5G Service - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 07:20:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Adani च्या कंपनीला मिळालं टेलीकॉम सर्व्हिसचं UL (AS) लायसन्स; जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/adani-data-networks-gets-unified-license-for-full-fledge-telecom-services-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/adani-data-networks-gets-unified-license-for-full-fledge-telecom-services-in-india/#respond Wed, 12 Oct 2022 07:32:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13908 इंडियन टेलीकॉम मार्केटमध्ये Jio, Airtel आणि Vodafone idea (Vi) तीन प्रायव्हेट कंपन्या सक्रिय आहेत. सर्वात जास्त सब्सक्राइबर बेससह रिलायन्स जियो आघाडीवर आहे, त्यानंतर एयरटेल आणि विआयचं येतं. 5G Services भारतात सुरु झाल्यानंतर सध्या जियो आणि एयरटेलमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. परंतु आता भारतीय टेलीकॉम बाजार लवकरच बदलणार असं दिसतंय. या तिन्ही कंपन्यांसोबतच अदानी डेटा […]

The post Adani च्या कंपनीला मिळालं टेलीकॉम सर्व्हिसचं UL (AS) लायसन्स; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम मार्केटमध्ये Jio, Airtel आणि Vodafone idea (Vi) तीन प्रायव्हेट कंपन्या सक्रिय आहेत. सर्वात जास्त सब्सक्राइबर बेससह रिलायन्स जियो आघाडीवर आहे, त्यानंतर एयरटेल आणि विआयचं येतं. 5G Services भारतात सुरु झाल्यानंतर सध्या जियो आणि एयरटेलमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. परंतु आता भारतीय टेलीकॉम बाजार लवकरच बदलणार असं दिसतंय. या तिन्ही कंपन्यांसोबतच अदानी डेटा नेटवर्क या नवीन नावाचा देखील समावेश होऊ शकतो. Adani Data Networks कंपनीला UL (AS) लायसन्स मिळालं आहे त्यामुळे देशात टेलीकॉम सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये अंबानींनंतर अदानी देखील दिसू शकतात.

Adani Data Networks बद्दल मोठी बातमी समोर आली आहे की गौतम अदानी यांच्या या कंपनीला भारत सरकार कडून संपूर्ण देशात टेलीकॉम सर्व्हिस देण्याचं लायसन्स मिळालं आहे. अदानी डेटा नेटवर्क्सला यूनिफाइड लायसन्स देण्यात आलं आहे आणि आता ही कंपनी देखील Jio व Airtel प्रमाणे भारतात आपली टेलीकॉम सेवा देऊ शकेल. Adani टेलीकॉम मार्केटमध्ये आल्यामुळे संपूर्ण बाजारावर याचा परिणाम होऊ शकतो आणि यामुळे Mukesh Ambani यांच्या जियो तसेच Sunil Bharti Mittal यांच्या एयरटेलला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: Jio चा टेंशन वाढलं! BSNL नं आणला भन्नाट प्लॅन; स्वस्तात 30 दिवसांसाठी डेली 2GB डेटा आणि फ्री कॉलिंग

How to get 5g service on 4g sim

Adani Data Networks ला मिळालं UL (AS) लायसन्स

मीडिया रिपोर्टनुसार, अदानी डेटा नेटवर्कला यूनिफाइड लायसन्स मिळालं आहे. कंपनीकडून अजूनतरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार भारत सरकारकडून अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड (Adani Enterprises Ltd) च्या Adani Data Networks Ltd (ADNL) युनिटला संपूर्ण देशात टेलीकॉम सर्व्हिस देण्याचा अधिकार मिळाला आहे. हे जर खरं ठरलं तर येत्या काही महिन्यांमध्ये Jio, Airtel आणि Vi सोबतच Adani Sim देखील बाजारात येऊ शकतं.

3 महिने फ्री मिळू शकते 5जी सर्व्हिस

तुम्हाला आठवत असेल की जेव्हा मुकेश अंबानींनी रिलायन्स जियो भारतीय बाजारात आणली होती तेव्हा Jio 4G service अनेक महिन्यांपर्यंत मोफत देण्यात आली होती. फ्री 4जी सिम आणि मोफत 4जी डेटामुळे लोकांनी जियो सिम पटापट खरेदी केले तसेच जियो स्टोर्सवर लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या. अशीच परिस्थती अदानी नेटवर्क सर्व्हिस बद्दल देखील मिळू शकते. बाजारात चर्चा आहे की जियो प्रमाणे Adani 5G service देखील काही महिने फ्री दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 180GB डेटा आणि मोफत OTT सह या कंपनीचा पैसा वसूल प्लॅन; 90 दिवस अनलिमिटेड कॉलिंग

New 5G Smartphone Guide Don’t Miss These 7 Impotent Things

6 वर्षानंतर नव्या कंपनीचं आगमन

सरकारी BSNL सोबत सध्या फक्त तीन प्रायव्हेट कंपन्या Jio, Airtel आणि Vi भारतीय बाजारात सक्रिय आहेत. वोडाफोन आणि आयडिया मिळून विआय तयार झाली आहे यातील सर्वात नवीन नाव रिलायन्स जियोचं आहे. 2016 मध्ये आलेल्या जियोला आज 6 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या सहा वर्षांमध्ये कोणतीही नवीन टेलीकॉम कंपनी भारतीय बाजारात आली नाही. लोकांकडे नवीन ऑप्शन नसल्यामुळे सर्व ऑपरेटर्सचे टॅरिफ प्लॅन्स देखील जवळपास सारखेच झाले आहेत. त्यामुळे Adani च्या रूपात नवीन टेलीकॉम कंपनी बाजारात येणं सामान्य मोबाइल युजर्ससाठी फायजेशीर ठरू शकतं. परंतु यासाठी अदानी टेलीकॉम सर्व्हिसनं व्यावसायिक रित्या सर्व्हिस देणं सुरु करण आवश्यक आहे, ज्याची अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Adani च्या कंपनीला मिळालं टेलीकॉम सर्व्हिसचं UL (AS) लायसन्स; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/adani-data-networks-gets-unified-license-for-full-fledge-telecom-services-in-india/feed/ 0
5G Plans Price: 4G प्रमाणे मोफत मिळणार 5जी सर्व्हिस? बजेटमध्ये बसेल का पुढील महिन्यात येणारं 5G https://www.91mobiles.com/marathi/5g-plans-price-in-india-will-be-similar-to-4g-report-5g-launch-next-month-diwali-2022/ https://www.91mobiles.com/marathi/5g-plans-price-in-india-will-be-similar-to-4g-report-5g-launch-next-month-diwali-2022/#respond Fri, 23 Sep 2022 07:41:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13392 5G Plan Price: 5G पुढील महिन्यात भारतात रोल आउट (5G Service India launch) होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारती एयरटेल (Bharti Airtel) आणि रिलायन्स जियो (Reliance Jio) या भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी घोषणा केली आहे की त्या पुढील महिन्यात म्हणजे Diwali 2022 पासून देशात आपली 5जी सेवा (5G Service) सुरु करतील. 5जी सर्व्हिससाठी ग्राहकांना किती पैसे […]

The post 5G Plans Price: 4G प्रमाणे मोफत मिळणार 5जी सर्व्हिस? बजेटमध्ये बसेल का पुढील महिन्यात येणारं 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Plan Price: 5G पुढील महिन्यात भारतात रोल आउट (5G Service India launch) होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारती एयरटेल (Bharti Airtel) आणि रिलायन्स जियो (Reliance Jio) या भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी घोषणा केली आहे की त्या पुढील महिन्यात म्हणजे Diwali 2022 पासून देशात आपली 5जी सेवा (5G Service) सुरु करतील. 5जी सर्व्हिससाठी ग्राहकांना किती पैसे द्यावे लागतील याबाबत अनेक अंदाज लावले जात आहेत. काहींच्या मते नवीन सेवा टेस्ट करण्यासाठी ग्राहकांना मोफत देण्यात येईल तर काही रिपोर्ट्सनुसार 5G महागडं प्रकरण असू शकतं. याबाबत कोणत्याही टेलीकॉम ऑपरेटरनं मौन सोडलं नाही. परंतु आता एका नवीन रिपोर्टमधून 5G सेवेच्या शुल्काची माहिती समोर आली आहे.

4G प्लॅन इतकी असेल 5G प्लॅनची किंमत

इकोनॉमिक टाइम्स (ईटी) च्या एका रिपोर्टनुसार, रिलायन्स जियो आणि भारती एयरटेल आपल्या 5जी सेवेची किंमत 4जी सेवेच्या किंमती एवढीच ठेवतील. इंडस्ट्रीची माहिती असणाऱ्या अधिकारी आणि विश्लेषकांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की 4G च्या किंमतीत 5G सेवा लाँच करून देशात मोठ्या प्रमाणवर लोकांना 5जी सर्व्हिसवर आणण्यात येईल. हे देखील वाचा: शानदार सेल्फीसाठी 50MP कॅमेरा, मल्टीटास्किंगसाठी 16GB रॅम; Vivo चा नवीन 5G Smartphone लाँच

5G Plans Price In India Will Be Similar To 4G Report 5G Launch Next Month Diwali 2022

टेलीकॉम कंपन्या सुरुवातीला 5जी सेवांसाठी ग्राहकांकडून जास्त पैसे घेणार नाहीत कारण त्यांना 4 जी युजर्सना पुढील पिढीच्या मोबाइल नेटवर्कवर येण्यासाठी प्रेरित करायचं आहे. रिपोर्टमध्ये तज्ज्ञांचा हवाला देत संकेत देण्यात आला आहे की 5G लाँचनंतर किंमत वाढवली जाईल. परंतु हे लवकर होणार नाही कारण 5G हँडसेट अजूनही महाग आहेत.

5G price in India बद्दल तज्ज्ञांचं मत

Analysys Mason चे भारतीय प्रमुख रोहन धमीजा यांनी म्हटलं आहे, “5जी ऑपरेटर सुरुवातीला 4जी पेक्षा प्रीमियम चार्ज करण्याची शक्यता नाही कारण सुरुवातीला त्यांचं लक्ष 5जी वापर वाढवणे, जास्त युजर्सना वेगाचा अनुभव देणं, जास्त डेटा वापरणं आणि त्यामुळे एआरपीयू वाढवण्यावर असेल.” हे देखील वाचा: शानदार सेल्फीसाठी 50MP कॅमेरा, मल्टीटास्किंगसाठी 16GB रॅम; Vivo चा नवीन 5G Smartphone लाँच

5G Plans Price In India Will Be Similar To 4G Report 5G Launch Next Month Diwali 2022

धमीजा यांनी यूकेचं उदाहरण देत सांगितलं की तिथे 5जी सेवा 4जी सर्व्हिसपेक्षा जास्त किंमतीत लाँच करण्यात आली होती परंतु तिथे 5जीचा वापर वाढवण्यासाठी किंमती कमी कराव्या लागल्या.

या देशांमध्ये लोक वापरात आहेत 5जी

भारतात जरी 5G आता येत असलं तर जगभरातील अनेक देश आधीपासून ही सेवा वापरत आहेत. सध्या अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपियन देशांमध्ये लोकांना 5जी सर्व्हिस मिळत आहे. दक्षिण कोरियामध्ये साल 2018 मध्ये सर्वप्रथम 5जी लाँच झालं होतं. तसेच मे 2019 मध्ये यूके, यूएस आणि स्वित्जरलँडमध्ये 5जी सुरु झालं आहे.

The post 5G Plans Price: 4G प्रमाणे मोफत मिळणार 5जी सर्व्हिस? बजेटमध्ये बसेल का पुढील महिन्यात येणारं 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-plans-price-in-india-will-be-similar-to-4g-report-5g-launch-next-month-diwali-2022/feed/ 0
भारतातील 5G Service सप्टेंबर-ऑक्टबरमध्ये होऊ शकते लाँच; ‘या’ शहरांना मिळेल 5G Internet चा पहिला मान https://www.91mobiles.com/marathi/5g-services-may-start-in-india-in-september-october-said-telecom-minister-ashwini-vaishnaw/ https://www.91mobiles.com/marathi/5g-services-may-start-in-india-in-september-october-said-telecom-minister-ashwini-vaishnaw/#respond Wed, 27 Jul 2022 09:32:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11751 5G in India ची चर्चा गेले कित्येक दिवस सुरु आहे. 26 जुलैपासून भारतात सुरु असलेल्या 5G Spectrum Auction मुळे हे स्वप्न आता सत्यात येत असल्याचं भारतीयांना जाणवत आहे. या लिलावात Reliance Jio, Bharti Airtel, Vodafone India आणि Adani Data Networks यांनी बोली लावली आहे. 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव स्वातंत्र्य दिनाच्या आधी म्हणजे 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचं […]

The post भारतातील 5G Service सप्टेंबर-ऑक्टबरमध्ये होऊ शकते लाँच; ‘या’ शहरांना मिळेल 5G Internet चा पहिला मान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G in India ची चर्चा गेले कित्येक दिवस सुरु आहे. 26 जुलैपासून भारतात सुरु असलेल्या 5G Spectrum Auction मुळे हे स्वप्न आता सत्यात येत असल्याचं भारतीयांना जाणवत आहे. या लिलावात Reliance Jio, Bharti Airtel, Vodafone India आणि Adani Data Networks यांनी बोली लावली आहे. 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव स्वातंत्र्य दिनाच्या आधी म्हणजे 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. तसेच Spectrum allocation पूर्ण होताच सप्टेंबर-ऑक्टोबरपासून भारतात 5G Services सुरु करण्याची योजना आहे. अशी माहिती Telecom Minister Ashwini Vaishnaw यांनी प्रेस कॉफ्रेंसमधून दिली आहे.

भारतात कधी येणार 5जी सर्व्हिस

टेलिकॉम मिनिस्टर Ashwini Vaishnaw यांनी 5G Spectrum Auction च्या पहिल्या दिवशी मीडियाला संबोधित करताना भारतातील 5जी सर्व्हिस कधी सुरु होणार याची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार विक्रमी वेळेत स्पेक्ट्रम अलोकेशन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यासाठी 24 तास दिवस-रात्र काम देखील करत आहे. अश्विनी वैष्णव यांच्या मते स्पेक्ट्रमचा लिलाव स्वातंत्र्य दैनच्या आधी पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे तसेच 14 ऑगस्ट पर्यंत Spectrum allocation पूर्ण होईल.

एकदा स्पेक्ट्रमचं वाटप पूर्ण झालं की केंद्र सरकार 5जी सर्व्हिस सुरु करण्यासाठी जास्त वेळ घेणार नाही. टेलीकॉम मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर लगेचच 5G Network सुरु करण्यात येईल. Ashwini Vaishnaw यांनी स्पष्ट सांगितलं की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपल्याला भारतात 5जी सर्व्हिस मिळेल.

5G Network या शहरांमध्ये सर्वप्रथम मिळणार

सप्टेंबर-ऑक्टोबरपासून भारतात 5जी सर्व्हिस सुरु होईल. DoT म्हणजे Department of Telecommunications नुसार देशात 13 अशी शहरं आहेत जिथे सर्वप्रथम 5जी नेटवर्क सादर करण्यात येईल. या शहरांच्या यादीत Mumbai, Pune Ahmedabad, Bengaluru, Chandigarh, Chennai, Delhi, Gandhinagar, Gurugram, Hyderabad, Jamnagar, Kolkata आणि Lucknow चा समावेश आहे. परंतु केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आली नाही.

5G Spectrum Auction मध्ये काय घडलं

समोर आलेल्या माहितीनुसार 5जी स्पेक्ट्रम लिलावाच्या पहिल्या दिवशी चार फेऱ्या झाल्या. दरम्यान मिडबँड आणि हायबँडमध्ये कंपन्यांनी जास्त रस दाखवला आहे. 3300 मेगाहर्ट्ज आणि 26 गीगाहर्ट्ज बँड सोबतच 700 मेगाहर्ट्ज बँडवर जास्त बोली लागली आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की पहिल्या दिवशी 1.45 लाख कोटी रुपयांची बोली लागली आहे. पुढील दिवसांमध्ये कंपन्या जास्त सक्रिय होऊ शकतात.

4.3 लाख कोटी रुपयांचं 5G Spectrum

26 जुलैला सुरु झालेला स्पेक्ट्रमचा लिलाव 14 ऑगस्टला संपेल आणि यात 4.3 लाख कोटी रुपयांच्या 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव होईल. यात 4.3 लाख कोटी रुपयांच्या एकूण 72 गीगाहर्ट्ज स्पेक्ट्रमचा समावेश असेल जे 20 वर्षांसाठी देण्यात येईल. या ऑक्शनमध्ये 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz तसेच 2300 MHz फ्रीक्वेंसी असलेले लो बँड्स, 3300 MHz मिड फ्रीक्वेंसी बँड्स तर 26 GHz High frequency bands चा समावेश असेल. 5जी स्पेक्ट्रम ऑक्शननंतर भारत सरकारला जवळपास 80,000 ते 1 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणं अपेक्षित आहे.

The post भारतातील 5G Service सप्टेंबर-ऑक्टबरमध्ये होऊ शकते लाँच; ‘या’ शहरांना मिळेल 5G Internet चा पहिला मान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-services-may-start-in-india-in-september-october-said-telecom-minister-ashwini-vaishnaw/feed/ 0