10,000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung Galaxy S20+ BTS Edition, जाणून घ्या नवीन किंमत

Samsung ने यावर्षी जुलै मध्ये आपला बहुप्रतीक्षित BTS editions असेलेला Galaxy S20+ स्मार्टफोन सादर केला होता. आता फेस्टिव सीजन पाहता कंपनीने Galaxy S20+ BTS Edition च्या किंमतीत 10,000 रुपयांची कपात केली आहे. कपातीव्यतिरिक्त सॅमसंग तुम्हाला गॅलेक्सी एस 20 + बीटीएस एडिशन वर जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून डिस्काउंट मिळवण्याची संधी देत आहे. तसेच गॅलेक्सी बड्स + वर 43 टक्के सूट पण दिली जात आहे.

नवीन किंमत

Samsung Galaxy S20 BTS Edition कंपनीने 87,999 रुपयांमध्ये सादर केला होता. पण 10,000 रुपयांच्या कपातीनंतर फोन 77,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच एचडीएफसी बॅंककेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास 1,500 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळवता येईल. तसेच ओलामनी पोस्टपेड+, मोबिक्विक सुपरकॅश आणि पेटीएमच्या वापरकर्त्यांना डिस्काउंट मिळेल.

स्पेसिफिकेशन्स

डिजाइनच्या बाबतीत हा फोन एस20 सारखाच आहे पण स्पेसिफिकेशन मध्ये थोडा फरक आहे. फोनची बॉडी ग्लासची बनली आहे आणि दोन्ही बाजुंनी कर्व आहे. या फोन मध्ये 3200 X 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.7 इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. फोन मध्ये क्वॉड एचडी+ एमोलेड 2एक्स इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आली आहे जी एचडीआर 10+ सर्टिफाइड आहे आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. Samsung Galaxy S20+ एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे आणि यात वन यूआई ची लेयरिंग मिळेल. फोन मध्ये तुम्हाला माइक्रोसॉफ्ट ऍप्स व्यतिरिक्त डेक्स सारखे फीचर्स पण मिळतील.

एस20 प्रमाणे हा फोन पण 7 नॅनो मीटर फॅब्रिकेशन असलेल्या एक्सिनोस 910 चिपसेट वर चालतो. यात 2.7गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोन मध्ये 3 5जी वेरियंट आहेत जे 12GB RAM सह 512GB इंटरनल मेमरी, 12GB RAM सह 256GB मेमरी आणि 12GB RAM सह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर 4जी वेरियंट मध्ये 8GB RAM सह 128GB मेमरी देण्यात आली आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 1टीबी पर्यंत मेमरी एक्सपांड करू शकता. पण दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy S20 Plus क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात पण एक सेंसर 64 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे जी एफ/2.0 अपर्चर सह येते. हि पीडीएएफ आणि ओआईएसला सपोर्ट करते. तर दुसरा सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे आणि हा एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करतो. हि लेंस 120 डिग्री पर्यंत अल्ट्रा वाइड लेंसला सपोर्ट करू शकते. तसेच तिसरी लेंस एफ/1.8 अपर्चर सह येते आणि हि 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आहे. त्याचबरोबर हि सुपर स्पीड डुअल पिक्सल आणि ओआईएस ला पण सपोर्ट करते. कंपनीने यात एक अतिरिक्त सेंसर दिला आहे जो डेफ्थविजन चे काम करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी ए20 प्लस मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा फोन 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. यात वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट पण आहे. Galaxy S20+ सॅमसंगने Cosmic Grey, Cloud Blue आणि Cosmic Black कलर मध्ये लॉन्च केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here