Samsung Galaxy F54 5G लाँच पूर्वीच कंपनीच्या साइटवर झाला लिस्ट; लवकरच येऊ शकतो बाजारात

Highlights

  • Samsung फोन SM-E546B/DS मॉडेल नंबरसह वेबसाइटवर दिसला आहे.
  • आशा आहे की Galaxy F54 को फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकला जाईल.
  • हँडसेट भारतात 5G सपोर्टसह लवकरच लाँच केला जाऊ शकतो.

Samsung आपल्या गॅलेक्सी एफ-सीरीजमध्ये एक नवीन फोन सादर करण्याची तयारी करत आहे. कंपनीनं अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हँडसेट Galaxy F54 5G नावाने भारतीय बाजारात येईल. दरम्यान TheTechOutlook टेक साइटनं या डिवाइसचं सपोर्ट पेज कंपनीच्या इंडियन साइट सोबतच बांगलादेश वेबसाइटवर पाहिलं आहे. यावरून स्पष्ट झालं आहे की फोन वेगवेगळ्या मार्केटमध्ये येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी ची लिस्टिंग

पुढे देण्यात आलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता की SM-E546B/DS मॉडेल नंबरसह सॅमसंगचा नवीन फोन दिसला आहे. मॉडेल नंबर व्यतिरिक्त फोन बाबत कोणतीही माहिती वेबसाइटवर समोर आली नाही. तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की सॅमसंगचा नवीन फोन काही दिवसांपूर्वी या मॉडेल नंबरसह बीआयएस सर्टिफिकेशन साइटवर दिसला आहे. हे देखील वाचा: 16GB रॅम आणि दमदार कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO reno 10 Pro PLus, लिक झाली माहिती

बीआयएस लिस्टिंग 91mobiles नं एक्सक्लूसिव्हली स्पॉट केली होती. आतापर्यंत मार्केटिंग नाव समोर आलं नाही. परंतु हा कंपनीच्या एफ-सीरीजमध्ये येणारा Samsung Galaxy F54 5G असू शकतो, अशी चर्चा आहे. याचा अर्थ असा की हा जुन्या Galaxy F42 स्मार्टफोन अपग्रेडेड व्हर्जन म्हणून एंट्री करू शकतो.

Samsung Galaxy F54 5G स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

गॅलेक्सी F54 5G कंपनीच्या गॅलेक्सी M54 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. त्यामुळे या दोन्हीचे स्पेसिफिकेशन्स एक सारखे असू शकतात. हा फोन 6.7-इंचाच्या FHD+ S-AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. हे देखील वाचा: 12 एप्रिलला येत आहे Realme Narzo N55; लाँचपूर्वीच जाणून घ्या संपूर्ण माहिती

तसेच फोनमध्ये Exynos 1380 चिपसेट, 8GB RAM, 128GB / 256GB स्टोरेज आणि 25W चार्जिंगसह 6,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. गॅलेक्सी एफ54 5जी मध्ये फ्रंटला 32-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर रियर कॅमेरा सेटअपमध्ये OIS असलेला 108-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 8-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. तसेच हा डिवाइस वन युआय 5.1-आधारित अँड्रॉइड 13 ओएस आणि एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह लाँच होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here