लॉन्च झाली Apple iPhone 11 सीरीज- किंमत 64,900 पासून सुरु, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही

मागील अनेक दिवसांपासून Apple च्या नवीन आयफोनची चर्चा होती. गेल्या वर्षी कंपनीने Apple iPhone X सीरीज लॉन्च केली होती आणि यावर्षी iPhone 11 बद्दल चर्चा सुरु होती. ऍप्पल कधीच आधी नावाचा खुलासा करत नाही पण अनेक लिक्स मध्ये नवीन फोनची माहिती आली होती. काल कंपनीने अमेरिकेतील कुपरटीनो येथील आपल्या हेड क्वाटर मध्ये एका इवेंट मधून नवीन आयफोन सादर केले. Apple ने iPhone 11 सोबत अजून दोन मॉडेल Apple iPhone Pro आणि iPhone 11 Pro Max सादर केले आहेत. सर्वात खास बाब अशी कि ग्लोबल लॉन्च सोबत कंपनीने आयफोन 11 ची भारतीय किंमत पण सांगितली आहे. भारतीय बाजारात Apple iPhone 11 ची बेस किंमत 64,900 रुपये आहे. तर Apple iPhone 11 Pro साठी तुम्हाला 99,900 रुपये द्यावे लागतील.

Apple iPhone 11 स्पेसिफिकेशन आणि प्राइस

वर सांगितल्याप्रमाणे Apple iPhone 11 सहित कंपनीने तीन मॉडेल सादर आहेत. यात सर्वात छोटा मॉडेल iPhone 11 आहे. या फोन मध्ये तुम्हाला 6.1 इंचाची नॉच स्क्रीन मिळेल. कंपनीने हा 828 x 1792 एचडी+ पिक्सल रेजल्यूशन सह सादर केला आहे. फोन मध्ये 19.5:9 आसपेक्ट रेशियो असलेली स्क्रीन देण्यात आली आहे. स्क्रीन स्क्रॅचप्रूफ आहे आणि नेहमीप्रमाणे यावेळी पण ओलियोफोबिक कोटिंगचा वापर करण्यात आला आहे.

आयओएस 13 ऑपरेटिंग आधारित या फोन मध्ये 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या Apple A13 Bionicचिपसेटचा वापर करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे कि जुन्या चिपसेटच्या तुलनेत हि खुप अडवांस आहे. तुम्हाला तर माहितीच आहे ऍप्पल कधीही रॅमची माहिती देत नाही पण इंटरनेटवर उपलब्ध माहिती नुसार आयफोन 11 मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे तर कंपनीने सांगितले आहे कि हा फोन 64GB, 128जीबी आणि 256जीबी मेमरी सह येतो.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळेल. याचा मेन सेंसर 12 एमपी चा आहे आणि हा एफ/1.8 अपर्चर सह येतो. तर दुसरा सेंसर पण 12 एमपी चा देण्यात आला आहे. जो अल्ट्रावाइड अँगलला सपोर्ट करतो आणि हा एफ/2.4, अपर्चर सह येतो. सेल्फी साठी या फोन मध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. चांगली बाब अशी कि यावेळी फ्रंट कॅमेरा मध्ये पण स्लोमोशन वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट आहे.

ऍप्पल आयफोन 11 ब्लॅक, ग्रीन, यलो, पर्पल, व्हाइट आणि रेड सहित सहा रंगांत उपलब्ध होईल. भारतीय बाजारात हे फोन्स 27 सप्टेंबर पासून विकत घेता येतील. हा फोन तीन मॉडेल मध्ये उपलब्ध आहे पण कंपनीने आतापर्यंत फक्त एका मॉडेलची किंमत सांगितली आहे.

हे देखील वाचा: मोबाईल इंटरनेट स्पीड मध्ये भारत मागे, पहिल्या क्रमांकावर आहे हा देश

Apple iPhone 11 Pro स्पेसिफिकेशन आणि प्राइस

हा iPhone 11 चा अडवांस वर्जन आहे. Apple iPhone 11 Pro मध्ये तुम्हाला 5.8 इंचाची ओएलईडी स्क्रीन मिळेल. कंपनीने यात 1125 x 2436 पिक्सल रेजल्यूशन असलेली फुल एचडी प्लस स्क्रीन दिली आहे जिचा आसपेक्ट रेशियो 19.5:9 आहे आणि हि नॉच सह येते. हा डॉल्बी वीजन आणि एचडीआर 10 ला सपोर्ट करतो ज्यात तुम्हाला वास्तविकतेचा अनुभव येतो. तसेच फोनची स्क्रीन स्क्रॅचप्रूफ आहे आणि यात तुम्हाला ओलियोफोबिक कोटिंग मिळेल.

कंपनीने यात 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेली Apple A13 Bionic चिपसेट वापरली आहे. फोन मध्ये तुम्हाला 64GB, 256GB आणि 512GB की स्टोरेज मिळेल पण कंपनीने रॅमची माहिती दिली नाही. इंटरनेट वरील माहिती नुसार या फोन मध्ये 6जीबी रॅम आहे.

कॅमेरा सेग्मेंट थोडा चांगला झाला आहे. कंपनीने यावेळी ट्रिपल कॅमेऱ्याचा वापर केला आहे. आयफोन 11 प्रो मध्ये 12 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आहे. मेन संसर एफ/1.8 अपर्चर सह येतो. तर दुसरा एफ/2.0 सेंसर टेलीफोटो आहे जो 2एक्स पर्यंत झूमला सपोर्ट करतो. दोन्ही सेंसर मध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन आहे. तर तिसरा सेंसर एफ/2.4 अपर्चर सह येतो जो अल्ट्रावाइड अँगल साठी आहे. सेल्फी साठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 99,900 रुपयांपासून सुरु होते.

हे देखील वाचा: क्वॉड कॅमेरा सेटअप असलेला Oppo A9 होईल 16 सप्टेंबरला लॉन्च, महिन्याच्या शेवटी होईल सेल

Apple iPhone 11 Pro Max स्पेसिफिकेशन आणि प्राइस

iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये मुख्य फरक स्क्रीन साइजचा आहे. बाकी सर्व सारखंच आहे. आयफोन 11 प्रो मध्ये 5.8 इंचाची स्क्रीन आहे तर iPhone 11 Pro Max मध्ये तुम्हाला 6.5 इंचाची मोठी स्क्रीन मिळेल. कंपनीने यात पण ओएलईडी डिस्प्लेचा वापर केला आहे. त्याचबरोबर हा एचडीआर 10 आणि डॉल्बी वीजनला पण सपोर्ट करतो. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2688×1242 आहे. तसेच हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या नॉच स्क्रीन सह येतो. याची किंमत 1,09,900 रुपयांपासून सुरु होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here