Samsung ने काल भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन डिवाईस लॉन्च केला आहे. प्रत्येक बजेट मध्ये आपले मोबाईल फोन घेऊन येणाऱ्या या कंपनीने यावेळी मिड बजेट टॅबलेट डिवाईस सादर केला आहे. कंपनीने Samsung Galaxy Tab A7 भारतात लॉन्च केला आहे जो मोठा डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरी सह शानदार फीचर्स सह येतो. सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए7 ची किंमत 17,999 रुपयांपासून सुरु होत आहे जो काल पासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे.
Samsung Galaxy Tab A7
सॅमसंगच्या या नवीन टॅबलेट डिवाईसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मेटल फिनिश सह सादर केला गेला आहे. गॅलेक्सी टॅब ए7 मध्ये 2000 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 10 इंचाची मोठी डब्ल्यूयूएक्सजीए+ टीएफट स्क्रीन देण्यात आली आहे जिच्या चारही बाजूंना सॉफ्ट बेजल्स आहेत. या डिवाईसचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 80 टक्के आहे. टॅबचा फ्रंट पॅनल पूर्णपणे बटनलेस आहे तर हॉरिजॉन्टल ठेवल्यास सेल्फी कॅमेरा वरच्या बाजूला येतो.
Samsung Galaxy Tab A7 कंपनीने एंडरॉयड ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो (4×2.0GHz + 4×1.8GHz) च्या क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर चालतो.भारतात हा डिवाईस एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 3 जीबी रॅमला सपोर्ट करतो. टॅब ए7 मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए7 च्या फ्रंट पॅनल वर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यावर 8 मेगापिक्सल पावर असलेला रियर कॅमेरा देण्यात आला आहे. टॅबच्या बॅक पॅनल वर मधोमध Samsung ची ब्रांडिंग देण्यात आली आहे तसेच इथे इतर कोणताही सेंसर नाही.
Samsung Galaxy Tab A7 च्या साईड पॅनल वर 3.5एमएम जॅक सोबतच यूएसबी टाईप सी पोर्ट आणि चार स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे जी डॉल्बी एटमॉस सराउंड टेक्नॉलॉजी सह येते. तसेच पावर बॅकअपसाठी सॅमसंगचा हा नवीन डिवाईस फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 7,040 एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.
किंमत
Samsung Galaxy Tab A7 भारतात दोन मॉडेल्स मध्ये लॉन्च झाला आहे. डिवाईसच्या Wi-Fi मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे, तर LTE मॉडेल 21,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. हा टॅबलेट Dark Gray, Gold आणि Silver कलर मध्ये विकत घेता येईल. तसेच सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए7 सह दोन महिन्यांचे YoutTube Premium सब्सक्रिप्शन पण मोफत मिळत आहे.
















