपूर्ण एरिया शोधून मार्क करेल. ज्यामुळे तुम्ही एका क्लिक मध्ये तो Crop करू शकाल.
शानदार परफॉर्मन्स आणि मोठी बॅटरी लाइफ
Samsung Galaxy A71 2.2GHz क्लॉक स्पीडच्या ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 730 चिपसेट सह येतो जो खात्रीशीररित्या यूजर्सना लॅग फ्री आणि फास्ट परफॉर्मन्स देण्याचे काम करतो. फोन मधील Adreno 618 GPU आणि Game Booster ची जोडी ग्राफिक्सना चांगले ठेवते तसेच PUBG सारख्या HD games मध्ये स्मूद फ्रेम रेट पण देतो. तसेच 8GB RAM असून Galaxy A71 कधीहि स्लो होत नाही. फोन मध्ये 128GB बिल्ट-इन स्टोरेज देण्यात आली आहे जी microSD कार्डच्या माध्यमातून 512GB पर्यंत वाढवता येते. त्यामुळे ऍप्स, गेम्स, फोटोज, वीडियोज, डॉक्यूमेंट्स इत्यादी साठी तुम्हाला कधीही स्टोरेज कमी पडणार नाही.
बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy A71, 4,500mAh च्या मोठ्या बॅटरी सह येतो जी संपूर्ण दिवसभराचा बॅकअप देते. या पावरफुल बॅटरी वर 16 तासांची 4G वेब ब्राउजिंग आणि 24 तास वीडियो प्लेबॅक मिळतो. अर्थात तुम्ही तासन तास सोशल मीडिया आणि वीडियो स्ट्रीमिंग वर राहू शकता. तसेच जेव्हा बॅटरी कमी होईल तेव्हा सॅमसंगच्या 25W Super-Fast Charging टेक्नोलॉजी सह वेगाने चार्ज केला जाऊ शकतो. हे सर्व आस्पेक्ट मिळून यूजरला पावर बॅकअपच्या चिंतेविना प्रत्येक कंडिशन मध्ये बेस्ट परफॉर्मन्स देतात.
सुंदर डिजाईन आणि अप्रतिम डिस्प्ले
Samsung ने लोकप्रिय कर्व्ड एज डिजाईन आणि 7.7mm स्लिम बॉडीच्या मदतीने Galaxy A71 ला असे बनवले आहे जेणेकरून हा फोन सहज हातात बसेल. तसेच हा स्मार्टफोन खूप हलका आहे आणि याचे वजन 180 ग्राम पेक्षा पण कमी आहे, याचा अर्थ असा आहे कि तुम्ही याचा वापर तासन तास चित्रपट बघण्यासाठी, गेम खेळण्यासाठी आणि इतर कामे करण्यासाठी करू शकता, यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. बॅक पॅनल वर Rhythmical पॅटर्न आणि Prism Crush Black, Blue आणि Silver pastel कलर या फोनला मिड रेंज सेग्मेंटच्या गर्दीत दुसऱ्या स्मार्टफोन्स पेक्षा वेगळा बनवतात. हा फोन Infinity-O display सह येतो. कंपनीने Centre-Aligned Punch-Hole डिजाईनचा वापर केला आहे जो तुम्हाला विश्वास देतो कि तुम्ही दीर्घकाळ कोणत्याही अडचणीविना रोज याचा वापर करू शकाल. स्क्रीन पॅनल खाली Fingerprint Scanner पण देण्यात आला आहे, तसेच खालच्या पॅनल मध्ये हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट मिळेल.
आता डिस्प्ले कडे वळूया, Samsung Galaxy A71 मध्ये 6.7-inch चा Super AMOLED Plus डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे जो Full-HD+ पिक्सल रेजल्यूशन सह येतो. याचा प्रीमियम डिस्प्ले पॅनल आणि हाई रेजोल्यूशन पिक्सल क्लियर आणि शार्प विजुअल सह गडद काळ्या रंगासह तुम्हाला शानदार कॉन्ट्रास्ट लेवल पण देतो. हे सर्व मिळून फोनचा डिस्प्ले आकर्षक आणि व्हायब्रण्ट बनतो, तसेच यामुळे बॅटरी सेविंग पण होते.
बेहतरीन कॅमेरा एक्सपीरियंस
Galaxy A71 मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो हाई-रेजल्यूशन वाले 64MP कॅमेऱ्यासह येतो आणि कंपनीने हा f/1.8 अपर्चर सह सादर केला. हा सेंसर नियमित फोटोग्राफीच्या कामी येतो आणि शानदार फोटो क्लिक करण्याची क्षमता ठेवतो. मेन सेंसर 12MP Ultra-wide-angle सेंसर सह येतो जो 123-Degrees Wide फोटोग्राफी करू शकतो. हा सेंसर फोनला Ultra Wide Night mode ची ताकद पण देतो ज्यामुळे फोन खूप कमी प्रकाशात शानदार फोटोग्राफी करतो.
Samsung Galaxy A71 चा तीसरा सेंसर 5MP चा आहे आणि हि Macro लेंस आहे जी छोट्या छोट्या गोष्टींचे फोटो घेण्याची क्षमता ठेवते. अनेक स्मार्टफोन मध्ये हि सुविधा नसते. क्चाड कॅमेरा सेटअप मध्ये चौथी लेंस 5MP ची आहे जी Depth-sensing चे काम करते. हा कॅमेरा तुम्हाला परफेक्ट पोर्टेट शॉट घेण्यास मदत करतो ज्यामुळे तुमचा सोशल मीडिया प्रेजेंस शानदार होतो.
Samsung Galaxy A71 मध्ये तुम्हाला Live Focus फीचर मिळेल जिथे तुम्ही स्वतः ठरवू शकाल कि आणि वीडियो मध्ये बॅकग्राउंड किती ब्लर करायचा आहे. या स्मार्टफोनच्या दुसऱ्या यूनिक फीचर Slow-Mo सेल्फीचा पण उल्लेख करणे गरजेचे आहे. फोन मध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे आणि हा Slow-Mo वीडियो कॅप्चर करतो. त्यामुळे तुम्ही आपले खास क्षण Slow-mo मध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियाच्या या गेम मध्ये इतरांपेक्षा पुढे जाऊ शकता. कॅमेऱ्याचा अजून एक खास फीचर आहे Super Steady Mode. हा फीचर आता पर्यंतच्या तुमच्या स्मार्टफोन वीडियो एक्सपीरियंसला बदलून टाकेल. वीडियो रेकॉर्डिंग करताना हात हलल्यास पण हा फीचर वीडियो स्टेबल ठेवतो आणि तुम्हाला परफेक्ट शेक फ्री वीडियो रेकॉर्ड करण्यास मदत करतो.
शेवटी कॅमेरा सेक्शनच्या अजून एका चांगल्या फीचरचा उल्लेख करू इच्छितो. Samsung Galaxy A71 मध्ये AR Doodle फीचर आहे जो ऑग्यूमेंटेड रियालिटीच्या मदतीने 3डी एलिमेंट वीडियोज मध्ये टाकतो. हा फक्त ऑन करावा लागेल आणि जे हवे ते चित्र काढा आणि जिथे हवे तिथे ठेवा. तुम्ही जाल तिथे हे चित्र तुमच्यासोबत येईल. एकंदरीत Samsung Galaxy A71 तुमच्या क्रिऐटिविटीला वाढ मिळावी यांचे प्रयत्न करतो.
किंमत आणि उपलब्धता
Samsung Galaxy A71 भारतीय बाजारात जवळपास सर्व प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल चॅनेल्स वर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनची किंमत 32,999 रुपये आहे आणि शानदार डिस्प्ले, मोठी बॅटरी, क्वाड रियर कॅमेरा, मोठी स्टोरेज आणि Alive Intelligence सारख्या चांगल्या सुविधांसह येतो. ज्यांचा आम्ही वर उल्लेख केला आहे ती सर्व वैशिष्ट्ये लक्षात घेता Samsung Galaxy A71 मिड-रेंज सेग्मेंट मध्ये सर्वात बेस्ट स्मार्टफोन पैकी एक आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही आणि हा आता तुम्ही भारतात पण विकत घेऊ शकता.

















