iPhone 11 Launch आज होईल लॉन्च, अशाप्रकारे बघा इवेंट लाइव

टेक विश्वातील दिग्गज कंपनी ऍप्पलच्या आगामी फोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती. आता नुकतीच अशी अधिकृत माहिती समोर आली आहे कि कंपनी 10 सप्टेंबर म्हणजे आज एका लॉन्च इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंट मध्ये iPhone 11 सीरीज मध्ये 3 तीन नवीन iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max सादर केले जाऊ शकतात.

बोलले जात आहे कि हे नवीन iPhone ऍप्पलच्या लेटेस्ट A13 चिपसेट सह सादर केले जातील. त्याचबरोबर आज होणारा हा लॉन्च इवेंट लाइव स्ट्रीम पण करेल जेणेकरून जगभरातील ऍप्पल फॅन या इवेंटचे लाइव प्रसारण बघू शकतात.

अशाप्रकारे बघा लाइव इवेंट

ऍप्पल आज आपल्या हेडक्वार्टर मधील स्टीव जॉब्स थिएटर मध्ये इवेंटचे आयोजन करेल. आज इवेंट भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरु होईल. या इवेंटची लाइव स्ट्रीमिंग ऍप्पलच्या वेबसाइट वर होईल. लाइव स्ट्रीमिंग iOS 10 किंवा त्यावरील वर्जन आणि मॅक कंप्यूटर वर सफारी ब्राउजर वापरून आईफोन, आईपॅड आणि आईपॉड वर बघता येईल. तसेच विंडोज यूजर एज ब्राउजरच्या माध्यमातून लाइव स्ट्रीम पेज ऍक्सेस करू शकतील.

आतापर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार iPhone 11 ची किंमत 749 डॉलर (जवळपास 53,700 रुपये) असेल. पण ओलेड डिस्प्ले असलेल्या मॉडेलची किंमत थोडी जास्त असू शकते. आईफोन 11 सीरीज साठी प्री-ऑर्डर 13 सप्टेंबर पासून सुरु होतील आणि 20 सप्टेंबर पासून हे हॅन्डसेट रिटेल स्टोर मध्ये उपलब्ध होतील.

हे देखील वाचा: Search or use up and down arrow keys to select an item. Redmi K30 चे काम सुरु, 5G सपोर्ट सह होईल लॉन्च : Lu Weibing

स्पेसिफिकेशन पाहता नवीन iPhone iOS 13.1 वर चालतील आणि हे A13 चिप सह येतील. काही दिवसांपूर्वी iPhone 11 गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता. या लिस्टिंग नुसार 4 जीबी रॅम असेल. दावा केला जात आहे कि नवीन मॉडेल रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here