क्वॉड कॅमेरा सेटअप असलेला Oppo A9 होईल 16 सप्टेंबरला लॉन्च, महिन्याच्या शेवटी होईल सेल

स्मार्टफोन मेकर Oppo चा नवीन डिवाइस Oppo A9 2020 भारतात लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार या स्मार्टफोनच्या रियर पॅनल वर क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच हा डिवाइस रियर फिंगरप्रिंट स्कॅनर सह अनेक ग्रेडिएंट फिनिश मध्ये येऊ शकतो. आता कंपनीने ट्विट करून अशी माहिती दिली आहे कि Oppo A9 भारतात 16 सप्टेंबरला लॉन्च केला जाईल.

कंपनीने स्पष्ट केले आहे कि स्मार्टफोन चार कलर ऑप्शंस- वाइट, ब्लू, पर्पल आणि ब्लॅक सह येईल. तसेच Oppo A9 2020 मध्ये तीन वर्टिकल अलाइंड कॅमेरा सेंसर असतील आणि चौथा छोटा सेंसर फ्लॅशच्या बाजूला असेल. त्याचप्रमाणे डिवाइस मध्ये 5000mAh ची बॅटरी मिळू शकते.

Oppo A9 (2020) स्पेसिफिकेशन्स

लीक मध्ये शेयर करण्यात आलेले स्पेसिफिकेशन्स पाहता Oppo A9 (2020) 6.5-इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि Oppo A9 (2020) चे डायमेंशन 163.1 x 75.6 x 9.1एमएम असे असतील आणि हा फोन 195 ग्रामचा असेल. लीकनुसार Oppo आपला हा आगामी स्मार्टफोन मरीन ग्रीन आणि स्पेस पर्पल कलर मध्ये लॉन्च करू शकते.

Oppo A9 (2020) कलर ओएस 6.1 आधारित असेल जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालेल. या लीक मध्ये एंडरॉयड ओएस ची माहिती देण्यात आलेली नाही पण आशा आहे कि Oppo A9 (2020) मध्ये एंडरॉयड 9 पाई मिळाले. तसेच फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Oppo च्या या स्मार्टफोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here