5,000एमएएच बॅटरी वाले गॅलेक्सी एम20 साठी आता वाट बघावी लागणार नाही, सॅमसंगचा स्वस्त फोन ओपन सेल साठी उपलब्ध

सॅमसंगने जानेवारीत इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये नव्या स्ट्रॅटर्जीची सुरवात करत गॅलेक्सी एम सीरीज लॉन्च केली होती. गॅलेक्सी एम सीरीज अंतर्गत आतापर्यंत तीन स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत जे संपूर्ण जगात फक्त भारतात उपलब्ध आहेत. सॅमसंग ने सर्वात आधी गॅलेक्सी ए10 आणि एम20 लॉन्च केले होते ज्यांनतर काही दिवसांनी गॅलेक्सी एम30 पण बाजारात आला होता. सॅमसंग गॅलेक्सी एम10 कंपनी ने काही दिवसांनी ओपन सेल साठी उपलब्ध केला होता. पण अजून गॅलेक्सी एम20 आणि एम30 फ्लॅश सेल मध्ये विकला जात होता. हे दोन्ही फोन 7 मार्चला फ्लॅश सेल मध्ये उपलब्ध झाले होते, पण आता सॅमसंग ने आपल्या फॅन्सना भेट देत गॅलेक्सी एम20 ओपन सेल साठी उपलब्ध केला आहे. म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एम20 च्या खरेदीसाठी आता फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही.

सॅमसंगने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेल वरून गॅलेक्सी एम20 च्या ओपन सेलची माहिती दिली आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी एम20 चे एक ट्वीट केले आहे ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसह ‘अवेलबल नाउ’ म्हणजे उपलब्ध आहे असे लिहिले आहे. या ट्वीट मध्ये सॅमसंग इंडियाने फोन विकत घेण्यासाठी एक लिंक पण दिली आहे जी अमेझॉन इंडियाच्या वेबसाइट वर नेते. या ट्वीट वरून स्पष्ट झाले आहे ​कि गॅलेक्सी एम20 विकत घेण्यासाठी आता कोणत्याही फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही आणि हा फोन नेहमी अमेझॉन वर सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम20
गॅलेक्सी एम20 ‘यू’ शेप वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला केला गेला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.3-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. गॅलेक्सी एम20 आशाहीच्या ड्रॅगनटेल ग्लासने प्रोटेक्टेड आहे जी डिस्प्ले स्क्रॅच पासून वाचवते. फोनचे तिन्ही किनारे नॅरो बेजल्स सह येतात तसेच साखालच्या बाजूला थोडे बॉडी पार्ट देण्यात आले आहेत. बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा आणि मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे.

ओपो ए5एस आणि ए1के चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, दोन्ही फोन लवकरच येतील बाजारात दस्तक

सॅमसंग ने गॅलेक्सी एम20 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 1.5गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाले ऑक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनोस 7904 वर चालतो. गॅलेक्सी एम2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एम20 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तर एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी वाईड एंगल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम20 डुअल सिम सह 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे.

आला एंडरॉयड Q, जाणून घ्या आपल्या फोन मध्ये सर्वात आधी कसा इंस्टाल करावा

4जी एलटीई तसेच डुअल सिम सह हा फोन सर्व बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी गॅलेक्सी एम20 मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सह फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी एम20 चा 3जीबी/32जीबी वेरिएंट 10,990 रुपये आणि 4जीबी/64जीबी वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here