Samsung Galaxy A71 चा दमदार कॅमेरा तुमच्या सोशल प्रोफाइलला बनवेल खूप आकर्षक, जाणून घ्या कसे ते

आज मिड रेंज सेग्मेंट मध्ये Samsung Galaxy A71 स्मार्टफोनची खूप चर्चा आहे. त्यामागे अनेक कारणे पण आहेत. हा ऑलराऊंडर फोन दमदार कॅमेरा, शानदार डिस्प्ले आणि मोठ्या बॅटरी लाइफ सह येतो. हा स्लीक आणि पावरफुल डिवाइस आपल्या वैशिष्ट्यांमुळे आपल्या रेंज मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व फोन्सना चांगली टक्कर देण्याची क्षमता ठेवतो. या व्यतिरिक्त याचा दमदार फ्रंट कॅमेरा फक्त हाई रेजल्यूशन सेल्फी क्लिक करतो असे नाही तर हा इतर आधुनिक वैशिष्टयांनी पण परिपूर्ण आहे जे दुसऱ्या फोन मध्ये मिळत नाहीत. यातील एक म्हणजे ‘Slow-mo Selfie’. हे फीचर खूप दमदार आहे पण या फोन मध्ये इतकी वैशिष्ट्ये आहेत कि कदाचित हे फिचर गर्दीत हरवून जाऊ शकते. याच कारणांमुळे आज आम्ही तुम्हाला Slow-mo Selfie बद्दल सविस्तर सांगणार आहोत.

Slow Motion selfie चा अनुभव घ्या

Samsung Galaxy A71 मध्ये 32MP चा पावरफुल फ्रंट कॅमेरा आहे जो फोन मध्ये देण्यात आलेल्या Infinity-O, Super AMOLED plus डिस्प्लेच्या आत उपलब्ध आहे. हा फोन रियलटाइम Bokeh Effects व्यतिरिक्त Slow-Motion क्लिप रेकॉर्ड करू शकतो. Slow Motion selfie बद्दल बोलायचे तर आधी फक्त काही फ्लॅगशिप फोन पर्यंत मर्यादित होता हा फिचर पण Samsung ने हा आता या मिड रेंज सेग्मेंटच्या फोन मध्ये पण दिला आहे जी एक मोठी बाब आहे. Slow Motion selfie मध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी सामान्य वेगाच्या तुलनेत कमी वेगाने रेकॉर्ड करू शकता ज्या फक्त तुमच्या Instagram ची शान वाढवणार नाहीत तर तुम्ही तुमचे उडते केस, तुमची नवीन कर्ल स्टाइल सहित खूप काही वेगळ्या ढंगात रेकॉर्ड करू शकता. तसेच रेकॉर्डिंग नंतर जेव्हा तुम्ही हे बघाल तेव्हा याचा Super Smooth Slow Motion शानदार दिसेल. स्क्रीन वर हा तुम्हाला एखाद्या जादुई अनुभवापेक्षा कमी वाटणार नाही.

शानदार Infinity-O Display

या Slow Motion selfie ची मजा कमी झाली असती जर फोनचा डिस्प्ले इतका शानदार नसता. या फोन मध्ये 6.7-inch Super AMOLED Plus स्क्रीन पॅनल आहे जो फुल full HD+ रेजल्यूशन सह येतो. त्याचबरोबर फोनचे बेजल खूप बारीक आहेत आणि डिस्प्लेचा अनुभव अप्रतिम आहे. Infinity-O पॅनल स्क्रीन तुम्हाला real-to-life म्हणजे अगदी वास्तविक रंगांचा अनुभव देऊ शकते. आणि यानंतर जेव्हा Super AMOLED डिस्प्लेची साथ मिळते तेव्हा हा अनुभव द्विगुणित होतो. Super AMOLED पिक्सल्सना वेगवेगळे कंट्रोल करतो आणि आवश्यकतेनुसार on/off करतो ज्यामुळे तुम्हाला जास्त डार्क आणि नॅचरल ब्लॅक मिळतो. हा डिस्प्ले साधरण स्क्रीनच्या तुलनेत जास्त जिवंत वाटतो.

स्टोरेज आणि परफॉर्मेंस मध्ये पण आहे दमदार

स्टाइलिश डिजाइन व्यतिरिक्त पण फोन मध्ये खूप काही आहे. हा फोन 8nm फॅब्रिकेशनच्या Qualcomm Snapdragon 730 चिपसेट वर चालतो आणि यात तुम्हाला 2.2GHz octa-core प्रोसेसर मिळेल. तसेच Adreno 618 GPU आहे जो याची परफॉर्मेंस शानदार बनवतो. राहिला प्रश्न मल्टीटास्किंगचा तर त्यासाठी पण काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण यात 8 GB RAM मेमरी देण्यात आली आहे. एकंदरीत तुम्ही बघू शकता फोनचा सेटअप इतका शानदार आहे कि यात तुम्ही हेवी गेम खेळा किंवा मग एखादे मोठे ऍप्लिकेशन चालावा, हा हँग होणार नाही किंवा ऍप क्रॅश सारखी समस्या येणार नाही. त्याचबरोबर फोन मध्ये AI-powered Game Booster टेक्नोलॉजी आहे जी गेम खेळताना डेडिकेटेड मॅक्सिमम पवार सह फ्रेम रेट बूस्ट करते यामुळे डिस्ट्रॅक्शन होत नाही आणि तुम्ही गेम वर लक्ष केंद्रित करू शकता. तसेच यात 128GB ची स्टोरेज आहे जी खूप आहे. परंतु तरीही तुम्हाला जर हि स्टोरेज कमी पडली तर यात microSD कार्ड स्लॉट आहे जिथे तुम्ही 512GB पर्यंतच्या कार्डचा वापर करू शकता.

मोठी बॅटरी लाइफ

दमदार हार्डवेयरला पावर देण्यासाठी या फोन मध्ये 4,500mAh ची मोठी बॅटरी आहे. तुम्ही एकदा चार्जिंग केल्यास संपूर्ण एक दिवस वीडियोज बघू शकता. या फोन मध्ये 24 तासांचा वीडियो प्ले बॅक टाइम आहे. त्याचबरोबर बॅटरी बाबत खास बाब अशी म्हणता येईल कि Galaxy A71 मध्ये 25W ची Super-Fast चाजिंग देण्यात आली आहे जी फोन कमी वेळात संपूर्ण चार्ज करते.

अप्रतिम कॅमेरा

Samsung Galaxy A71 च्या रियर पॅनल वर कॅमेरा लस्टर आहे जिथे एक साथ 4 कॅमेरे आहेत. याचा मेन कॅमेरा 64MP चा आहे जो वाइड f/1.8 अपर्चर सह येतो. तर दुसरा सेंसर 12MP चा आहे आणि हा Ultra-wide-angle ला सपोर्ट करतो. याव्यतिरिक्त अजून दोन सेंसर्स आहेत जे 5MP रेजल्यूशन सह येतात. यातील एक Macro लेंस आहे तर दुसरा Live Focus शूटसाठी Depth sensor आहे. फोन मध्ये या कॅमेऱ्यांसह अनेक फोटोग्राफी सीनारियो इनेबल आहेत. तसेच यात Super Steady mode सारखे फीचर पण आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही गिंबल प्रमाणे वीडियो स्टेबलाइजेशन मिळवू शकता.

अजून काही खास फीचर्स पण आहेत यात
आज तुमच्यासाठी आणि तुमच्या आर्गेनाइजेशनसाठी सिक्योरिटी खूप महत्वाची आहे आणि तुमच्या सुरक्षेची Samsung Galaxy A71 मध्ये पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. कंपनीने हा फोन Under-Display Fingerprint Scanner सह सादर केला आहे. सोबतच यात ऍडव्हान्स ग्रेड सुरक्षा लेयर Knox आहे जी तुमचा डेटा आणि फाइल्स सुरक्षित ठेवते.

Galaxy A71 असेल तर शॉपिंगच्या वेळी कॅश आणि कार्डची काळजी करण्याची गरज नाही. हा फोन स्मार्ट पेमेंट सिस्टम Samsung Pay सह येतो. Samsung Pay फोन वरच तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्ड टोकेनाइजेशनच्या माध्यमातून सुरक्षितरित्या जोडू शकता आणि Point Of Sale (POS) जिथे कार्ड स्वाइप केला जातो तिथे कोणत्याही कार्ड विना तुम्ही तुमचा फोन टॅप करून पेमेंट करू शकता. यानंतर एक खास उल्लेख करणे गरजेचे आहे. Samsung Galaxy A71 मध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे. याचा अर्थ असा कि तुम्ही यात तुमचा फेवरेट हडफोन वापरू शकता.

किंमत आणि उपलब्धता
Samsung Galaxy A71 भारतातील सर्व प्रमुख रिटेल स्टोर वर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच Samsung Opera House, Samsung.com सहित देशातील प्रमुख ऑनलाइन स्टोर्स वरून 32,999 पासून पण विकत घेता येईल. हि किंमत 128GB मेमरी आणि 8GB RAM असलेल्या मॉडलसाठी आहे. हा फोन Prism Crush Silver, Prism Crush Blue आणि Prism Crush Black सहित तीन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे.

निष्कर्ष
आजच्या गर्दीत जिथे तुमचा सोशल गेम तुम्हाला इतरांपासून वेगळा ठरवतो त्यामुळे Samsung Galaxy A71 आपल्या दमदार फीचर्समुळे तुम्हाला या सोशल गर्दीत मोठे यश मिळवून देऊ शकतो. यातील शानदार कॅमेरा फीचर्स जे तुमच्या फोटो मध्ये फक्त चार चांद लावणार नाही तर यात तुम्ही तुमची क्रिएटिविटी पण दाखवू शकता आणि एक फोटोग्राफर प्रमाणे वरच्या दर्जाची फोटोग्राफी करू शकता. त्याचबरोबर याचे Slow Motion selfie फीचर म्हणजे केक वरील चेरी आहे जो फक्त शोभा वाढवत नाही तर त्या सर्व गोष्टी करण्यास मदत करतो ज्या तुम्ही एका फोन मध्ये करू इच्छिता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here