एक्सक्लूसिव : सोनी घेऊन येत आहे 4 नवीन फोन, लॉन्चच्या आधी बघा यांचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

सोनी ने घोषणा केली आहे कि कंपनी मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस 2019 मध्ये सहभाग घेत आहे आणि 25 फेब्रुवारीला आपले नवीन स्मार्टफोन व डिवाईस टेक मंचावर सादर करेल. कंपनी यादिवशी कोण कोणते फोन लॉन्च करेल हे सोनी ने अजूनतरी सांगितले नाही पण एमडब्ल्यूसी 2019 ईवेंटच्या आधीच 91मोबाईल्स एक्सक्लूसिव बातमी काढली आहे कि सोनी 25 फेब्रुवारीला कोणते कोणते फोन घेऊन येणार आहे आणि या स्मार्टफोन्स मध्ये कोणते स्पेसिफिकेशन्स असतील. सोनी द्वारा लॉन्च केल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे असतील – सोनी एक्सपीरिया 1, एक्सपीरिया 10, एक्सपीरिया 10 प्लस आणि एक्सपीरिया एल3
चला एक नजर या चारही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स वर टाकूया :

सोनी एक्सपीरिया 1
एक्सपीरिया 1 जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो 21:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल. या फोन मध्ये 6.5-इंचाचा 4के एचडीआर ओएलईडी डिस्प्ले मिळेल जो गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार सोनी एक्सपीरिया 1 कंपनी द्वारा 6जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. सोनी एक्सपीरिया 1 मध्ये एंडरॉयडचा लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई मिळेल त्यासोबत हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालेल.

हा फोन आईपी68 रेटेड असेल तसेच कपंनी फोनच्या उजव्या पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देईल. सोनी चा हा फोन कॅमेरा सेग्मेंट मध्ये खूप खास असणार आहे. सोनी एक्सपीरिया 1 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल ज्यात 12-मेगापिक्सलचे तीन सेंसर दिले जातील. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. सोनी एक्सपीरिया 1 मध्ये 4जी एलटीई व डुअल ​सिम सह 3,300एमएएच ची बॅटरी मिळेल. कपंनी हा फोन इंडियन करंसी नुसार जवळपास 78,000 रुपयांमध्ये (CHF 1,099) लॉन्च करू शकते.

सोनी एक्सपीरिया एल3
सोनी द्वारा लॉन्च केल्या जाणाऱ्या चारही स्मार्टफोन्स मध्ये हा फोन सर्वात स्वस्त असेल. स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला जाईल ज्यात 5.7-इंचाची एचडी+ स्क्रीन असेल. या फोन मध्ये पण साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. कंपनी एक्सपीरिया एल3 3जीबी रॅम वर सादर करेल. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित असेल जो मीडियाटेकच्या एमटीके6762 चिपसेट वर चालेल.

सोनी एक्सपीरिया एल3 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर दिले जातील तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअप साठी एक्सपीरिया एल3 मध्ये 3,300एमएएच ची बॅटरी दिली जाईल. प्राप्त माहितीनुसार सोनी एक्सपीरिया एल3 ची किंमत 14,200 रुपयांच्या (CHF 199) आसपास असेल जो एप्रिल मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

सोनी एक्सपीरिया 10
हा फोन पण 21:9 आस्पे​क्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 6-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. या फोन मध्ये 3जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल जी जिसे माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंन्त वाढवता येईल. एक्सपीरिया 10 सोनी एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड पाई वर सादर करेल, तसेच हा फोन आक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 630 चिपसेट वर चालेल.

सोनी एक्सपीरिया 10 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल ज्यात 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर असेल. त्याचप्रमाणे सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये 2870एमएएच ची बॅटरी मिळेल. सोनी एक्सपीरिया 10 एप्रिल मध्ये 28,400 रुपयांमध्ये (CHF 399) सेल साठी उपलब्ध होईल.

सोनी एक्सपीरिया 10 प्लस
हा फोन एक्सपीरिया 10 चा मोठा वर्जन असेल. एक्सपीरिया 10 प्लस मध्ये 21:9 आस्पे​क्ट रेशियो वॉल 6.5-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळेल. कंपनी हा फोन 4जीबी रॅम सह लॉन्च करेल जो 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. एक्सपीरिया 10 प्लस एंडरॉयड पाई आधारित असेल जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर चालेल.

सोनी एक्सपीरिया 10 प्लस पण डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर असेल. त्याचप्रमाणे सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी मिळेल. सोनी एक्सपीरिया 10 एप्रिल मध्ये 35,500 रुपयांमध्ये (CHF 499) सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here