91मोबाइल्सनं काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव्ह माहिती दिली होती की मार्चमध्ये iQOO आपल्या Z-सीरीजचा विस्तार करत नवीन फोन iQOO Z7 लाँच करेल. परंतु तेव्हा या स्मार्टफोनच्या लाँच डेट बद्दल कोणतंही अचूक माहिती मिळाली नव्हती. परंतु, आता एका रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे की 21 मार्च 2023 ला हा हँडसेट भारतात लाँच केला जाईल जो गेल्यावर्षी सादर झालेल्या iQOO Z6 चा अपग्रेडेड व्हर्जन असेल.
iQOO Z7 लाँच डेट लीक
प्रसिद्ध टिप्सटर Oneily Gadget नं ट्विट करून माहिती दिली आहे की नवीन गुगल अॅडनुसार 21 मार्चला iQOO Z7 लाँच केला जाईल. ट्विटवर या जाहिरातीचा स्क्रीनशॉट देखील शेयर करण्यात आला आहे, ज्यात दिसतंय की “iQOO Z7 – Slay, Stream, Shoot, Repeat – Launching 21st March 2023” असं गुगल सर्चमध्ये लिहण्यात आलं आहे. तसेच, स्क्रीनशॉटवरून समजलं आहे की फोनमध्ये अनेकी फीचर्स देण्यात येईल. iQOO च्या नव्या फोनच्या लाँचच्या वेळी काही एक्सचेंज ऑफर आणि बँक कॅशबॅक देखील मिळेल. आता सर्च केल्यावर गुगलवर लाँच डेट बाबत कोणतीही माहिती मिळत नाही.
iQOO Z7 5G is officially launching on March 21, 2023 in India.#iQOO #iQOOZ7 pic.twitter.com/ZuIlzOtChX
— Oneily Gadget (@OneilyGadget) March 5, 2023
कंपनीनं टीज केलाय iQOO Z7
iQOO इंडियाचे सीईओ Nipun Marya यांनी काही दिवसांपूर्वी अपकमिंग iQOO Z7 लाँच बद्दल एक टीजर ट्विटरवर शेयर केला आहे. टीजरमधून लाँच डेट समजली नाही किंवा इतर कोणतीही माहिती शेयर करण्यात आली नाही. टीजरवरून स्पष्ट झालं आहे की फोनमध्ये वर्टिकल ड्युअल कॅमेरा सेटअप आणि ड्युअल एलईडी फ्लॅश आहे. फोनच्या मागे OIS सह 50MP प्रायमरी सेन्सर (optical image stabilisation) असेल. तसेच फोन Teal कलर ऑप्शनसह सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: अत्यतं कमी किंमतीत 32MP सेल्फी कॅमेरा; Tecno Spark 10 Pro जबरदस्त फीचर्ससह लाँच
iQOO Z6 5G
- 6.58″ FHD+ 120Hz Display
- 8GB RAM + 128GB Storage
- Qualcomm Snapdragon 695 5G
- 50MP Triple Rear Camera
- 16MP Selfie Sensor
- 18W 5,000mAh Battery
आयकू झेड6 5जी फोन सध्या 14,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे ज्यात 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळते. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर चालतो जोडीला एड्रेनो 619 जीपीयू आहे. आयकू झेड 6 5जी मध्ये 5-लेयर लिक्विड कूलिंग सिस्टम देखील देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 18वॉट चार्जिंगसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Samsung चे दोन 5G Phone याच महिन्यात येणार भारतात; Galaxy A54 आणि Galaxy A34 च्या लाँचची माहिती लीक
iQOO Z6 5G स्मार्टफोन 6.58-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी आयकू 6 5जी फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.