Samsung Galaxy S23 सीरीज प्री-बुकिंग भारतात सुरु! 1 फेब्रुवारीला होणार जागतिक लाँच

प्रतीकात्मक इमेज
Highlights

  • Samsung Galaxy S23 series 1 फेब्रुवारीला भारतात लाँच होऊ शकते.
  • ही सीरीज आजपासून प्री-रिजर्व केली जाऊ शकते.
  • रिजर्वेशन केल्यावर कंपनीकडून कॅशबॅक ऑफर्स दिली जात आहे.
  • सॅमसंग इंडिया वेबसाइट आणि अ‍ॅमेझॉनवर Galaxy S23 series प्री-रिजर्व करता येईल.

सॅमसंगनं घोषणा केली आहे की कंपनी येत्या 1 फेब्रुवारीला आपली नवीन ‘एस23’ सीरीज सादर करणार आहे. कंपनीनं जरी सांगितलं नसलं तरी सीरीजमध्ये Samsung Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra स्मार्टफोनचा समावेश केला जाऊ शकतो. भारतात ही सॅमसंग सीरीज खूप लोकप्रिय आहे आणि त्यामुळेच कंपनीनं Galaxy S23 series भारतात देखील प्री-बुकिंगसाठी उपलब्ध केली आहे.

कुठे करायची Galaxy S23 series ची प्री-बुकिंग

Samsung Galaxy S23 series 1 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल तसेच हा आजपासून देशात प्री-रिजर्व करता येईल. कंपनीनं ए23 सीरीज कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर रिजर्वेशनसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे स्पष्ट झालं आहे की 1 फेब्रुवारीच्या लाँच नंतर ही फ्लॅगशिप सॅमसंग सीरीज शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी येईल. Galaxy S23 series Pre-Reserve सुरु करण्यासोबतच कंपनीनं ऑफर्सची देखील घोषणा केली आहे, ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे. हे देखील वाचा: नवीन वनप्लस येताच OnePlus 10 Pro वर बंपर डिस्काउंट; जाणून घ्या भन्नाट ऑफर

Galaxy S23 वर मिळतील या ऑफर्स

सॅमसंग गॅलेक्सी ए23 सीरीज प्री-रिजर्व केल्यावर कंपनीकडून 6,999 रुपयांचे samsung.com कुपन दिले जात आहेत. त्याचबरोबर 5,000 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट देखील ग्राहकांना मिळतील. Galaxy S23 series रिजर्व करताना युजरला 1,999 रुपयांचं पेमेंट करावं लागेल, ही रक्कम खरेदीच्या वेळी किंमतीत अडजस्ट केली जाईल.

याव्यतिरिक्त Samsung Shop App च्या माध्यमातून सीरीज प्री रिजर्व करण्याची प्रकिया केल्यास युजरला 2000 रुपयांचे वेलकम व्हाउचर आणि 2% लॉयल्टी पॉईंट्स मिळतील. शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर देखील Samsung Galaxy S23 series प्री-रिजर्व करण्यासाठी 1,999 रुपये द्यावे लागतील. परंतु शॉपिंग साइटवर 5,000 रुपयांचा Amazon Pay cashback दिला जाईल. हे देखील वाचा: फक्त 18 मिनिटांत 80 टक्के चार्ज होणार इलेक्ट्रिक कार; 631km रेंजसह Hyundai Ioniq 5 ची एंट्री

Samsung Galaxy S23 series लाँच डिटेल

सॅमसंग आपली नवीन फ्लॅगशिप फोन सीरीज 1 फेब्रुवारीच्या दिवशी जगासमोर सादर करेल. कंपनीनं या इव्हेंटला Galaxy Unpacked 2023 असं नाव दिलं आहे. हा इव्हेंट सॅन फ्रांसिस्कोमध्ये आयोजित केला जाईल. स्थानिक वेळेनुसार गॅलेक्सी अनपॅक्ड 1 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता सुरु होईल जो भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी होईल. हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सर्व सॅमसंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह बघता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here