तुमच्या बजेटमध्ये बसतायत का सॅमसंगचे Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4? जाणून घ्या भारतीय किंमत

Samsung नं काही दिवसांपूर्वीच टेक मंचावर आपली गॅलेक्सी झेड सीरीज सादर केली होती. या सीरीज अंतगर्त दोन Foldable Phone आले होते जे Samsung Galaxy Z Fold4 आणि Samsung Galaxy Z Flip4 नावानं लाँच झाले होते. आज सॅमसंगनं आपल्या या दोन्ही फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या भारतीय किंमतीची घोषणा केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप4 आणि गॅलेक्सी झेड फोल्ड4 भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झालेत आहेत. सॅमसंगकडून या दोन्ही मोबाइल फोन्सवर शानदार ऑफर्स दिल्या जात आहेत.

Samsung Galaxy Z Flip 4 price

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप4 भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. या फोनचा बेस व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच Samsung Galaxy Z Flip 4 Bespoke Edition देखील भारतीय बाजारात आला आहे जो ग्लास कलरमध्ये येतो. पुढे यांची किंमत आहे.

Samsung Galaxy Z Flip 4 8GB RAM + 128GB Storage: 89,999 रुपये

Samsung Galaxy Z Flip 4 12GB RAM + 256GB Storage: 94,999 रुपये

Samsung Galaxy Z Flip 4 Bespoke Edition: 97,999 रुपये

Samsung Galaxy Z Fold 4 price

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड4 स्मार्टफोनन भारतीय बाजारात तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये आला आहे. हे तिन्ही मॉडेल 12 जीबी रॅमला सपोर्ट करतात. या व्हेरिएंटमध्ये अनुक्रमे 256 जीबी स्टोरेज, 512 जीबी स्टोरेज आणि 1 टीबी स्टोरेज देण्यात आली आहे. Samsung Galaxy Z Fold 4 ची किंमत पुढे आहे.

Samsung Galaxy Z Fold 4 12GB RAM + 256GB Storage: 1,54,999 रुपये

Samsung Galaxy Z Fold 4 12GB RAM + 512GB Storage: 1,64,999 रुपये

Samsung Galaxy Z Fold 4 12GB RAM + 1TB Storage: 1,84,999 रुपये

Samsung Galaxy Z Fold 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 मध्ये 6.2 इंचाचा एचडी+ डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2316 x 904 पिक्सल रेजोल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर फोनच्या आतल्या बाजूस 120Hz रिफ्रेश रेटसह 7.6-इंचाचा QXGA+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे.

फोल्डेबल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen1 चिपसेट देण्यात आला आहे जो एड्रेनो GPU सह मिळून चालतो. Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट क्वॉलकॉमचा लेटेस्ट आणि शक्तिशाली प्रोसेसर आहे. फोनमध्ये 12GB रॅम 256GB/512GB/1TB स्टोरेज मिळते.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ड्युअल पिक्सल एएफ, ओआयएस आणि एफ/1.8 सह 50 एमपीचा प्रायमरी कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 12 एमपीची अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि f/2.4 अपर्चर व पीडीएएफ सह 10 एमपीचा टेलीफोटो कॅमेरा आहे. तर , फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी f/1.8 अपर्चरसह 4MP चा इन-स्क्रीन कॅमेरा आणि कव्हर डिस्प्लेवर f/2.4 अपर्चरसह 10MP चा सेन्सर आणि सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 मध्ये 25W फास्ट चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंगसह 4,400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोल्डेबल फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि एस पेनला सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

Samsung Galaxy Z Flip 4 चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 4 सारखी विलक्षण डिजाईन कुठेही मिळणार नाही. या स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्यात आहेत. एक फोन अनफोल्ड केल्यावर दिसते आणि दुसरी कायम वर असते. सेकंडरी डिस्प्लेवर नोटिफिकेशन्स, टाईम, कॅलेंडर इत्यादी बघता येतात.

Galaxy Z Flip4 ची मेन स्क्रीन 6.7 इंचाचा डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स फ्लॅक्स डिस्प्ले आहे जो फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. तसेच फोनमध्ये 1.9 इंचाचा सेकंडरी सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन IPX8 रेटिंगसह बाजारात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy Z Flip4 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागे दोन 12 मेगापिक्सल सेन्सर देण्यात आले आहेत. प्रायमरी रियर कॅमेरा एक 12MP Ultra Wide Lens आहे जो एफ/2.2 अपर्चरसह येतो. तर एफ/1.8 अपर्चर असलेला 12MP Wide-angle सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 10 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 4 लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे जो सॅमसंगच्या वनयुआय 4.1.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जोडीला 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार करण्यात आलेला Qualcomm Snapdragon 8+ Gen1 चिपसेट आहे. हा मोबाइल फोन 5G, 4G LTE, Wi-Fi आणि Bluetooth v5.2 ला सपोर्ट करतो.

हा फोल्डेबल सॅमसंग स्मार्टफोन जितका स्टायलिश स्टायलिश आणि स्लीक दिसतो. तितकी पावरफुल बॅटरी देखील देण्यात आली आहे. बॅटरीमुळे फोनची जाडीवर फरक पडला नाही. सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप4 फोन 3,700एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here