पुन्हा एकदा महाग होणार आहेत स्मार्टफोन! खरेदी करायला उशीर करू नका

Mobile Shop

कोरोना वायरस आणि गुड्स अँड सर्विस टॅक्स (जीएसटी) मध्ये वाढल्यामुळे आधीच वाईट अवस्थेत असेलल्या भारतीय स्मार्टफोन इंडस्ट्रीला अजून एक धक्का बसला आहे. समोर आलेल्या रिपोर्ट नुसार काही दिवसांत ग्राहकांना नवीन स्मार्टफोन विकत घेण्यासाठी आधीपेक्षा जास्त किंमत दयावी लागू शकते. जर तुम्ही पण एक नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर लवकरात लवकर घेऊन टाकण्यात शहाणपणा आहे. रिपोर्टनुसार येत्या काही महिन्यात ऍप्पल, सॅमसंग, वीवो, शाओमी, ओपो आणि रियलमी सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोनच्या किंमती वाढणार आहेत. अजूनतरी याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

यामुळे वाढतील किंमती

सरकारने स्मार्टफोन मध्ये वापरल्या जाणाऱ्या डिस्प्ले आणि टच पॅनलच्या इंपोर्ट वर 10 टक्के इंपोर्ट ड्यूटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर फोन्सची किंमत वाढणे निश्चित असल्याचे बोलले जात आहे. हा नियम एप्रिल मधेच तयार होता पण सरकारने कंपन्यांना भारतात डिस्प्ले बनवणे सुरु करण्यासाठी जास्त वेळ दिला होता.

5 टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत

कंपन्यांनी म्हटले आहे कि किंमतीतील वाढ 1.55 ते 5% दरम्यान असू शकते आणि सणांच्या आधी यामुळे मागणीवर परिणाम होऊ शकतो. सूत्रांनी म्हटले आहे कि सरकारनुसार हि “योग्य वेळ” आहे हि ड्यूटी लावण्याची.

भारतात चार कंपन्या बनवतात डिस्प्ले

सध्या चार कंपन्या आहेत ज्या भारतात डिस्प्लेची निर्मिती करतात, त्यात TCL आणि Holitech चा समावेश आहे. डिस्प्ले वर लागणाऱ्या टॅक्समुळे कशी फोनची किंमत वाढेल हे एका उदाहरणातून समजून घेऊया. पॅनलची किंमत स्मार्टफोनच्या किंमतीच्या जवळपास 15-25% असते. 10% वाढ म्हणजे कि किंमत खूप वाढेल. पॅनलची किंमत वाढल्यास 25,000 रुपयांच्या फोनची किंमत 27,000 रुपये होऊ शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here