7 ऑगस्टला लॉन्च होईल सॅमसंगचा सर्वात दमदार फोन Galaxy Note 10, बघा काय असेल खास

Samsung बद्दल अबेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे कि कंपनी आपल्या नोट सीरीजचा पुढील डिवाइस Galaxy Note 10 लवकरच लॉन्च करू शकते. आता असे समोर आले आहे कि कंपनी हा फोन 7 ऑगस्टला सादर करेल. या इवेंटला कंपनीने अनपॅक्डचे नाव दिले आहे. हा इवेंट कंपनी आपल्या वेबसाइट वर लाइव स्ट्रीम पण करेल.

यात असेल पंच होल

कंपनी ने यूट्यूब वर अनपॅक्ड इवेंटचा टीजर जारी केला आहे. या टीजर मध्ये लॉन्च डेट व्यतिरिक्त फोन मधील कोणत्याही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला नाही. पण असे समजले आहे कि नोट सीरीज मध्ये येणारा फोन पंच-होल डिस्प्ले सह येईल.

सोबतच होतील इतर मॉडेल्स लॉन्च

असे बोलले जात आहे कि Samsung Galaxy Note 10 सह Galaxy Note 10 Pro ऐवजी Galaxy Note 10+ लॉन्च करू शकते. Galaxy S10 सीरीज सोबत पण कंपनीने असेच केले होते, गॅलेक्सी एस10 सह Galaxy S10+ आणला होता. तसेच कंपनी दोन गॅलेक्सी नोट मॉडेल सह 5जी वेरिएंट पण घेऊन येऊ शकते.

अशी असू शकते किंमत

अजूनतरी कंपनीने अधिकृतपणे स्मार्टफोन्सच्या किंमतीची कोणतीही माहिती दिली नाही. पण काही रिपोर्ट्स नुसार Samsung Galaxy Note10 $1,100 (जवळपास 76,000 रुपये) आणि $1,200 (जवळपास 83,000 रुपये) मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. गेल्यावर्षी Note 9 कंपनीने $1,000 (जवळपास 69,000 रुपये) च्या सुरवातीच्या किंमतीत लॉन्च केला होता.

हे देखील वाचा: 7 ऑगस्टला लॉन्च होईल सॅमसंगचा सर्वात दमदार फोन Galaxy Note 10, बघा काय असेल खास

अलीकडेच Samsung Galaxy Note 10+ चा कथित हॅन्ड्स ऑन फोटो लीक झाला होता. याआधी बोलले जात होते कि Samsung च्या आगामी स्मार्टफोनचे नाव Galaxy Note 10 Pro असू शकते. फोटो मध्ये हँडसेटच्या फ्रंट पॅनल वर होल-पंच डिस्प्ले आहे जो यावर्षी लॉन्च झालेल्या Galaxy S10 मध्ये देण्यात आलेल्या एमोलेड पॅनल-सपोर्टेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले प्रमाणे असू शकतो. हॅन्ड्स ऑन फोटो मध्ये Galaxy Note 10+ मॉडेलच्या मागे एलईडी फ्लॅश आणि टाइम-ऑफ-फ्लाइट सह वर्टिकल कॅमेरा सेटअपची झलक पण दिसली होती.

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका विदेशी रिपोर्ट मध्ये दावा केला गेला होता कि सॅमसंगचा आगामी नोट डिवाईस बटनलेस असेल. म्हणजे यात कोणताही फिजिकल बटण दिला जाणार नाही. फोनच्या साइड पॅनल्स वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण जो दिला जातो तो Galaxy Note 10 मॉडेल्स मध्ये नसेल. Samsung आपला हा आगामी डिवाईस बटण ऐवजी टच सेंसर्स सह लॉन्च करू शकते ज्यात फोन बॉडी प्रेस केल्याने पावर ऑन व ऑफ होईल तसेच वॉल्यूम कंट्रोल होईल.

हे देखील वाचा: Xiaomi Redmi Note 7 Pro चा नवीन वेरिएंट आला समोर, 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज सह झाला लॉन्च

Samsung Galaxy Note 10 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung बद्दल बोलले जात आहे कि कंपनी आपला Galaxy Note 10 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करेल जो पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करेल. या दोन्ही मॉडेल्स मध्ये डिस्प्ले साईजचा फरक दिसेल. लीक्स नुसार Galaxy Note 10 मध्ये 6.4-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो तसेच Galaxy Note 10 Pro मध्ये 6.7-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हे दोन्ही मॉडेल एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतील. Galaxy Note 10 मध्ये 586पीपीआई तर Galaxy Note 10 Pro मध्ये 498पीपीई पिक्सल डेनसिटी वाली स्क्रीन मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here