वनप्लस असो वा शाओमी, सॅमसंग असो वा ओपो—वीवो सर्व कंपन्या आपले स्मार्टफोन्स एकपेक्षा एक स्पेसिफिकेशन्स सह बाजारात आणतात. ये स्मार्टफोन स्पेसिफिकेशन्ससोबत स्टाईल, लुक आणि फीचर्स मध्ये पण एकमेकांना टक्कर देतात. कोणी प्रोसेसर मध्ये पुढे असतो तर कोणी कॅमेरा डिपार्टमेंट मध्ये टक्कर देतो. पण सर्व स्मार्टफोन मध्ये जीव ओतण्याचे काम करते ते म्हणजे फोनची एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम. हा एंडरॉयड ओएस गूगल कडून येतो जो सर्व एंडरॉयड स्मार्टफोन्सना चालवण्यासाठी प्लॅटफॉर्म देतो. आतापर्यंत बाजारात एंडरॉयडची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 म्हणजे एंडरॉयड पाई होती. पण आज टेक दिग्गज गूगल ने टेक मंचावर आपला सर्वात नवीन आणि एंडरॉयड ओएस एंडरॉयड क्यू सादर केला आहे. गूगलने एंडरॉयड क्यू चा बीटा वर्जन जाहीर केला आहे, जो स्मार्टफोन मध्ये डाउनलोड साठी तयार आहे. जर तुम्ही पण त्या लोकांपैकी असाल ज्यांना आपला स्मार्टफोन सर्वात नवीन अपडेटने सुसज्ज ठेवायला आवडते तर पुढे आम्ही हेच सांगितले आहे कि कशाप्रकारे सर्वात आधी एंडरॉयड क्यू आपल्या फोन मध्ये डाउनलोड केला जाऊ शकतो.
सर्वात आधी सांगायचे म्हणजे गूगल आता एंडरॉयड क्यू बीटा वर्जनच सादर केला आहे. हा वर्जन खासकरून डेवलेपर्स आणि त्या लोकांसाठी आहे ज्यांना सामान्य लोकांपर्यत पोहचण्याआधी एंडरॉयड क्यू हवा आहे. एंडरॉयड क्यू बीटा वर्जन गूगल द्वारा ओटीए म्हणजे ओवर द एयर पद्धतीने स्मार्टफोन यूजर्स पर्यंत पोचवला जात आहे. कंपनीने हा एंडरॉयड क्यू बीटा वर्जन पिक्सल 3, पिक्सल 3 एक्सएल, पिक्सल 2, पिक्सल 2 एक्सएल, पिक्सल आणि पिक्सल एक्सएल स्मार्टफोन वर सादर केला आहे. ओटीए व्यतिरिक्त एंडरॉयड क्यू बीटाचा फ्लॅश वर्जन पण मॅन्यूअली फोन मध्ये डाउनलोड करून इंस्टाल केला जाऊ शकतो.
तुमच्या फोन मध्ये पण आला आहे का एंडरॉयड क्यू अपडेट
वर सांगितल्याप्रमाणे एंडरॉयड क्यू अपडेट गूगल द्वारा ओटीए द्वारा पाठवत आहे. यासाठी सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोन मध्ये एंडरॉयड क्यू चा अपडेट आला आहे कि नाही ते जाणून घ्या. यासाठी :
1. स्मार्टफोनची सेटिंग्स ओपन करा आणि तिथे ‘सिस्टम’ ऑप्शन वर क्लिक करा
2. सिस्टम मध्ये ‘अबाउट फोन’ चा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा
3. तिथे सर्वात खाली ‘एंडरॉयड वर्जन’ मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर समजले कि तुमच्या फोन मध्ये कोणता एंडरॉयड वर्जन आहे.
4. ‘अबाउट फोन’ मध्येच एंडरॉयड सिक्योरिटी पॅचचा ऑप्शन देण्यात आला आहे, त्यावर क्लिक करा.
5. जर तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड क्यू चा अपडेट उपलब्ध झाला असेल तर डाउनलोड अँड इंस्टालचा ऑप्शन येतील. त्यावर क्लिक करा.
डुअल डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेऱ्यासह येत आहे हुआवईचा नवीन फोन, येईल लवकरच
एंडरॉयड क्यू ने फोन कसा करावा अपडेट
1. ‘अबाउट फोन’ मध्ये जर एंडरॉयड क्यू चा अपडेट ओटीए द्वारे आला असेल तर तो फोन मध्ये डाउनलोड करा.
2. गूगलने सांगतिले आहे कि एंडरॉयड क्यू ने फोन अपडेट करण्याआधी फोनचा बॅकअप नक्की घ्या.
3. तसेच नवीन एंडरॉयड वर्जनची फाइल साईज 1 जीबी पेक्षा जास्त असू शकते, त्यामुळे फोन वाईफाई शी कनेक्ट केलेले चांगले.
4. डाउनलोड अँड इंस्टाल वर टॅप करा, नवीन अपडेट डाउनलोड होण्यास सुरवात होईल.
32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि या दमदार प्रोसेसर सह आला हुआवई नोवा 4ई
एंडरॉयड क्यू चे फीचर्स पाहता यात फुल फंक्शन वाईड डार्क थीम मिळेल. हा ओएस डेस्कटॉप मोड, परमिशन रीवॅम्प, एक्सेसिबिलिटी फीचर्स आणि नवीन व आर्कषक डेवलेपर्स ऑप्शन्स मिळतील. विशेष म्हणजे गूगल आपल्या नवीन एंडरॉयड ओएस ला सर्वात आधी कंपनीच्या पिक्सल फोन मध्ये अपडेट करते. यावेळी पण एंडरॉयडची नवी ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड ‘क्यू’ नवीन गूगल पिक्सल मध्येच सर्वात आधी मिळेल. तसेच एंडरॉयड क्यू आफिशियली कधी बाजारात येईल आणि कोणत्या स्मार्टफोन्स याचा अपडेट मिळेल यासाठी थोडी वाट बघावी लागेल.
एंडरॉयड क्यू च्या डाउनलोड संबंधित सविस्तर माहितीसाठी (इथे क्लिक करा)















