Apple नंतर आता Samsung ची तयारी, चीन सोडून भारतात करेल स्मार्टफोन्सची निर्मिती

Apple बाबत काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि कंपनी चीनी मधील जवळपास 6 प्रोडक्शन लाईन्स बंद करून त्या भारतात स्थापन करण्याची योजना बनवत आहे, ज्या अंतर्गत iPad, iMac आणि MacBook ची निर्मिती भारतात होईल. कंपनीच्या फ्लॅगशिप फोन iPhone 11 ची निर्मिती पण भारतात सुरु झाली आहे. आता अशी माहिती मिळत आहे कि ऍप्पलच्या या मोठ्या निर्णयानंतर Samsung चे नाव पण या यादीत समाविष्ट होणार आहे. बातमी अशी आहे कि Samsung पण चीन मध्ये आपले प्रोडक्शन बंद करून ते भारतात सुरु करणार आहे.

Samsung संबंधित हि मोठी बातमी इकॉनॉमिक्स टाइम्सच्या माध्यमातून समोर आली आहे. ईटी नुसार सॅमसंग आपले स्मार्टफोन प्रोडक्शन इतर ठिकाणांहून हटवून भारतात आणू शकते. विशेष म्हणजे सॅमसंगने चीन मधील आपल्या तिन्ही प्रोडक्शन फॅसिलिटी आधीच बंद केल्या आहेत तर आता आलेल्या रिपोर्टनुसार कंपनी वियतनाम मध्ये सुरु असलेला प्लांट पण शिफ्ट करून अधिकांश प्रोडक्शन भारतात सुरु करण्याची योजना बनवत आहे.

होईल 3 लाख कोटींची निर्मिती

रिपोर्टनुसार साउथ कोरियन कंपनी सॅमसंग इतर देशांतील आपले प्रोडक्शन बंद करून ते नव्याने भारतात सुरु करणार आहे. Samsung चा हा प्लान 40 बिलियन यूएस डॉलर पर्यंतचा असेल आणि कंपनी आपल्या भारतीय प्लांट्स मध्ये जवळपास 3 लाख कोटी रुपयांचे स्मार्टफोन्स व अन्य डिवाईसेज बनवेल. बोलले जात आहे कि सॅमसंग कंपनीने याबाबत भारत सरकारकडे आपला 5 वर्षांचा प्रोजेक्ट प्लान पण जमा केला आहे जो PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव स्कीम अंतर्गत लागू होईल.

Samsung च्या या 5 वर्षांच्या प्रोडक्शन प्लान अंतर्गत असे सांगण्यात आले आहे कि कंपनी येत्या 5 वर्षांत 40 बिलियन डॉलरचे स्मार्टफोन बनवेल जे वेगवेगळ्या कॅटेगरीचे असतील. रिपोर्टनुसार यातील जवळपास 25 बिलियन डॉलरच्या स्मार्टफोन्सची फॅक्टरी प्राइस 200 यूएस डॉलर पेक्षा जास्त असेल. सांगण्यात आले आहे कि बनवण्यात येणारे बहुतांश स्मार्टफोन परदेशात निर्यात केले जातील. येत्या काळात जगातील वेगवेगळ्या देशांत ‘Made In India’ टॅग असलेले Samsung स्मार्टफोन दिसतील असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

भारत बनू शकतो नंबर वन निर्यातक

सध्या चीन जगातील सर्वात मोठा स्मार्टफोन्सचा निर्यातक देश आहे. म्हणजे सर्वात जास्त मोबाइल फोन्स चीन मध्ये बनतात. चीन नंतर दुसऱ्या नंबर वर वियतनाम येतो. Apple चीनी मार्केट मधून निघाल्यावर चीनची नंबर वनची खुर्ची हातातून सुटेल. तसेच आता Samsung ने वियतनाम मधून प्रोडक्शन शिफ्ट करून भारतात आणल्यामुळे वियतनाम पण टॉप वर राहू शकणार नाही आणि याचा फायदा फक्त भारतातला होईल. सर्व काही नीट झाले तर येत्या काही वर्षांत भारत जगातील सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यातक देश पण बनू शकतो.

मिळतील नोकऱ्या, वाढेल रोजगार

अमेरिकन कंपनी Apple चे भारतात प्रोडक्शन सुरु झाल्यास जवळपास 55,000 नवीन नोकऱ्यांची सुरवात होईल. तसेच Samsung ने भारतात प्रोडक्शन सुरु केले तर देशात लाखो नवीन नोकऱ्या सुरु होतील ज्यामुळे भारतीयांना रोजगार मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here