91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव बातमी देऊन सांगितले होते कि सॅमसंग नोव्हेंबरच्या 4 तारखेला आपला लेटेस्ट स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीने गॅलेक्सी ए9 च्या भारतीय लॉन्च बद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती पण हा रिपोर्ट आम्ही अनेक सूत्रांकडून मिळालेल्या माहिती वरून दिला होता. तर आता सॅमसंग गॅलेक्सी ए9 सॅमसंगच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग द्वारे सॅमसंग ने पण 91मोबाईल्सच्या बातमी वर शिक्कामोर्तब केला आहे कि सॅमसंगचा हा 4 रियर कॅमेरा वाला स्मार्टफोन लवकरच भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये येईल.
सॅमसंग गॅलेक्सी ए9 कंपनीच्या आॅफिशियल वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये फोन कंपनी द्वारा प्री-रजिस्ट्रेशन साठी उपलब्ध केला आहे. सॅमसंगच्या वेबसाइट वर जाऊन गॅलेक्सी ए9 च्या लॉन्च डेट, याची किंमत व आॅफर्स यांचे अपडेट मिळवण्यासाठी रजिस्टर करता येईल. रजिस्ट्रेशन सोबतच सॅमसंग इंडिया वर गॅलेक्सी ए9 चे प्रोडक्ट पेज पण बनवण्यात आले आहे ज्यात फोनच्या फुल स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.
गॅलेक्सी ए9 च्या या प्रोडक्ट पेज वरून समजते कि हा लॅमनेड ब्लू, बबलगम पिंक आणि केवियर ब्लॅक कलर मध्ये भारतात लॉन्च केला जाईल. सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 मध्ये 6जीबी रॅम असल्याचे प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहे ज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. पण मलेशिया मध्ये हा फोन 6जीबी आणि 8जीबी रॅम सह लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे आशा आहे कि सॅमसंग 6जीबी रॅम सोबतच गॅलेक्सी ए9 चा 8जीबी रॅम वेरिएंट पण भारतात लॉन्च करेल.
गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर फोन मधील 4 कॅमेरा सेंसर वाला रियर कॅमेरा सेटअप याची सर्वात मोठी खासियत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल + 10-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचे चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए9 एंडरॉयड 8.1 ओरियो सह एक्सपीरियंस 8.5 यूआई वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी ए9 मध्ये 3,800 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत क्विक चार्ज 2.0 सपोर्ट आहे जो कमी वेळात फोन चार्ज करू शकतो. फोन मध्ये फेस रिकॉग्निशन सपोर्ट आहे तसेच फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला हं. सॅमसंग इंडिया ने अजूनतरी गॅलेक्सी ए9 ची लॉन्च डेट आॅफिशियल केली नाही त्यामुळे फोनचा लॉन्च आणि याच्या किंमतीची कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.















