Apple iPhone 11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 28 Apr 2021 14:25:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Apple iPhone 11 वर मिळत आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, तरीही आहे हा तोट्याचा सौदा https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-price-cut-flipkart-discount/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-price-cut-flipkart-discount/#respond Wed, 28 Apr 2021 14:25:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10759 अ‍ॅप्पलच्या दुसऱ्या फोन्स प्रमाणेच या फोनमध्ये पण तुम्हाला 3.5एमएम जॅक मिळत नाही. 3.5एमएम हेडफोन एक चांगली सोय ठरते जी या फोनमध्ये मिळत नाही.

The post Apple iPhone 11 वर मिळत आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, तरीही आहे हा तोट्याचा सौदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple चे iPhone जवळपास सर्वांना आवडतात. काही लोक याची किंमत जास्त असल्यामुळे विकत घेऊ शकत नाहीत, पण जर तुम्हाला पण iPhone विकत घ्यावयाचा असेल आणि महागड्या किंमतीमुळे विकत घेता येत नसेल तर सध्या ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Apple iPhone 11 मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. या फोनच्या 64 GB वेरिएंटची किंमत तसे पाहता 54,900 रुपये आहे पण, डिस्काउंटनंतर फोन 30,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. पण हि सर्वांसाठी चांगली नाही. (Apple iPhone 11 price cut Flipkart discount)

iPhone 11 प्राइस कट

Apple iPhone 11 च्या 64 GB वेरिएंटची ई-कॉमर्स साइट Flipkart वर किंमत 54,900 रुपये आहे, पण हा 14 टक्के डिस्काउंटनंतर 46,999 रुपयांमध्ये मिळत आहे. म्हणजे कि यावर 7901 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. Flipkart Axis Bank Credit Card च्या माध्यमातून पेमेंट केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळत आहे.

Bank of Baroda Mastercard डेबिट कार्डने पहिल्यांदा पेमेंट केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळू शकतो. एक्सचेंज ऑफर पाहता हा स्मार्टफोन 16,500 रुपयांच्या अतिरिक्त डिस्काउंटसह पण मिळत आहे. पण हि डील सर्वांसाठी चांगली नाही.

जर तुमच्याकडे Flipkart Axis Bank Credit Card नसेल तर फोनवर मिळणार एक्सट्रा 5 टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळणार नाही.

तसेच अतिरिक्त अतिरिक्त 16,500 रुपयांच्या डिस्काउंटसाठी पण तुमच्याकडे Bank of Baroda Mastercard डेबिट कार्ड असावा लागेल.

जर तुमच्याकडे हे दोन्ही कार्ड नसतील तर फोन तुम्हाला 46,999 रुपयांना पडेल.

iPhone 11 मधील दोष जे तुम्हाला माहित नाहीत

जुनी डिजाइन

साल 2019 मध्ये आलेला आयफोन 11 कंपनीने मोठ्या नॉचसह सादर केला होता, पण आता मार्केटमध्ये नॉच नसलेले फोन आले आहेत. अनेक मोबाईल निर्माता कंपन्यांनी आपल्या फोनमधून नॉच काढून टाकली आहे.

3.5एमएम जॅक नाही

अ‍ॅप्पलच्या दुसऱ्या फोन्स प्रमाणेच या फोनमध्ये पण तुम्हाला 3.5एमएम जॅक मिळत नाही. 3.5एमएम हेडफोन एक चांगली सोय ठरते जी या फोनमध्ये मिळत नाही.

फास्ट चार्जिंग नाही

बॅटरीसह अ‍ॅप्पलने आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो सह फास्ट चार्जिंग दिली पण आयफोन 11 सह तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत नाही. फोन 18W चार्जिंगला सपोर्ट करतो. पण फोनसोबत तुम्हाला 5W चा चार्जर मिळतो.

अ‍ॅप्पल आयफोन 11 व्हिडीओ

The post Apple iPhone 11 वर मिळत आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, तरीही आहे हा तोट्याचा सौदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-price-cut-flipkart-discount/feed/ 0
16,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे Apple iPhone 11, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी, iPhone 12 mini वर पण आहे भरभक्कम डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-holi-offer-effective-price-rs-41900-in-india-discount/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-holi-offer-effective-price-rs-41900-in-india-discount/#respond Thu, 25 Mar 2021 12:56:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10393 ऑफर डिटेल पाहता Apple iPhone 11 विकत घेताना एचडीएफसी बॅंक कार्डचा वापर केल्यावर 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळतो. तसेच ईजीईएमआय ऑप्शन निवडल्यास 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे.

The post 16,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे Apple iPhone 11, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी, iPhone 12 mini वर पण आहे भरभक्कम डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple कंपनी त्या ब्रँड्सपैकी एक आहे ज्यांचे मोबाईल फोन सेकेंडहॅन्ड झाल्यानंतर पण त्यांची मागणी कायम राहते. नवीन आयफोनच्या चाहत्यांची कमतरता नाही पण जुना आयफोन पण कमी किंमतीत मिळत असतील तरीही ग्राहकांची रांग लागते. अश्याच ऍप्पल फॅन्ससाठी कंपनीने एक खास संधी आणली आहे ज्यात Apple iPhone 11 थेट 13,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. आयफोन 11 कमी किंमतीत आणि जास्त बेनिफिटसह विकत घेण्याची संधी होळी ऑफर अंतगर्त जारी केली गेली आहे जो ऍप्पल आयफोन विकत घेण्याची बेस्ट संधी आहे.

iPhone 11 विकत घेण्याची हि शानदार डिस्काउंट ऑफर ऍप्पल प्रीमियम रिसेलर ईमेजिनद्वारे जारी केला गेला आहे. या होळी स्पेशल ऑफरमध्ये ऍप्पल आयफोन 11 च्या खरेदीवर 13,000 रुपयांचे बेनिफिट मिळत आहेत. या ऑफरमध्ये 54,900 रुपयांची किंमत असलेला Apple iPhone 11 मोबाईल 41,900 रुपयांच्या इफेक्टिव प्राइसवर घेता येईल. कंपनीने हि स्कीम मर्यादित कालावधीसाठी जारी केली आहे ज्यात बॅंक ऑफरचा लाभ 27 मार्चपर्यंत मिळत आहे. हि ऑफर बेनिफिट iPhone 12 mini आणि iPhone 12 वर पण मिळत आहे ज्यांतर्गत या ऍप्पल फोन्सची किंमत क्रमश: 48,900 आणि 65,900 रुपये होते.

ऑफर डिटेल पाहता Apple iPhone 11 विकत घेताना एचडीएफसी बॅंक कार्डचा वापर केल्यावर 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळतो. तसेच ईजीईएमआय ऑप्शन निवडल्यास 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. आयफोन 11 विकत घेतल्यास कंपनी ग्राहकांना 8,000 रुपयांचे एक्स्ट्रा बेनिफिट पण देत आहे ज्यात कंपनीच्या ऍक्सेसरीज मोफत दिल्या जातील. जे ग्राहक आयफोन 11 विकत घेताना जुना आयफोन देतील त्यांना 3,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस पण मिळेल. म्हणजे Apple iPhone 11 वर 16,000 रुपये पर्यंतचा फायदा मिळेल.

Apple iPhone 11

या फोन मध्ये तुम्हाला 6.1 इंचाची नॉच स्क्रीन मिळेल. कंपनीने हा 828 x 1792 एचडी+ पिक्सल रेजल्यूशन सह सादर केला आहे. फोन मध्ये 19.5:9 आसपेक्ट रेशियो असलेली स्क्रीन देण्यात आली आहे. स्क्रीन स्क्रॅचप्रूफ आहे आणि नेहमीप्रमाणे यावेळी पण ओलियोफोबिक कोटिंगचा वापर केला गेला आहे. आईओएस 13 ऑपरेटिंग आधारित या फोन मध्ये 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या Apple A13 Bionic चिपसेटचा वापर केला गेला आहे. कंपनीचा दावा आहे कि जुन्या चिपसेटच्या तुलनेत हि खूप अडवांस आहे. आईफोन 11 मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे.

कॅमेरा पाहता या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळेल. याचा मेन सेंसर 12 एमपी चा आहे आणि हा एफ/1.8 अपर्चर सह येतो. तसेच दूसरा सेंसर पण 12 एमपी चा आहे. जो अल्ट्रावाइड अँगलला सपोर्ट करतो आणि हा एफ/2.4, अपर्चर सह येतो. सेल्फीसाठी या फोन मध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. चांगली बाब अशी आहे कि यावेळी फ्रंट कॅमेऱ्यात पण स्लोमोशन वीडियो रेकॉर्डिंग सपोर्ट आहे.

ऍप्पल आयफोन 11 व्हिडीओ

The post 16,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे Apple iPhone 11, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी, iPhone 12 mini वर पण आहे भरभक्कम डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-holi-offer-effective-price-rs-41900-in-india-discount/feed/ 0
Apple iPhone 11 विकत घेण्याची सुवर्णसंधी, यापेक्षा स्वस्त मिळणार नाही हा फोन https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-discount-on-amazon-prime-day-sale/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-discount-on-amazon-prime-day-sale/#respond Fri, 07 Aug 2020 09:46:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7753 Apple iPhone 11 वर 8 हजार रुपयांपेक्षा पण जास्त सूट मिळत आहे तसेच हा फोन आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

The post Apple iPhone 11 विकत घेण्याची सुवर्णसंधी, यापेक्षा स्वस्त मिळणार नाही हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple चे आईफोन प्रीमियम कॅटेगरी मध्ये येतात. आईफोन्सच्या महाग किंमतीमुळे लोक यांना स्टेटस सिंबल पण समजतात. ऍप्पलचे लेटेस्ट मोबाईल फोन iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे आहेत. यातील आईफोन 11 सर्वात छोटा मॉडेल आहे जो किंमतीच्या बाबतीत पण इतर दोन मॉडेल्स पेक्षा स्वस्त आहे. आईफोन लवर्ससाठी हा फोन विकत घेण्याची सुवर्णसंधी आली आहे. Apple iPhone 11 वर 8 हजार रुपयांपेक्षा पण जास्त सूट मिळत आहे तसेच हा फोन आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

Apple iPhone 11 अमेझॉन प्राइम डे 2020 सेल मध्ये जबरदस्त डिस्काउंट सह विकला जात आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट आतापर्यंत 68,300 रुपयांपर्यंत विकला जात होता. पण अमेझॉन वर चालू सेल मध्ये या फोनवर 8,400 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंट नंतर आईफोन 11 59,900 रुपयांपर्यंत विकत घेता येईल. हा डिस्काउंट फोनच्या सर्व कलर वेरिएंट Purple, Green, RED, Yellow, Black आणि White वर लागू आहे.

विशेष म्हणजे हि किंमत Apple iPhone 11 ची भारतातील आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे. त्यामुळे ज्या यूजरना हा फोन घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आईफोन 11 विकत घेण्याची सर्वोत्तम संधी आहे. अमेझॉन प्राइम डे मध्ये हा फोन नो कॉस्ट ईएमआई वर पण विकला जात आहे. तसेच एचडीएफसी आणि आईसीआईसी बँकेच्या कार्डधारकांना अतिरिक्त सूट पण प्राप्त मिळत आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत iPhone 11 च्या खरेदीवर 11,200 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो.

Apple iPhone 11

या फोन मध्ये तुम्हाला 6.1 इंचाची नॉच स्क्रीन मिळेल. कंपनीने हा 828 x 1792 एचडी+ पिक्सल रेजल्यूशन सह सादर केला आहे. फोन मध्ये 19.5:9 आसपेक्ट रेशियो असलेली स्क्रीन देण्यात आली आहे. स्क्रीन स्क्रॅचप्रूफ आहे आणि नेहमीप्रमाणे यावेळी पण ओलियोफोबिक कोटिंगचा वापर केला गेला आहे. आईओएस 13 ऑपरेटिंग आधारित या फोन मध्ये 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या Apple A13 Bionic चिपसेटचा वापर केला गेला आहे. कंपनीचा दावा आहे कि जुन्या चिपसेटच्या तुलनेत हि खूप अडवांस आहे. आईफोन 11 मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे.

कॅमेरा पाहता या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळेल. याचा मेन सेंसर 12 एमपी चा आहे आणि हा एफ/1.8 अपर्चर सह येतो. तसेच दूसरा सेंसर पण 12 एमपी चा आहे. जो अल्ट्रावाइड अँगलला सपोर्ट करतो आणि हा एफ/2.4, अपर्चर सह येतो. सेल्फीसाठी या फोन मध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. चांगली बाब अशी आहे कि यावेळी फ्रंट कॅमेऱ्यात पण स्लोमोशन वीडियो रेकॉर्डिंग सपोर्ट आहे.

ऍप्पल आईफोन 11 वीडियो

The post Apple iPhone 11 विकत घेण्याची सुवर्णसंधी, यापेक्षा स्वस्त मिळणार नाही हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-discount-on-amazon-prime-day-sale/feed/ 0
Apple iPhone 11 सारख्या डिजाइन सह हा स्वस्त स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, किंमत 5499 रुपये https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-look-like-itel-vision-1-launch-in-india-price-only-rs-5499-specification-features/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-look-like-itel-vision-1-launch-in-india-price-only-rs-5499-specification-features/#respond Mon, 17 Feb 2020 13:47:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6616 आईटेलने itel Vision 1 सादर केला आहे जो लुकच्या बाबतीत Apple iPhone 11 सारखा दिसतो.

The post Apple iPhone 11 सारख्या डिजाइन सह हा स्वस्त स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, किंमत 5499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सने एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि आईटेल आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे, जो आता भारतात लॉन्च करण्यात आला आहे. हॉंगकॉंग आधारित ट्रांसशन होल्डिंग अधिकृत ब्रँड आईटेलने itel Vision 1 सादर केला आहे जो लुकच्या बाबतीत Apple iPhone 11 सारखा दिसतो.

डिजाइन

स्मार्टफोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मागे असलेला फोनचा कॅमेरा मॉड्यूल अगदी iPhone 11 सारखा आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे. आईटेलच्या या स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तर बाजूला एक फ्लॅश लाईट पण आहे.

किंमत व ऑफर्स

फोन सोबत आईटेलचा ब्लूटूथ ईयरफोन फ्री मिळत आहे, ज्याची किंमत 799 रुपये आहे. Vision 1 कंपनीने 5,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. या फोन सोबत कंपनी रिलायंस जियो कडून 2200 रुपये आणि 25GB डेटा फ्री देत आहे.

स्पेसिफिकेशन्स

या फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.088-इंचाचा HD + IPS वॉटरड्रॉप डिस्प्ले देण्यात आला आहे जी 500 nits ब्राइटर स्क्रीन (19:5:9 आस्पेक्ट रेशियो) आहे. फोन मध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर डिवाइस 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर सह येतो, ज्यात चिपसेट SC9863A देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 8MP + 0.08MP चा डुअल कॅमेरा फ्लॅश लाइट सह देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 5MP कॅमेरा ब्यूटी मोड सह देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

हा एक डुअल सिम फोन आहे जो 4G वोएलटीई ला सपोर्ट करतो. हा फोन इंग्लिश व हिंदी सोबत सह इतर भारतीय भाषांमध्ये वापरता येतो. फोन एंडरॉयड 9.0 पाई वर चालतो आणि हा फोन ग्रेडेशन ब्लू आणि ग्रॅजुएशन पर्पल कलर ऑप्शन मध्ये येतो.

The post Apple iPhone 11 सारख्या डिजाइन सह हा स्वस्त स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, किंमत 5499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-look-like-itel-vision-1-launch-in-india-price-only-rs-5499-specification-features/feed/ 0
Apple घेऊन येत आहे नवीन आणि स्वस्त iPhone SE2, स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डिटेल आले समोर https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-launch-specifications-details-leaked-iphone-11-pro-max-indian-price/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-launch-specifications-details-leaked-iphone-11-pro-max-indian-price/#respond Fri, 04 Oct 2019 09:21:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5466 iPhone SE2 मध्ये 4.7 इंचचाचा डिस्प्ले मिळू शकतो जो नॅरो बेजल्स सह येईल.

The post Apple घेऊन येत आहे नवीन आणि स्वस्त iPhone SE2, स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डिटेल आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple ने नुकताच आपला सर्वात मोठा वार्षिक ईवेंट केला आहे. या ईवेंटच्या मंचावरून कंपनीने अनेक शानदार प्रोडक्ट्स सह तीन नवीन आईफोन पण लॉन्च केले होते. यात iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max चा समावेश होता. हे तिन्ही आईफोन भारतीय बाजारात पण आले आहेत आणि सेल साठी उपलब्ध आहेत. आता या दिग्गज टेक कंपनी संबंधित अजून एक माहिती समोर येत आहे, ज्यात सांगण्यात आले आहे कि Apple अजून एक नवीन आईफोन वर काम करत आहे आणि हा iPhone SE2 नावाने बाजारात येईल.

iPhone SE2 च्या नावावरून स्प्ष्ट झाले आहे कि हा फोन Apple च्या जुन्या डिवाईस iPhone SE चा अपडेटेड वर्जन असेल. Apple iPhone SE2 संबंधित हि माहिती प्रसिद्ध टिपस्टर Ming-Chi Kuo यांनी दिली आहे. कुओ म्हणतो कि Apple नवीन फोन iPhone SE2 वर काम करत आहे जो तीन वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या iPhone SE चा नवीन व एडवांस वर्जन असेल. तसेच iPhone SE2 साल 2020 च्या पहिल्या तिमाहीत टेक बाजारात येईल.

iPhone SE2

Apple च्या या आगामी आईफोनच्या नावाचा खुलासा कारण्यासोबतच टिपस्टरने iPhone SE2 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण दिली आहे. कुओ नुसार iPhone SE2 Apple A13 प्रोसेसर वर लॉन्च केला जाईल. हि चिपसेट Apple च्या लेटेस्ट आईफोन सीरीजच्या तिन्ही डिवाईस iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये पण दिसली होती.

iPhone 11 सीरीज 4 जीबी रॅम सह आली होती पण समोर आलेल्या माहितीनुसार iPhone SE2 ला Apple 3 जीबी रॅम वर लॉन्च करेल जी LPDDR4X RAM मेमरी असेल. आगामी आईफोनच्या डिजाईन बद्दल कुओ म्हणतो कि iPhone SE2 कंपनी द्वारा iPhone 8 सारख्या लुक आणि डिजाईन वर लॉन्च केला जाऊ शकतो. iPhone SE2 मध्ये 4.7 इंचचाचा डिस्प्ले मिळू शकतो जो नॅरो बेजल्स सह येईल.

iPhone 11 सीरीज इंडियन प्राइज

Apple द्वारा लॉन्च करण्यात आलेल्या आईफोन सीरीजच्या किंमती बद्दल बोलायचे तर iPhone 11 64,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन पर्पल, रेड, व्हाईट, ब्लॅक, ग्रीन आणि येलो कलर मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे iPhone 11 Pro 99,900 रुपयांच्या बेस किंमतीत बाजारात आला आहे तसेच iPhone 11 Pro Max ची किंमत 1,09,900 रुपयांपासून सुरु होत आहे. हे दोन्ही मॉडेल भारतात मीडनाईट ग्रीन, ग्रे/सिल्वर, गोल्ड आणि स्पेस ग्रे ह्यू कलर मध्ये उपलब्ध आहेत.

The post Apple घेऊन येत आहे नवीन आणि स्वस्त iPhone SE2, स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डिटेल आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-launch-specifications-details-leaked-iphone-11-pro-max-indian-price/feed/ 0
लॉन्च झाली Apple iPhone 11 सीरीज- किंमत 64,900 पासून सुरु, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-series-launched-price-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-series-launched-price-specifications-and-features/#respond Wed, 11 Sep 2019 09:32:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5277 Apple iPhone 11 ची बेस किंमत 64,900 रुपये आहे. तर Apple iPhone 11 Pro साठी तुम्हाला 99,900 रुपये द्यावे लागतील.

The post लॉन्च झाली Apple iPhone 11 सीरीज- किंमत 64,900 पासून सुरु, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागील अनेक दिवसांपासून Apple च्या नवीन आयफोनची चर्चा होती. गेल्या वर्षी कंपनीने Apple iPhone X सीरीज लॉन्च केली होती आणि यावर्षी iPhone 11 बद्दल चर्चा सुरु होती. ऍप्पल कधीच आधी नावाचा खुलासा करत नाही पण अनेक लिक्स मध्ये नवीन फोनची माहिती आली होती. काल कंपनीने अमेरिकेतील कुपरटीनो येथील आपल्या हेड क्वाटर मध्ये एका इवेंट मधून नवीन आयफोन सादर केले. Apple ने iPhone 11 सोबत अजून दोन मॉडेल Apple iPhone Pro आणि iPhone 11 Pro Max सादर केले आहेत. सर्वात खास बाब अशी कि ग्लोबल लॉन्च सोबत कंपनीने आयफोन 11 ची भारतीय किंमत पण सांगितली आहे. भारतीय बाजारात Apple iPhone 11 ची बेस किंमत 64,900 रुपये आहे. तर Apple iPhone 11 Pro साठी तुम्हाला 99,900 रुपये द्यावे लागतील.

Apple iPhone 11 स्पेसिफिकेशन आणि प्राइस

वर सांगितल्याप्रमाणे Apple iPhone 11 सहित कंपनीने तीन मॉडेल सादर आहेत. यात सर्वात छोटा मॉडेल iPhone 11 आहे. या फोन मध्ये तुम्हाला 6.1 इंचाची नॉच स्क्रीन मिळेल. कंपनीने हा 828 x 1792 एचडी+ पिक्सल रेजल्यूशन सह सादर केला आहे. फोन मध्ये 19.5:9 आसपेक्ट रेशियो असलेली स्क्रीन देण्यात आली आहे. स्क्रीन स्क्रॅचप्रूफ आहे आणि नेहमीप्रमाणे यावेळी पण ओलियोफोबिक कोटिंगचा वापर करण्यात आला आहे.

आयओएस 13 ऑपरेटिंग आधारित या फोन मध्ये 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या Apple A13 Bionicचिपसेटचा वापर करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे कि जुन्या चिपसेटच्या तुलनेत हि खुप अडवांस आहे. तुम्हाला तर माहितीच आहे ऍप्पल कधीही रॅमची माहिती देत नाही पण इंटरनेटवर उपलब्ध माहिती नुसार आयफोन 11 मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे तर कंपनीने सांगितले आहे कि हा फोन 64GB, 128जीबी आणि 256जीबी मेमरी सह येतो.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळेल. याचा मेन सेंसर 12 एमपी चा आहे आणि हा एफ/1.8 अपर्चर सह येतो. तर दुसरा सेंसर पण 12 एमपी चा देण्यात आला आहे. जो अल्ट्रावाइड अँगलला सपोर्ट करतो आणि हा एफ/2.4, अपर्चर सह येतो. सेल्फी साठी या फोन मध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. चांगली बाब अशी कि यावेळी फ्रंट कॅमेरा मध्ये पण स्लोमोशन वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट आहे.

ऍप्पल आयफोन 11 ब्लॅक, ग्रीन, यलो, पर्पल, व्हाइट आणि रेड सहित सहा रंगांत उपलब्ध होईल. भारतीय बाजारात हे फोन्स 27 सप्टेंबर पासून विकत घेता येतील. हा फोन तीन मॉडेल मध्ये उपलब्ध आहे पण कंपनीने आतापर्यंत फक्त एका मॉडेलची किंमत सांगितली आहे.

हे देखील वाचा: मोबाईल इंटरनेट स्पीड मध्ये भारत मागे, पहिल्या क्रमांकावर आहे हा देश

Apple iPhone 11 Pro स्पेसिफिकेशन आणि प्राइस

हा iPhone 11 चा अडवांस वर्जन आहे. Apple iPhone 11 Pro मध्ये तुम्हाला 5.8 इंचाची ओएलईडी स्क्रीन मिळेल. कंपनीने यात 1125 x 2436 पिक्सल रेजल्यूशन असलेली फुल एचडी प्लस स्क्रीन दिली आहे जिचा आसपेक्ट रेशियो 19.5:9 आहे आणि हि नॉच सह येते. हा डॉल्बी वीजन आणि एचडीआर 10 ला सपोर्ट करतो ज्यात तुम्हाला वास्तविकतेचा अनुभव येतो. तसेच फोनची स्क्रीन स्क्रॅचप्रूफ आहे आणि यात तुम्हाला ओलियोफोबिक कोटिंग मिळेल.

कंपनीने यात 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेली Apple A13 Bionic चिपसेट वापरली आहे. फोन मध्ये तुम्हाला 64GB, 256GB आणि 512GB की स्टोरेज मिळेल पण कंपनीने रॅमची माहिती दिली नाही. इंटरनेट वरील माहिती नुसार या फोन मध्ये 6जीबी रॅम आहे.

कॅमेरा सेग्मेंट थोडा चांगला झाला आहे. कंपनीने यावेळी ट्रिपल कॅमेऱ्याचा वापर केला आहे. आयफोन 11 प्रो मध्ये 12 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आहे. मेन संसर एफ/1.8 अपर्चर सह येतो. तर दुसरा एफ/2.0 सेंसर टेलीफोटो आहे जो 2एक्स पर्यंत झूमला सपोर्ट करतो. दोन्ही सेंसर मध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन आहे. तर तिसरा सेंसर एफ/2.4 अपर्चर सह येतो जो अल्ट्रावाइड अँगल साठी आहे. सेल्फी साठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 99,900 रुपयांपासून सुरु होते.

हे देखील वाचा: क्वॉड कॅमेरा सेटअप असलेला Oppo A9 होईल 16 सप्टेंबरला लॉन्च, महिन्याच्या शेवटी होईल सेल

Apple iPhone 11 Pro Max स्पेसिफिकेशन आणि प्राइस

iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये मुख्य फरक स्क्रीन साइजचा आहे. बाकी सर्व सारखंच आहे. आयफोन 11 प्रो मध्ये 5.8 इंचाची स्क्रीन आहे तर iPhone 11 Pro Max मध्ये तुम्हाला 6.5 इंचाची मोठी स्क्रीन मिळेल. कंपनीने यात पण ओएलईडी डिस्प्लेचा वापर केला आहे. त्याचबरोबर हा एचडीआर 10 आणि डॉल्बी वीजनला पण सपोर्ट करतो. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2688×1242 आहे. तसेच हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या नॉच स्क्रीन सह येतो. याची किंमत 1,09,900 रुपयांपासून सुरु होते.

The post लॉन्च झाली Apple iPhone 11 सीरीज- किंमत 64,900 पासून सुरु, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-series-launched-price-specifications-and-features/feed/ 0
iPhone 11 Launch आज होईल लॉन्च, अशाप्रकारे बघा इवेंट लाइव https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-launch-today-how-to-watch-live-stream/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-launch-today-how-to-watch-live-stream/#respond Tue, 10 Sep 2019 10:16:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5262 नवीन मॉडेल रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येईल.

The post iPhone 11 Launch आज होईल लॉन्च, अशाप्रकारे बघा इवेंट लाइव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक विश्वातील दिग्गज कंपनी ऍप्पलच्या आगामी फोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती. आता नुकतीच अशी अधिकृत माहिती समोर आली आहे कि कंपनी 10 सप्टेंबर म्हणजे आज एका लॉन्च इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंट मध्ये iPhone 11 सीरीज मध्ये 3 तीन नवीन iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max सादर केले जाऊ शकतात.

बोलले जात आहे कि हे नवीन iPhone ऍप्पलच्या लेटेस्ट A13 चिपसेट सह सादर केले जातील. त्याचबरोबर आज होणारा हा लॉन्च इवेंट लाइव स्ट्रीम पण करेल जेणेकरून जगभरातील ऍप्पल फॅन या इवेंटचे लाइव प्रसारण बघू शकतात.

अशाप्रकारे बघा लाइव इवेंट

ऍप्पल आज आपल्या हेडक्वार्टर मधील स्टीव जॉब्स थिएटर मध्ये इवेंटचे आयोजन करेल. आज इवेंट भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरु होईल. या इवेंटची लाइव स्ट्रीमिंग ऍप्पलच्या वेबसाइट वर होईल. लाइव स्ट्रीमिंग iOS 10 किंवा त्यावरील वर्जन आणि मॅक कंप्यूटर वर सफारी ब्राउजर वापरून आईफोन, आईपॅड आणि आईपॉड वर बघता येईल. तसेच विंडोज यूजर एज ब्राउजरच्या माध्यमातून लाइव स्ट्रीम पेज ऍक्सेस करू शकतील.

आतापर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार iPhone 11 ची किंमत 749 डॉलर (जवळपास 53,700 रुपये) असेल. पण ओलेड डिस्प्ले असलेल्या मॉडेलची किंमत थोडी जास्त असू शकते. आईफोन 11 सीरीज साठी प्री-ऑर्डर 13 सप्टेंबर पासून सुरु होतील आणि 20 सप्टेंबर पासून हे हॅन्डसेट रिटेल स्टोर मध्ये उपलब्ध होतील.

हे देखील वाचा: Search or use up and down arrow keys to select an item. Redmi K30 चे काम सुरु, 5G सपोर्ट सह होईल लॉन्च : Lu Weibing

स्पेसिफिकेशन पाहता नवीन iPhone iOS 13.1 वर चालतील आणि हे A13 चिप सह येतील. काही दिवसांपूर्वी iPhone 11 गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता. या लिस्टिंग नुसार 4 जीबी रॅम असेल. दावा केला जात आहे कि नवीन मॉडेल रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येईल.

The post iPhone 11 Launch आज होईल लॉन्च, अशाप्रकारे बघा इवेंट लाइव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-launch-today-how-to-watch-live-stream/feed/ 0
iPhone 11 ची प्रतीक्षा संपली, 10 सप्टेंबरला होईल लॉन्च इवेंट https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-launch-in-september-10-apple-sends-invites/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-launch-in-september-10-apple-sends-invites/#respond Fri, 30 Aug 2019 11:51:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5185 टेक विश्वाची दिग्गज कंपनी एॅप्पलच्या आगामी फोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती. आता याची अधिकृत माहिती समोर आली आहे कि कंपनी 10 सप्टेंबरला एका लॉन्च इवेंटचे आयोजन करेल. कंपनीने साल 2019 च्या आपल्या सर्वात मोठ्या इवेंट साठी मीडिया इन्वाइट पाठवायला सुरवात केली आहे. असे बोलले जात आहे की या इवेंट मध्ये एॅप्पल नवीन […]

The post iPhone 11 ची प्रतीक्षा संपली, 10 सप्टेंबरला होईल लॉन्च इवेंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक विश्वाची दिग्गज कंपनी एॅप्पलच्या आगामी फोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती. आता याची अधिकृत माहिती समोर आली आहे कि कंपनी 10 सप्टेंबरला एका लॉन्च इवेंटचे आयोजन करेल. कंपनीने साल 2019 च्या आपल्या सर्वात मोठ्या इवेंट साठी मीडिया इन्वाइट पाठवायला सुरवात केली आहे. असे बोलले जात आहे की या इवेंट मध्ये एॅप्पल नवीन iPhoen सादर करेल. पाठवण्यात आलेल्या इनवाइट नुसार 10 सप्टेंबर सकाळी 10 वाजता Cupertino स्थित स्टीव जॉब्स थिअटर मध्ये या खास इवेंटचे आयोजन केले जाईल.

मागील अनेक दिवसांपासून iPhone 11 च्या लॉन्च आणि याच्या फीचर्स बद्दल माहिती समोर येत होती. सूत्रांनुसार या इवेंट मध्ये कंपनी तीन नवीन आईफोन्स सह Apple Watch 4 चा अपग्रेड वेरिएंट सादर करू शकते. आशा आहे कि कंपनी iPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR चा अपग्रेडेड वेरिएंट लॉन्च करेल.

अलीकडेच कंपनीने iOS 13 चा सातवा Beta वर्जन जाहीर केला आहे. Apple ने iOS 13 च्या अपडेट मध्ये फोटोज साठी एडिटिंग टूल्स पण दिले आहेत. या नवीन फीचर मध्ये पावरफुल एडिटिंग टूल्स सोबत आधीपेक्षा चांगली ब्राउजिंग पण मिळेल. या फीचर मध्ये on-device machine learning फोटोज मध्ये स्वतःहून बेस्ट ईमेज हाईलाईट करेल तसेच एकसारखे इतर फोटोज व जुन्या फोटो फाइल्स लपवून ठेवेल. फोटोज व वीडियोज आर्गेनाइजड होतील तसेच वीडियोज मध्ये auto play चा आॅप्शन पण येईल.

फोटो एडिटिंग बद्दल बोलायचे झाले तर नवीन अपडेट मध्ये स्वाईप करून इमेज एडिटिंग अजून चांगल्या पद्धतीने करता येईल. नवीन ऑपरेटिंग सिस्टम फोटो एडिट करण्यासाठी जेस्चरचा वापर करेल आणि वीडियो रोटेट करण्याची क्षमता यात असेल. यात High-Key Mono effect पण देण्यात आला आहे.

The post iPhone 11 ची प्रतीक्षा संपली, 10 सप्टेंबरला होईल लॉन्च इवेंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-launch-in-september-10-apple-sends-invites/feed/ 0
विना चार्जर चार्ज होईल आगामी आयफोन 11 आणि सोबत असतील अनेक दमदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-come-with-wireless-charging/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-come-with-wireless-charging/#respond Mon, 25 Mar 2019 10:42:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3916 ऍप्पल या इवेंट मध्ये वीडियो स्ट्रीमिंग सर्विस लॉन्च करू शकते

The post विना चार्जर चार्ज होईल आगामी आयफोन 11 आणि सोबत असतील अनेक दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक विश्वातील दिग्गज कंपनी ऍप्पल यावर्षी आपला नेक्स्ट जनरेशन आयफोन लॉन्च करेल. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण कंपनी आपला नवीन आयफोन सप्टेंबर मध्ये जगासमोर आणण्यासाठी इवेंटचे आयोजन करेल. परंतु, लॉन्चच्या आधी नेहमीप्रमाणे नवीन आयफोन संबंधित माहिती समोर येऊ लागली आहे. रिपोर्टनुसार आयफोन 11 मध्ये रिवर्स वायरलेस चार्जिंग सपॉर्ट दिला जाईल.

एका रिपोर्टनुसार यावर्षी सादर केल्या जाणाऱ्या आयफोन 11 मध्ये रिवर्स वायरलेस चार्जिंग फीचर दिला जाईल. हा काही नवीन फीचर नाही. याआधी अनेक कंपन्यांनी अशाप्रकारचा फीचर आपल्या फोन मध्ये दिला आहे. मार्केट मध्ये रिवर्स चार्जिंग सह हुआवई मेट 20 आधीपासूनच उपलब्द आहे. याचा अर्थ असा कि तुम्ही तुमच्या फोनने दुसरा फोन वायरलेस चार्ज करू शकता. जर हा रिपोर्ट खरा ठरला तर येत्या काळात तुम्ही रिवर्स चार्जिंग फीचरचा वापर करून आपले आयफोनने इतर ऍप्पल डिवाइस चार्ज करू शकाल. रिपोर्टनुसार कंपनी यात 18वॉट फास्ट चार्जरचा वापर करेल.

तसेच कंपनी आयफोन एसई2 बद्दल पण चर्चा आहे कि कंपनी हा लॉन्च करू शकते. कंपनी ने साल 2016 मध्ये आपला सेकेंड जेनरेशन स्मार्टफोन आयफोन एसई लॉन्च केला होता. बोलले जात आहे कि आगामी आयफोन एसई2 मध्ये गेल्यावर्षी लॉन्च केलेल्या आयफोन 10एस आणि 10आर प्रमाणे नॉच असेल. याबद्दल ऍप्पल कडून पक्की माहिती मिळाली नाही.

विशेष म्हणजे ऍप्पल आज म्हणजे 25 मार्च 2019 ला स्टीव जॉब्स थियेटर मध्ये एका इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंटची टॅगलाइन इट्स शो टाइम अशी आहे. इवेंट बद्दल आधीपासूनच चर्चा आहे कि ऍप्पल या इवेंट मध्ये वीडियो स्ट्रीमिंग सर्विस लॉन्च करू शकते. आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार ऍप्पल इवेंट मध्ये दोन प्रकारची वीडियो स्ट्रीमिंग सर्विस सुरु करेल ज्यात एक टीवी सब्सक्रिप्शन आणि दुसरी वीडियो सर्विस असेल. ऍप्पल ने अनेक प्रोडक्शन हाउस आणि प्रोड्यूसरशी वीडियो कंटेंट साठी हात मिळवणी पण केली आहे.

आज होणाऱ्या इवेंट मध्ये वीडियो स्ट्रीमिंग सर्विसच्या लॉन्चिंगची चर्चा होण्यामागचे कारण म्हणजे कंपनी ने मीडिया इनवाइट मध्ये इट्स शो टाइम टॅगलाइन वापरली होती. इवेंट आज रात्री भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता सुरु होईल.

सोर्स

The post विना चार्जर चार्ज होईल आगामी आयफोन 11 आणि सोबत असतील अनेक दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-come-with-wireless-charging/feed/ 0