Samsung ने वर्षाच्या सुरवातीला इंडियन टेक मार्केट मध्ये नवीन सुरवात करत गॅलेक्सी एम सीरीज सादर केली होती. या नवीन सीरीज सोबतच सॅमसंगने वॉटरड्रॉप नॉच ची सुरवात पण केली होती. गॅलेक्सी एम सीरीज मध्ये आता पर्यंत सॅमसंग द्वारा Galaxy M10, Galaxy M20 आणि Galaxy M30 स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. अनके दिवसांपासून बातमी येत आहे कि या सीरीज अंतर्गत आता Galaxy M40 स्मार्टफोन पण लवकरच येईल. आता एका ताजा रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग जून मध्ये Galaxy M40 समोर आणेल आणि हा फोन इनफिनिटी ओ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल.
Samsung Galaxy M40 संबंधित हि बातमी सॅममोबाइल ने दिली आहे. या वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये अंदाज वर्तवला आहे कि सॅमसंग जूनच्या सुरवातीच्या आठवड्यात Galaxy M40 सादर करू शकते. रिपोर्ट नुसार हा स्मार्टफोन पण गॅलेक्सी एम सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे सर्वात आधी भारतात लॉन्च केला जाईल. Galaxy M40 संबंधित खास बाब अशी कि हा फोन इनफिनिटी ओ डिस्प्लेला सपोर्ट करेल. विशेष म्हणजे हा डिस्प्ले आता पर्यंत कंपनीच्या हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस Galaxy S10 सीरीज मध्ये दिसला होता.
दमदार असतील स्पेसिफिकेशन्स
विशेष म्हणजे Galaxy M40 काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. गीकबेंच वर हा फोन SM-M405F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy M40 कंपनी द्वारा 6जीबी रॅम मेमरी सहा बाजारात येऊ शकतो. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच फोन मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असल्याचे पण लीक मध्ये समोर आले आहे.
Galaxy M40 गीकबेंच वर एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई सह दाखवण्यात आला होता ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 6150 चिपसेट होता. आविशेष म्हणजे हे चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेटचे कोडनेम आहे. लीक नुसार Galaxy M40 सॅमसंग द्वारा मोठ्या व पावरफुल बॅटरी सह येऊ शकतो. या फोन मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी मिळू शकते.
लीक्स नुसार Galaxy M40 च्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात. तसेच फोनचा सेल्फी कॅमेरा डिस्प्ले वरील होल मध्ये असेल. तसेच सेल्फी कॅमेरा सेटअप गॅलेक्सी एस10 सीरीजच्या स्मार्टफोन्स सारखा असेल. Galaxy M40 सॅमसंगचा पहिला मीड रेंज फोन असेल जो इनफिनिटी ओ डिस्प्लेला सपोर्ट करेल. किंमतीबद्दल बोलायचे तर समोर आलेल्या रिपोर्ट नुसार Samsung Galaxy M40 25,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीवर लॉन्च केला जाऊ शकतो.















