जर तुम्ही नववर्षात नवीन टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो कि टेक विश्वातील मोठी इलेक्ट्रॉनिक कंपनी एक शानदार ऑफर घेऊन आली आहे. या ऑफर मध्ये तुम्हाला फक्त टीव्हीची किंमत द्यावी लागले आणि एक फोन अगदी मोफत मिळेल. सॅमसंगने भारतात Big TV Days ची घोषणा केली आहे. देशातील सर्व प्रमुख रिटेल स्टोर वर हा सेल सुरु झाला आहे. फ्री फोन सोबतच टीव्हीच्या खरेदीवर 20 टक्के कॅशबॅक, एक्सटेंडेड वॉरंटी ऑफर आणि ईएमआयचा लाभ मिळेल.
या टीव्ही वर ऑफर
ग्राहकांना फक्त 1,990 रुपयांच्या मासिक ईएमआय सह नवीन टीव्ही विकत घेता येईल. हि ऑफर सॅमसंगच्या 55 इंच, 65 इंच, 75 इंच, 82 इंच आणि 85 इंच QLED टीव्ही मॉडेल वर आहे. या सेलचा लाभ 31 जानेवारी पर्यंत घेता येईल.
हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम सह लॉन्च झाला Samsung चा स्वस्त फोन Galaxy M02s, जाणून घ्या किंमत
स्मार्टफोन मिळेल फ्री
या विक्री मध्ये 65 इंचाच्या QLED TV आणि 75 इंचाच्या क्रिस्टल 4K UHD टीव्ही सह सॅमसंगचा 22,999 रुपयांचा Galaxy A51 स्मार्टफोन फ्री दिला जात आहे. इतकेच नव्हे तर 55 इंचाच्या QLED TV आणि 65 इंचाचा क्रिस्टल 4K UHD टीव्ही विकत घेतल्यास ग्राहकांना 18,999 रुपयांचा Samsung Galaxy A31 स्मार्टफोन फ्री दिला जात आहे.
हे देखील वाचा : Samsung नवीन धमाका करण्यास तयार, 14 जानेवारीला लॉन्च करेल पारवरफुल फोन Galaxy S21
साउंडबार पण मिळेल फ्री
या सेल मध्ये 75 इंच, 82 इंच आणि 85 इंच क्यूएलई टीव्ही मॉडेल्स सह साउंडबार HW-Q800T आणि साउंडबार HW-Q900T मोफत मिळत आहेत. यांची किंमत क्रमश: 48,990 रुपये आणि 99,990 रुपये आहे. सॅमसंग Big TV Days सेल 31 जानेवारी 2021 पर्यंत सुरु राहील.