Android Q - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Android 10 झाला रिलीज, हे आहेत याचे शानदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/android-10-stable-build-released-for-pixel-phones-with-new-features/ https://www.91mobiles.com/marathi/android-10-stable-build-released-for-pixel-phones-with-new-features/#respond Wed, 04 Sep 2019 12:15:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5215 Android 10 मध्ये वाइड थार्क थीम देण्यात आली आहे

The post Android 10 झाला रिलीज, हे आहेत याचे शानदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गूगल ने यावर्षी मे मध्ये आयोजित वार्षिक Google I/O 2019 मध्ये एंडरॉयडची सर्वात नवीन ऑपरेटिंग सिस्टम सादर केली होती. जिला अलीकडेच Android 10 चे नाव देण्यात आले होते. आता Android 10 सर्व पिक्सल फोन साठी रिलीज करण्यात आली आहे.

पिक्सल सीरीज मध्ये Pixel 3, Pixel 3 XL, Pixel 3a, Pixel 3a XL, Pixel 2, Pixel 2 XL, Pixel, आणि Pixel XL चा समावेश आहे. यूजर्स ओवर द एयर अपडेटच्या रोल आउट वाट बघू शकतात किंवा तुमच्याकडे ओटीए अपडेट फाइल्स साइडलोड करण्याचा पण ऑप्शन आहे.

विशेष म्हणजे यादी एंडरॉयड 10 यावर्षी मार्च महिन्यात Android 10 बीटा प्रोग्रामच्या नावाने सादर केला गेला होता. कंपनीने नेक्स्ट जेनरेशनच्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे नाव Android Q नाही तर Android 10 ठेवले होते. याद्वारे गूगल ने आपली 10 वर्ष जुनी परंपरा स्वतः तोडली. कंपनीने हि नवीन ऑपरेटिंग सिस्टम कंपनीने यूजर्सना समजावी म्हणून खूप सोप्पी बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

अशी करा डाउनलोड

जर तुमच्याकडे पिक्सल स्मार्टफोन असेल तर तुम्ही एंड्रॉयड 10 ओटीए अपडेटची वाट बघू शकता किंवा नवीन अपडेट सेटिंग्स > सिस्टम > सिस्टम अपडेट्स मध्ये जाऊन बघू शकता. पिक्सल सीरीज व्यतिरिक्त इतर स्मार्टफोन्स साठी पण लवकरच एंडरॉयड 10 अपडेट सादर केला जाईल.

फीचर्स

Android 10 मध्ये वाइड थार्क थीम देण्यात आली आहे. ज्यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो आणि बॅटरी लाइफ पण वाचते. यूजर्स सेटिंग्स > डिस्प्ले मध्ये जाऊन सिस्टम वाइड डार्क थीम ऍक्टिव्हेट करू शकतात. हे नवीन क्विक सेटिंग्स टाइल किंवा बॅटरी सेवर टर्न ऑन करून पण ऍक्टिव्ह करता येईल. तसेच नवीन ऑपरेटिंग सिस्टम मध्ये अजून चांगले प्राइवेसी कंट्रोल्स देण्यात आले आहेत. सोबतच या नवीन ओएस मध्ये लोकेशन कंट्रोल्स, फोकस मोड, लाइव कॅप्शन आणि बबल नोटिफिकेशन्स सारखे फीचर्स आहेत.

The post Android 10 झाला रिलीज, हे आहेत याचे शानदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/android-10-stable-build-released-for-pixel-phones-with-new-features/feed/ 0
Android Q झाला आहे रिलीज, जाणून घ्या कसा करावा आपल्या फोन मध्ये सर्वात आधी इंस्टाल https://www.91mobiles.com/marathi/google-android-q-beta-3-how-to-download-install-in-phone/ https://www.91mobiles.com/marathi/google-android-q-beta-3-how-to-download-install-in-phone/#respond Wed, 08 May 2019 12:59:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4272 कंपनी ने या ओएसचा लेटेस्ट Android Q beta 3 अपडेट जारी केला आहे.

The post Android Q झाला आहे रिलीज, जाणून घ्या कसा करावा आपल्या फोन मध्ये सर्वात आधी इंस्टाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज गूगल ने कालच आपला सर्वात मोठा वार्षिक समारोह Google I/O 2019 सुरु केला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण संपूर्ण जगातील टेक प्रेमी इया ईवेंटची वाट बघत होते. अमेरिकेतील सॅन फ्रांस्सिको मध्ये आयोजित या ईवेंटच्या पहिल्याच दिवशी गूगल ने नवीन पिक्सल स्मार्टफोन Pixel 3a आणि Pixel 3a XL लॉन्च केला आहेत. पिक्सल फोन सोबत गूगल ने एंडरॉयडची सर्वात नवीन ऑपरेटिंग सिस्टम Android Q पण ग्लोबली रिलीज करण्याची घोषणा केली आहे. 21 स्मार्टफोन्स वर Android 10 म्हणजे Android Q अपडेट करता येईल.

Google ने Android Q चा बीटा वर्जन आफिशियली रिलीज केला आहे. Google I/O 2019 मध्ये गूगल ने घोषणा केली आहे कि गूगलच्या पिक्सल फोन मध्ये एंडरॉयड 10 चा नवीन अपडेट आज पासून मिळेल तसेच येत्या काही दिवसांत इतर स्मार्टफोन ब्रांड्स पण आपल्या डिवाईस वर हा वर्जन अपडेट करू शकतील. विशेष म्हणजे गूगल Android Q चा बीटा वर्जन आधीच सादर केला गेला आहे पण काल Google I/O 2019 मध्ये कंपनी ने या ओएसचा लेटेस्ट Android Q beta 3 अपडेट जारी केला आहे.

विशेष म्हणजे Android Q beta 3 वर्जन फक्त डेवलेपर्स नव्हे तर सामान्य स्मार्टफोन यूजर्स साठी पण आहे. गूगलने 21 स्मार्टफोन्सची यादी शेयर केली आहे ज्यांना इतारांच्या आधी नवीन एंडरॉयड ओएस अपडेट मिळेल. Android Q beta 3 वर्जन OTA म्हणजे ओवर द एयर सोबत System Image Flash द्वारे पण डाउनलोड केला जाऊ शकतो.

जर तुम्हाला त्या 21 स्मार्टफोन्सची ज्यांना Android Q beta 3 अपडेट मिळाला आहे त्यांची यादी हवी असेल, तर इथे क्लिक करा

चेक करा Android Q चा नवा अपडेट
सर्वात आधी ओटीए द्वारे तुमच्या फोन मध्ये Android Q beta 3 चा अपडेट उपलब्ध आहे कि नाही ते बघा. त्यासाठी :
1. स्मार्टफोनची सेटिंग्स ओपेन करा आणि तिथे ‘सिस्टम’ ऑप्शन वर क्लिक करा
2. सिस्टम मध्ये ‘अबाउट फोन’ चा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा
3. तिथे सर्वात खाली ‘एंडरॉयड वर्जन’ मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर समजेल कि तुमच्या फोन मध्ये कोणता एंडरॉयड वर्जन चालू आहे.
4. ‘अबाउट फोन’ मध्येच एंडरॉयड सिक्योरिटी पॅचचा ऑप्शन देण्यात आला आहे, त्यावर क्लिक करा.
5. जर तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड क्यू चा अपडेट उपलब्ध असेल तर डाउनलोड एंड इंस्टालचा ऑप्शन येईल. त्यावर क्लिक करा.

असा करा Android Q वर अपडेट
1. ‘अबाउट फोन’ मध्ये जर Android Q अपडेट OTA द्वारे आला असेल तर या फोन मध्ये डाउनलोड करा.
2. गूगलने खास सांगितले आहे कि Android Q वर फोन अपडेट कारण्याआधी फोनचा बॅकअप जरूर घ्या.
3. तसेच नवीन एंडरॉयड वर्जनची फाइल साईज 1 जीबी पेक्षा जास्त असू शकते, त्यामुळे फोन वाईफाई शी कनेक्ट केला तर उत्तम.
4. डाउनलोड एंड इंस्टाल वर टॅप करा, नवा अपडेट डाउनलोड होण्यास सुरु होईल.

अशी करा सिस्टम ईमेज डाउनलोड Android Q
जर तुमच्या फोन मध्ये Android Q beta 3 चा OTA अपडेट आला नसला तर या नवीन ओएस ची System Image आपल्या फोन मध्ये इंस्टाल करून एंडरॉयड क्यू वर पण अपडेट करु शकता. त्यासाठी :

1. developer.android.com वेबसाइट वर जाऊन Android Studio सेग्मेंट उघड आणि SDK Manager वर क्लिक करा
2. तिथे तुम्हाला Android Q Beta चे पॅकेज मिळेल, त्यात सिस्टम ईमेज निवडा. जी Google APIs Intel x86 Atom System Image नावाने मिळेल.
3. एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट वर्जनची फाईल सिलेक्ट करा, ती इंस्टाल व्हायला सुरवात होईल.
4. सिस्टम ईमेज डाउनलोड झाल्यानंतर टूल्स मधील AVD Manager मध्ये जाऊन नवीन AVD बनावा.
5. नवीन AVD फाईल डबल क्लिक करा, हि फ्लॅश ईमेज इंस्टाल होण्यास सुरु होईल.

The post Android Q झाला आहे रिलीज, जाणून घ्या कसा करावा आपल्या फोन मध्ये सर्वात आधी इंस्टाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-android-q-beta-3-how-to-download-install-in-phone/feed/ 0
आला एंडरॉयड Q, जाणून घ्या आपल्या फोन मध्ये सर्वात आधी कसा इंस्टाल करावा https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-and-install-latest-os-android-q-in-smartphone-google-pixel-ota-update-new-features/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-and-install-latest-os-android-q-in-smartphone-google-pixel-ota-update-new-features/#respond Thu, 14 Mar 2019 14:52:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3864 ओटीए व्यतिरिक्त एंडरॉयड क्यू बीटाचा फ्लॅश वर्जन पण मॅन्यूअली फोन मध्ये डाउनलोड करून इंस्टाल केला जाऊ शकतो.

The post आला एंडरॉयड Q, जाणून घ्या आपल्या फोन मध्ये सर्वात आधी कसा इंस्टाल करावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस असो वा शाओमी, सॅमसंग असो वा ओपो—वीवो सर्व कंपन्या आपले स्मार्टफोन्स एकपेक्षा एक स्पेसिफिकेशन्स सह बाजारात आणतात. ये स्मार्टफोन स्पेसिफिकेशन्ससोबत स्टाईल, लुक आणि फीचर्स मध्ये पण एकमेकांना टक्कर देतात. कोणी प्रोसेसर मध्ये पुढे असतो तर कोणी कॅमेरा डिपार्टमेंट मध्ये टक्कर देतो. पण सर्व स्मार्टफोन मध्ये जीव ओतण्याचे काम करते ते म्हणजे फोनची एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम. हा एंडरॉयड ओएस गूगल कडून येतो जो सर्व एंडरॉयड स्मार्टफोन्सना चालवण्यासाठी प्लॅटफॉर्म देतो. आतापर्यंत बाजारात एंडरॉयडची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 म्हणजे एंडरॉयड पाई होती. पण आज टेक दिग्गज गूगल ने टेक मंचावर आपला सर्वात नवीन आणि एंडरॉयड ओएस एंडरॉयड क्यू सादर केला आहे. गूगलने एंडरॉयड क्यू चा बीटा वर्जन जाहीर केला आहे, जो स्मार्टफोन मध्ये डाउनलोड साठी तयार आहे. जर तुम्ही पण त्या लोकांपैकी असाल ज्यांना आपला स्मार्टफोन सर्वात नवीन अपडेटने सुसज्ज ठेवायला आवडते तर पुढे आम्ही हेच सांगितले आहे कि कशाप्रकारे सर्वात आधी एंडरॉयड क्यू आपल्या फोन मध्ये डाउनलोड केला जाऊ शकतो.

सर्वात आधी सांगायचे म्हणजे गूगल आता एंडरॉयड क्यू बीटा वर्जनच सादर केला आहे. हा वर्जन खासकरून डेवलेपर्स आणि त्या लोकांसाठी आहे ज्यांना सामान्य लोकांपर्यत पोहचण्याआधी एंडरॉयड क्यू हवा आहे. एंडरॉयड क्यू बीटा वर्जन गूगल द्वारा ओटीए म्हणजे ओवर द एयर पद्धतीने स्मार्टफोन यूजर्स पर्यंत पोचवला जात आहे. कंपनीने हा एंडरॉयड क्यू बीटा वर्जन पिक्सल 3, पिक्सल 3 एक्सएल, पिक्सल 2, पिक्सल 2 एक्सएल, पिक्सल आणि पिक्सल एक्सएल स्मार्टफोन वर सादर केला आहे. ओटीए व्यतिरिक्त एंडरॉयड क्यू बीटाचा फ्लॅश वर्जन पण मॅन्यूअली फोन मध्ये डाउनलोड करून इंस्टाल केला जाऊ शकतो.

तुमच्या फोन मध्ये पण आला आहे का एंडरॉयड क्यू अपडेट
वर सांगितल्याप्रमाणे एंडरॉयड क्यू अपडेट गूगल द्वारा ओटीए द्वारा पाठवत आहे. यासाठी सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोन मध्ये एंडरॉयड क्यू चा अपडेट आला आहे कि नाही ते जाणून घ्या. यासाठी :
1. स्मार्टफोनची सेटिंग्स ओपन करा आणि तिथे ‘सिस्टम’ ऑप्शन वर क्लिक करा
2. सिस्टम मध्ये ‘अबाउट फोन’ चा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा
3. तिथे सर्वात खाली ‘एंडरॉयड वर्जन’ मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर समजले कि तुमच्या फोन मध्ये कोणता एंडरॉयड वर्जन आहे.
4. ‘अबाउट फोन’ मध्येच एंडरॉयड सिक्योरिटी पॅचचा ऑप्शन देण्यात आला आहे, त्यावर क्लिक करा.
5. जर तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड क्यू चा अपडेट उपलब्ध झाला असेल तर डाउनलोड अँड इंस्टालचा ऑप्शन येतील. त्यावर क्लिक करा.

डुअल डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेऱ्यासह येत आहे हुआवईचा नवीन फोन, येईल लवकरच

एंडरॉयड क्यू ने फोन कसा करावा अपडेट
1. ‘अबाउट फोन’ मध्ये जर एंडरॉयड क्यू चा अपडेट ओटीए द्वारे आला असेल तर तो फोन मध्ये डाउनलोड करा.
2. गूगलने सांगतिले आहे कि एंडरॉयड क्यू ने फोन अपडेट करण्याआधी फोनचा बॅकअप नक्की घ्या.
3. तसेच नवीन एंडरॉयड वर्जनची फाइल साईज 1 जीबी पेक्षा जास्त असू शकते, त्यामुळे फोन वाईफाई शी कनेक्ट केलेले चांगले.
4. डाउनलोड अँड इंस्टाल वर टॅप करा, नवीन अपडेट डाउनलोड होण्यास सुरवात होईल.

32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि या दमदार प्रोसेसर सह आला हुआवई नोवा 4ई

एंडरॉयड क्यू चे फीचर्स पाहता यात फुल फंक्शन वाईड डार्क थीम मिळेल. हा ओएस डेस्कटॉप मोड, परमिशन रीवॅम्प, एक्सेसिबिलिटी फीचर्स आणि नवीन व आर्कषक डेवलेपर्स ऑप्शन्स मिळतील. विशेष म्हणजे गूगल आपल्या नवीन एंडरॉयड ओएस ला सर्वात आधी कंपनीच्या पिक्सल फोन मध्ये अपडेट करते. यावेळी पण एंडरॉयडची नवी ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड ‘क्यू’ नवीन गूगल पिक्सल मध्येच सर्वात आधी मिळेल. तसेच एंडरॉयड क्यू आफिशियली कधी बाजारात येईल आणि कोणत्या स्मार्टफोन्स याचा अपडेट मिळेल यासाठी थोडी वाट बघावी लागेल.

एंडरॉयड क्यू च्या डाउनलोड संबंधित सविस्तर माहितीसाठी (इथे क्लिक करा)

The post आला एंडरॉयड Q, जाणून घ्या आपल्या फोन मध्ये सर्वात आधी कसा इंस्टाल करावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-and-install-latest-os-android-q-in-smartphone-google-pixel-ota-update-new-features/feed/ 0
गूगलने सादर केला एंडरॉयड Q चा बीटा एडिशन, आजच करू शकता आपल्या फोन मध्ये डाउनलोड https://www.91mobiles.com/marathi/google-rollout-android-q-beta-edition/ https://www.91mobiles.com/marathi/google-rollout-android-q-beta-edition/#respond Thu, 14 Mar 2019 10:44:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3854 एंडरॉयड क्यू बीटा एडिशन आज पासून गूगल पिक्सल सीरीजच्या सर्व डिवाइस मध्ये डाउनलोड करता येईल.

The post गूगलने सादर केला एंडरॉयड Q चा बीटा एडिशन, आजच करू शकता आपल्या फोन मध्ये डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी गूगल ने एंडरॉयड पी सादर केला होता ज्याला कंपनीने पाई चे नाव दिले. सध्या एंडरॉयड 9 पाई कंपनीची लेटेस्ट मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे. परंतु गूगल ने याच्या अपग्रेडची तयारी केली आहे आणि याचा बीटा व्हर्जन सादर पण केला आहे. कंपनी ने आज Android Q चा बीटा एडिशन लॉन्च केला आहे आणि सोबत या ओएस च्या अनेक नवीन फीचर्सची पण माहिती दिली आहे. सर्वात खास बाब अशी कि जरी अधिकृतपणे अजून लॉन्च झालेला नसला तरी तुम्ही आताच तुमच्या फोन मध्ये हा डाउनलोड करू शकता. गूगल द्वारा एंडरॉयड क्यू ची माहिती आपल्या डेवलपर्स पेज द्वारे देण्यात आली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे कि एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम चे नाव नेहमी एखाद्या मिठाईच्या नावे ठेवले जाते. यावेळी पण ठेवले जाईल पण कंपनीने अजूनतरी मिठाईचे नाव सांगितले नाही. नवीन ऑपरेटिंग सिस्टमला आता एंडरॉयड क्यू म्हटले जात आहे.

गूगल ने एंडरॉयड क्यू चा बीटा एडिशन लॉन्च करताना म्हटले आहे कि “2019 मोबाईल इनोवेशन सर्वात जास्त आहे. 5जी पासून मोबाईल फोन मध्ये ऐज टू ऐज डिस्प्ले आणि फोल्डेबल फोन सारखी टेक्नॉलॉजी दिसत आहे आणि एंडरॉयड या सर्वांमध्ये आहे. यासाठी आमच्या सर्व पार्टनर्सचे आभार मानू इच्छितो ज्यांनी हार्डवेयर आणि सॉफ्टवेयरच्या मदतीने एंडरॉयड अजून चांगला करण्यास मदत केली आहे.”

नवीन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम क्यू मध्ये कंपनी ने सिक्योरिटी वर लक्ष दिले आहे. कंपनीने म्हटले आहे कि “एंडरॉयड आता मोठे झाला आहे आणि त्यामुळे आम्ही अनेक असे फीचर्स सादर केले आहेत जे यूजर्सच्या सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे आहेत.” कंपनीने यासाठी फाइल बेस्ट इन्क्रिप्शन सादर केले आहे. त्याचबरोबर सेंसेटिव डेटा ऍक्सेस करण्यासाठी यूजर्स कडून परमिशन रिक्वेस्ट पण सादर केली आहे. आता जर माइक आणि कॅमेरा इत्यादी बॅकग्राउंड मध्ये ऍक्सेस करायचा असेल तर परवानगी घ्यावी लागेल.

हे देखील वाचा: जियोफोन 2 ला टक्कर देण्यास या भारतीय कंपनीने लॉन्च केला फोन, किंमत 2 हजार पेक्षा पण कमी

लोकेशन शेयर बद्दल पण यूजर नेहमीच प्रश्न विचारतात आणि याला प्राइवेसीशी पण जोडले जाते. यावेळी कंपनी ने यावर थोडे कडक भूमिका घेतली आहे आणि आता प्रत्येक ऍपला लोकेशन ऍक्सेस करण्यासाठी तुमच्याकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. अनेक ऍप बॅकग्राउंड मध्ये पण लोकेशन घेतात त्यामुळे एंडरॉयड क्यू यूजर ते थांबवू शक्यता आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ऍक्सेसची अनुमती देऊ शकतात.

एंडरॉयड क्यू मध्ये फाइल शेयर आणि फाइल फोल्डर ऍक्सेस मध्ये पण यूजरच्या हातात नियत्रंण जास्त असेल. आता स्वतःहून ठेवता येईल कि कोणती डाउनलोडेड फाइल ऍप्स ऍक्सेस करू शकतात आणि कोणती नाही. विशेष एंडरॉयड क्यू चा बीटा व्हर्जन सादर करण्यासोबतच गूगल ने याचा ‘लोगो’ पण समोर आणला आहे.

हे देखील वाचा: एकाच दिवसात विकले गेले जवळपास 2 अब्ज रुपयांचे रियलमी 3 फोन, शाओमीला फुटला घाम

फोल्डेबल फोन आणि मोठी स्क्रीनचे डिवाइस पाहता यूआई मध्ये पण काफी बदल करण्यात आले आहेत. होम स्क्रीन वर ऍप्स नोटिफिकेशन तुम्ही सहज कंट्रोल करू शकाल. असे अनेक चांगले फीचर्स तुम्हाला गूगलच्या नवीन मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड क्यू मध्ये मिळतील. एंडरॉयड क्यू बीटा एडिशन आज पासून गूगल पिक्सल सीरीजच्या सर्व डिवाइस मध्ये डाउनलोड करता येईल.

The post गूगलने सादर केला एंडरॉयड Q चा बीटा एडिशन, आजच करू शकता आपल्या फोन मध्ये डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-rollout-android-q-beta-edition/feed/ 0
समोर आला एंडरॉयडचा नवीन ओएस एंडरॉयड Q, बघा कसे असतील नवीन फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/android-q-top-features-leaks-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/android-q-top-features-leaks-in-marathi/#respond Thu, 14 Mar 2019 10:07:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3851 एंडरॉयड क्यू सोबत तुम्हाला अनेक प्रकारचे नवीन फीचर्स मिळतील.

The post समोर आला एंडरॉयडचा नवीन ओएस एंडरॉयड Q, बघा कसे असतील नवीन फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्हाला तर माहित आहे आहे कि दरवर्षी गूगल आपली मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयडचा अपडेट सादर करतो आणि ओएसचे नाव इंग्लिश अल्फाबेट वर आधारित असते. नंतर कंपनी याला डेझर्टचे नाव देते. गेल्यावर्षी एंडरॉयड 9 सादर केला गेला होता ज्याला आधी एंडरॉयड पी आणि नंतर 9 पाई चे नाव देण्यात आले. आता कंपनी नवीन वर्षात एंडरॉयड 10 आणणार आहे ज्याला क्यू चे नाव दिले जाईल. आता पर्यंत याबद्दल कोणतीही माहिती नव्हती पण एक्सडीए डेवलपर्स ने याचा पहिला लीक प्रकाशित केला आहे आणि एंडरॉयड क्यू बद्दल बरीच माहिती दिली आहे. लीक रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि एंडरॉयड क्यू सोबत तुम्हाला अनेक प्रकारचे नवीन फीचर्स मिळतील.

सिस्टम वाईड डार्क थीम
डार्क थीमची सुरवात कंपनी ने एंडरॉयड 9 पाई पासून केली होती पण नवीन ओएस मध्ये तुम्हाला फुल फंक्शन डार्क मोड मिळेल. लीक पोस्ट मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे कि हा फीचर फोनच्या डिस्प्ले सेटिंग मध्ये मिळेल. हा एनेबल करण्यासाठी तुम्हाला सेट डार्क मोडचा पर्याय निवडावा लागेल. तसेच लीक मध्ये असा पण दावा केला गेला आहे कि तुम्ही डार्क मोड ऑलवेज एनेबल किंवा एखाद्या ठराविक वेळ आणि दिवसानुसार सेट करू शकता. एनेबल करताच ऍप्स, नोटिफिकेशन आणि क्रोम सहित तुम्हाला प्रत्येक ऍप मध्ये डार्क मोड मिळेल. याचा फायदा असा असेल कि अनेक मोबाईल फोन मध्ये बॅटरी बॅकअप सुधारेल. कंपन्या आज ओएलईडी डिस्प्लेचा वापर करत आहेत आणि डार्क मोड त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.

परमिशन रीवॅम्प
गूगल ने एंडरॉयड पी मध्ये सिक्योरिटी आणि प्राइवेसी साठी मोठे बदल केले होते पण एंडरॉयड क्यू मध्ये यापेक्षा चांगले बदल तुम्हाला दिसतील. लीक मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार कंपनी परमिशन रीवॅम्प नवीन ओएस मध्ये सादर करणार आहे. यात तुम्ही ऍप्स परमिशन पुन्हा चेक करू शकता आणि त्या रिस्ट्रिक्ट करू शकता. परमिशन ऍप मधून तुम्ही सर्व ऍप बघू शकता.

डेस्कटॉप मोड
इथे तुम्ही म्हणू शकता कि गूगल ने अजून एक फीचर सॅमसंगकडून चोरले आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी नोट 8 पासून डेक्स फीचरची सुरवात करण्यात आली होती ज्यात तुम्ही तुमचा फोन केबल द्वारे कोणत्याही मोठ्या स्क्रीनशी कनेक्ट करू शकता. असे करताच फोनचा संपूर्ण कंटेंट स्क्रीन वर येईल आणि तुम्ही डेस्कटॉप प्रमाणे त्याचा वापर करू शकाल. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये हे अजून सोप्पे झाले आहे. गूगल एंडरॉयड क्यू मध्ये हे फीचर आणणार आहे. लीक मधून संपूर्ण माहिती समोर आली आहे.

नवीन डेवलपर्स ऑप्शन
गूगल एंडरॉयड क्यू च्या लीक मध्ये याचा दावा केला गेला आहे कि डेवलपर्स ऑप्शन मध्ये तुम्हाला अनेक नवीन फीचर्स मिळतील. यात एखादा ऍप थोडा वेळ प्रेस करून ठेऊन तुम्ही मल्टीविंडोजचा वापर करू शकता.

त्याचबरोबर गेम अपडेट पॅकेज प्रिफरेंस पण दिसेल. तुम्ही स्वतः ग्राफिक्स ड्राइवर निवडू करू शकता. याने गेमिंग परफॉर्मेंस सुधरेल. या फीचर फ्लॅगची सुरवात गूगल ने एंडरॉयड 9 पाई पासून केली होती. इथून तुम्ही बघू शकता कि कोणते नवीन फीचर ओएस मध्ये तुम्हाला मिळतील. तसेच एंडरॉयड क्यू मध्ये फीचर फ्लॅग मध्ये खूप नवीन फीचर्स तुम्हाला मिळतील. जसे कि आता कंपनी स्क्रीन शॉट सोबत स्क्रीन रिकॉर्डिंग पण देईल. हुआवई फोन मध्ये हे यूआई द्वारे आधीच उपलब्ध झाले आहे पण गूगल नवीन ओएस सोबत हे सादर करणार आहे.

एक्सेसिबिलिटी
या एंडरॉयड मध्ये एक्सेसिबिलिटी मध्ये पण अनेक नवीन फीचर्स तुम्हाला मिळतील. कंपनी ने टाइम टू टेक ऍक्शन आणि टाइम टू रीड सारखे मोड सादर केले आहेत. ज्यात तुम्ही सेट करू शकता कि किती वेळ मेसेज तुमच्या नोटिफिकेशन स्क्रीन वर दिसेल. ठराविक वेळेनंतर स्वतःहून तो निघून जाईल. असेच काही नवीन फीचर्स ऐक्सेसिबिलिटी मध्ये आहेत.

The post समोर आला एंडरॉयडचा नवीन ओएस एंडरॉयड Q, बघा कसे असतील नवीन फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/android-q-top-features-leaks-in-marathi/feed/ 0