Android 10 झाला रिलीज, हे आहेत याचे शानदार फीचर्स

गूगल ने यावर्षी मे मध्ये आयोजित वार्षिक Google I/O 2019 मध्ये एंडरॉयडची सर्वात नवीन ऑपरेटिंग सिस्टम सादर केली होती. जिला अलीकडेच Android 10 चे नाव देण्यात आले होते. आता Android 10 सर्व पिक्सल फोन साठी रिलीज करण्यात आली आहे.

पिक्सल सीरीज मध्ये Pixel 3, Pixel 3 XL, Pixel 3a, Pixel 3a XL, Pixel 2, Pixel 2 XL, Pixel, आणि Pixel XL चा समावेश आहे. यूजर्स ओवर द एयर अपडेटच्या रोल आउट वाट बघू शकतात किंवा तुमच्याकडे ओटीए अपडेट फाइल्स साइडलोड करण्याचा पण ऑप्शन आहे.

विशेष म्हणजे यादी एंडरॉयड 10 यावर्षी मार्च महिन्यात Android 10 बीटा प्रोग्रामच्या नावाने सादर केला गेला होता. कंपनीने नेक्स्ट जेनरेशनच्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे नाव Android Q नाही तर Android 10 ठेवले होते. याद्वारे गूगल ने आपली 10 वर्ष जुनी परंपरा स्वतः तोडली. कंपनीने हि नवीन ऑपरेटिंग सिस्टम कंपनीने यूजर्सना समजावी म्हणून खूप सोप्पी बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

अशी करा डाउनलोड

जर तुमच्याकडे पिक्सल स्मार्टफोन असेल तर तुम्ही एंड्रॉयड 10 ओटीए अपडेटची वाट बघू शकता किंवा नवीन अपडेट सेटिंग्स > सिस्टम > सिस्टम अपडेट्स मध्ये जाऊन बघू शकता. पिक्सल सीरीज व्यतिरिक्त इतर स्मार्टफोन्स साठी पण लवकरच एंडरॉयड 10 अपडेट सादर केला जाईल.

फीचर्स

Android 10 मध्ये वाइड थार्क थीम देण्यात आली आहे. ज्यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो आणि बॅटरी लाइफ पण वाचते. यूजर्स सेटिंग्स > डिस्प्ले मध्ये जाऊन सिस्टम वाइड डार्क थीम ऍक्टिव्हेट करू शकतात. हे नवीन क्विक सेटिंग्स टाइल किंवा बॅटरी सेवर टर्न ऑन करून पण ऍक्टिव्ह करता येईल. तसेच नवीन ऑपरेटिंग सिस्टम मध्ये अजून चांगले प्राइवेसी कंट्रोल्स देण्यात आले आहेत. सोबतच या नवीन ओएस मध्ये लोकेशन कंट्रोल्स, फोकस मोड, लाइव कॅप्शन आणि बबल नोटिफिकेशन्स सारखे फीचर्स आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here