6000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M35 5G ची लाँच तारीख झाली निश्चित, जाणून घ्या कधी येणार स्मार्टफोन

सॅमसंगच्या नवीन 5G स्मार्टफोनची ऑफर आता काही दिवस दूर आहे. कारण ब्रँडद्वारे एम-सीरीजचा Samsung Galaxy M35 5G हा स्मार्टफोन 17 जुलै रोजी लाँच होत आहे. कंपनीने सोशल मीडियावर टीझर आणि ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉनवर त्याची मायक्रोसाईट प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये लाँच तारखेसह प्रमुख स्पेसिफिकेशन शेअर केले आहेत. चला, पुढे फोनबद्दल अधिक तपशील जाणून घेऊया.

Samsung Galaxy M35 5G भारतातील लाँच तारीख

  • सोशल मीडिया साईट एक्स आणि ॲमेझॉन प्लॅटफॉर्मवर समोर आलेल्या तपशीलानुसार, Samsung Galaxy M35 5G हा स्मार्टफोन 17 जुलै रोजी दुपारी 12:00 वाजता लाँच होईल.
  • नवीन सॅमसंग 5G डिव्हाईस लाँच केल्यानंतर तो ॲमेझॉनच्या प्राईम डे सेल दरम्यान 20 आणि 21 जुलैपासून ऑफर्ससह उपलब्ध होईल.
  • कंपनीने पुष्टी केली आहे की, या डिव्हाईसमध्ये व्हेपर कूलिंग चेंबर, कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस संरक्षण, 6000mAh ची बॅटरी, 120Hz सुपर ॲमोलेड डिस्प्ले मिळेल.
  • Samsung Galaxy M35 5G डिव्हाईस डार्क ब्लू, लाइट ब्लू आणि ग्रे अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Samsung Galaxy M35 5G चे स्पेसिफिकेशन (जागतिक)

सॅमसंगने Galaxy M35 5G स्मार्टफोनला जागतिक स्तरावर मे महिन्यात लाँच केला होता. ज्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.

  • डिस्प्ले: Samsung Galaxy M35 5G मध्ये 6.6 इंचाचा मोठा सुपर ॲमोलेड डिस्प्ले मिळत आहे. त्यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 निट्स पर्यंतच्या ब्राईटनेसचा सपोर्ट मिळतो. या डिव्हाईसमध्ये परफॉर्मन्ससाठी Exynos 1380 प्रोसेसर लावण्यात आला आहे. यासोबत हा भारतात देखील येऊ शकतो.
  • कॅमेरा: स्मार्टफोनमध्ये OIS सपोर्टसह ट्रिपल कॅमेरा मिळत आहे. यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा दिला गेला आहे. त्याचवेळी, समोर एक 13 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा लावण्यात आला आहे.
  • बॅटरी: Samsung Galaxy M35 5G हा स्मार्टफोन 6000mAh ची मोठी बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.
  • इतर: फोनमध्ये साईड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्पीकर, 5G, 4G, वायफाय, ब्लूटूथ 5.3 अशी अनेक फीचर्स मिळत आहेत.
  • ओएस: Samsung Galaxy M35 हा अँड्रॉइड 14 सोबत लाँच झाला असून तो One UI 6.1 वर आधारित आहे. यात 4 वर्षांपर्यंत ओएस अपग्रेड आणि 5 वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेटची सुविधा आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here