240W चार्जिंगसह Realme GT3 28 फेब्रुवारीला येऊ शकतो भारतात

Highlights

  • Realme GT3 28 फेब्रुवारीला MWC 2023 च्या मंचावरून लाँच होईल.
  • या स्मार्टफोनमध्ये 240W Fast Charging टेक्नॉलॉजी दिली जाईल.
  • ही चार्जिंग टेक्नॉलॉजी फक्त 8 मिनिटांत बॅटरी फुल करते.

रियलमीनं अलीकडेच चीनमध्ये आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत 240W Fast Charging टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन Realme GT Neo5 सादर केला आहे. हा सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला फोन आता ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री घेणार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की 28 फेब्रुवारीला MWC 2023 (Mobile World Congress) च्या मंचावरून नवीन Realme GT3 स्मार्टफोन लाँच केला जाईल. रियलमी जीटी3 5जी फोन देखील 240वॉट चार्जिंगसह येईल.

Realme GT3 Launch

मोबाइलचा महामेळावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेक इव्हेंट मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये रियलमी देखील सहभागी होणार आहे. कंपनीनं आज अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की ते 28 फेब्रुवारीला आपला नवीन स्मार्टफोन रियलमी जीटी3 लाँच करतील. हा मोबाइल MWC 2023 च्या मंचावरून ग्लोबली सादर होईल. हा लाँच इव्हेंट स्पेनमध्ये आयोजित केला जाईल जो भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. या कंपनी वेबसाइट सोबतच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पाहता येईल.

240W Fast Charging

240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी रियलमी जीटी3 स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत असू शकते. ही टेक्नॉलॉजी चीनमध्ये लाँच झालेल्या Realme GT Neo5 मध्ये देखील आहे. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की Realme GT3 याच फोनचा ग्लोबल व्हर्जन असू शकतो. 240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या जीवावर जीटी नियो5 मधील 4,600एमएएचची बॅटरी फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज करता येऊ शकते. हे देखील वाचा: Vaalvi OTT release date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘वाळवी’ येणार ओटीटीवर; तारीख ठरली

चीनमधील Realme GT Neo5 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.74″ 144Hz display
  • 16GB RAM + 1TB storage
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Triple Rear Camera

रियलमी जीटी नियो 5 स्मार्टफोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या मोठ्या 1.5के डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1500हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या स्क्रीनवर 100% DCI-P3, 1.07बिलियन कलर्स आणि 5,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात.

Realme GT Neo5 क्वॉलकॉमच्या 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच झाला आहे जो 3.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या मोबाइल फोनमध्ये एड्रेनो जीपीयू 730 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो, तसेच यात LPDDR5X RAM आणि UFS 3.1 ROM टेक्नॉलॉजी आहे.

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.88 अपर्चर असलेला 50MP Sony IMX 890 OIS प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि एफ/3.3 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: सॅमसंगचा बाजार उठणार? OPPO च्या फोल्डेबल फोनची झाली भारतात एंट्री

Realme GT Neo5 ची खासियत म्हणजे फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी. कंपनीनं या फोनचे दोन मॉडेल सादर केले आहेत. एका मॉडेलमध्ये 240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 4,600एमएएच बॅटरी आहे. हा फोन फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकते. तर दुसरा रियलमी जीटी नियो5 150वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here