दाक्षिणात्य चित्रपटांना सध्या चांगलं यश मिळत आहे. डब केलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांना देखील देशभरातील दर्शक पसंती देत आहेत. यातील एका चित्रपटाने फक्त दर्शकांच्या मनावर राज्य केलं नाही तर 68व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये जागा मिळवली आहे आणि एक किंवा दोन नव्हे तर 5 National Film Award आपल्या नावे केले आहेत. तुम्हाला हा चित्रपट बघायचा असेल तर आता डब व्हर्जन देखील ओटीटीवर उपलब्ध झालं आहे. चला जाणून घेऊया या चित्रपटाची गोष्ट, स्टार कास्ट आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर हा बघता येईल.
मिळवले 5 नॅशनल अवॉर्ड
दाक्षिणात्य सुपरस्टार Surya च्या चित्रटप ‘सोरारई पोटरु’ ला सर्वाधिक पाच नॅशनल अवॉर्ड मिळाले आहेत. या महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये ‘सोरारई पोटरु’ ला बेस्ट फीचर फिल्म अवॉर्ड, (सूर्या) बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड, बेस्ट अॅक्ट्रेस अवॉर्ड (अपर्णा बालामुरली), बेस्ट स्क्रीनप्ले आणि बेस्ट म्यूजिक डायरेक्शन (बॅकग्राउंड स्कोर) अवॉर्ड देखील मिळाला आहे. हे देखील वाचा: Aashram 4: यावेळी होणार बाबा निरालाचा पर्दाफाश! अशी असेल आश्रम 4 ची गोष्ट
Soorarai Pottru ची गोष्ट
Soorarai Pottru चित्रपटात नेदुमारन राजंगम नावाच्या व्यक्तीची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जो स्वतःची एयरलाईन बनवण्याचं स्वप्न बघतो. आपल्या स्वप्नासाठी त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की कशाप्रकारे एक व्यक्ती आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतो. चित्रपटाच्या गोष्टीला एयर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन जीआर गोपीनाथ यांच्या आयुष्यातून प्रेरणा मिळाली आहे, अशी चर्चा आहे.
Soorarai Pottru स्टार कास्ट
सूर्याच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन Sudha Kongara यांनी केलं आहे. त्यांनी हा चित्रपट लिहिला देखील आहे. तसेच या मुव्हीमध्ये सूर्या आणि अपर्णा बालामुरली व्यतिरिक्त परेश रावल यांची महत्वाची भूमिका आहे. तसेच मोहन बाबू, उर्वशी आणि करुणा सहाय्यक भूमिकेत दिसतात.
हिंदीत देखील Soorarai Pottru
https://www.instagram.com/reel/CcwxHgTp8V-/?utm_source=ig_embed&ig_rid=ce5ea17d-f98e-40da-a220-44bb596675f4
या चित्रपटाच्या हिंदी रीमेकवर देखील काम सुरु आहे. यात मुख्य भूमिका अक्षय कुमार करत आहे. तर चित्रपटात त्याच्यासोबत राधिका मदान झळकेल. अलीकडेच अक्षयनं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर करून चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. हे देखील वाचा: OTT वर 90 चं दशक गाजवलेल्या हिरोइन्सची जादू; पाहा कोणी केलाय नव्या फॉरमॅटचा चांगला स्वीकार
या ओटीटीवर बघा चित्रपट
‘सोरारई पोटरु’ चित्रपट नोव्हेंबर 2020 मध्ये रिलीज झाला होता. परंतु कोरोनाच्या साथीमुळे हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट मल्याळम आणि कन्नड भाषेत आहे. ज्यांना हिंदी भाषा समजते ते दर्शक याचं ‘उडान’ नावाचं हिंदी व्हर्जन बघू शकतात. जे एप्रिल 2021 मध्ये रिलीज करून Prime Video गेल्यावर्षी 4 एप्रिलला रिलीज झालं आहे. यासाठी तुम्हाला प्राईम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल किंवा हा चित्रपट 79 रुपयांमध्ये रेंटवर देखील बघता येईल.