सॅमसंग आता स्वस्त स्मार्टफोंस मध्ये पण देईल आइरिश स्कॅनर, कमी किंमतीत मिळेल ही महाग टेक्नोलॉजी

सॅमसंग चे नाव टेक दिग्गज कंपन्यांच्या टॉप लिस्ट मध्ये येते. आपल्या स्मार्टफोंस मधून सॅमसंग ने अनेक नवीन टेक्निक जगासमोर सादर केल्या आहेत. सॅमसंग ने शोधलेली ‘आइरिश स्कॅनर’ टेक्निक आज कदाचीत फेस अनलॉक आणि अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर टेक्निक समोर कमजोर वाटली तरी कंपनी या टेक्निक ला सोबत घेऊन पुढे जाणार आहे. बातमी आली आहे की सॅमसंग गॅलेक्सी ग्रांड प्राइम प्लस 2018 सारख्या स्वस्त स्मार्टफोन मध्ये ही टेक्नोलॉजी आणणार आहे.

एक्सडीए डेवेलपर्स ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की सॅमसंग आपल्या आगामी स्मार्टफोन गॅलेक्सी ग्रांड प्राइम मध्ये आइरिश स्कॅनर देणार आहे. विशेष म्हणजे सॅमसंग आइरिश स्कॅनर चा वापर आता पर्यंत महाग आणि हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस मध्ये करत होती. पण गॅलेक्सी ग्रांड प्राइम प्लस 2018 मध्ये ही टेक्नोलॉजी आल्या नंतर सॅमसंग च्या लो बजेट स्मार्टफोन्सना पण फायदा होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ग्रांड प्राइम प्लस 2018 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता आता पर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 960 x 540 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.5-इंचाच्या डिस्प्ले सह सादर केला जाईल. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह येईल तसेच यात कंपनी चा एक्सनॉस 7870 चिपसेट मिळू शकतो.

लीक नुसार सॅमसंग च्या या फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा तसेच 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,630एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. सध्यातरी गॅलेक्सी ग्रांड प्राइम प्लस 2018 संबधी जास्त माहिती समोर आली नाही. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डेट साठी सॅमसंग च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here