Apple iPhone 12 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 17 Jul 2023 13:31:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अँड्रॉइडपेक्षा स्वस्त झाले iPhone; नवीन मॉडेल येताच जुन्या मॉडेल्सवर जबरदस्त डील https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-iphone-12-iphone-13-get-big-discount-flipkart-sale-after-iphone-14-launch/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-iphone-12-iphone-13-get-big-discount-flipkart-sale-after-iphone-14-launch/#respond Tue, 20 Sep 2022 07:37:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13266 Apple iPhone Discount Offer: अ‍ॅप्पल असा ब्रँड आहे ज्याच्या स्मार्टफोन्सची ब्रँड व्हॅल्यू अनेक वर्ष टिकते. त्यामुळे ग्राहकन Apple च्या जुने iPhone मॉडेल्स देखील ब्रँडसाठी विकत घेतात. आता iPhone 14 च्या लाँचनंतर iPhone 11, iPhone 12 आणि iPhone 13 मॉडेलवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. हे मॉडेल 19,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart’s […]

The post अँड्रॉइडपेक्षा स्वस्त झाले iPhone; नवीन मॉडेल येताच जुन्या मॉडेल्सवर जबरदस्त डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple iPhone Discount Offer: अ‍ॅप्पल असा ब्रँड आहे ज्याच्या स्मार्टफोन्सची ब्रँड व्हॅल्यू अनेक वर्ष टिकते. त्यामुळे ग्राहकन Apple च्या जुने iPhone मॉडेल्स देखील ब्रँडसाठी विकत घेतात. आता iPhone 14 च्या लाँचनंतर iPhone 11, iPhone 12 आणि iPhone 13 मॉडेलवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. हे मॉडेल 19,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart’s Big Billion Days sale) मध्ये विकत घेता येईल जो 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. चला जाणून APPLE iPhone मॉडेल मिळणाऱ्या ऑफरची माहिती.

Apple iPhone Discount

iPhone 11 iPhone 12 iPhone 13 Get Big Discount Flipkart Sale After iPhone 14 Launch

iPhone 14 ची किंमत जास्त असल्यामुळे तुम्ही हा विकत घेऊ शकत नसाल तर निराश होऊ नका. कारण तुम्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर होणाऱ्या सेलमध्ये स्वस्तात आयफोनचे काही एक दोन वर्ष जुने मॉडेल विकत घेता येतील. फ्लिपकार्ट की बिग बिलियन सेल 23 सप्टेंबरला सुरु होत आहे आणि 30 सप्टेंबर पर्यंत चालेल, ज्यात मिळणाऱ्या जबरदस्त डिस्काइउंटसह iPhone Models विकत घेता येतील. हे देखील वाचा: …म्हणून त्याने iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळवरून थेट गाठली दुबई

iPhone 11 Flipkart Offer

iPhone 11 iPhone 12 iPhone 13 Get Big Discount Flipkart Sale After iPhone 14 Launch

सर्वप्रथम iPhone 11 वरील ऑफरची माहिती घेऊया, तीन वर्ष जुन्या iPhone 11 च्या 64 GB स्टोरजे मॉडेलची किंमत 43,900 रुपये आहे. परंतु एक्सचेंज ऑफर अंतगर्त ग्राहक या फोनवर 19,000 रुपयांपर्यंतची सवलत मिळवू शकतात. तसेच Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक देखील दिला जाईल.

iPhone 12 Flipkart Offer

iPhone 11 iPhone 12 iPhone 13 Get Big Discount Flipkart Sale After iPhone 14 Launch

फ्लॅट-कडा असलेल्या iPhone 12 च्या 128GB व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर 64,900 रुपये आहे. तुम्ही तुमचा जुना फोन विकून त्याबदल्यात 19,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट मिळवू शकता. तसेच अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डधारकांना फोनवर 5% सूट मिळू शकते. Flipkart Big Billion Days सेलमध्ये फोनची किंमत अजून कमी होऊ शकते. हे देखील वाचा: सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच

iPhone 13 Flipkart Offer

iPhone 11 iPhone 12 iPhone 13 Get Big Discount Flipkart Sale After iPhone 14 Launch

आयफोन 14 आणि आयफोन 13 ची डिजाइन आणि फीचर्स देखील जवळपास एक सारखे आहेत. परंतु दोन्ही फोनची किंमत खूप वेगळी आहे. आयफोन 13 ची किंमत 69,900 रुपये आहे. फ्लिपकार्ट एक्सचेंज ऑफर अंतर्गत 19,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. जर तुमच्याकडे जुना iPhone 11 असेल तर तुम्ही 18,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त सूट मिळवू शकता. त्यामुळे iPhone 13 ची किंमत 50,900 रुपये होईल. जर तुम्ही Flipkart Big Billion Days सेलची वाट पहिली तर iPhone 13 ची किंमत सुमारे 20,000 रुपयांनी कमी होईल. फ्लिपकार्टनं अलीकडेच संकेत दिले होते की iPhone 13 49,900 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.

The post अँड्रॉइडपेक्षा स्वस्त झाले iPhone; नवीन मॉडेल येताच जुन्या मॉडेल्सवर जबरदस्त डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-iphone-12-iphone-13-get-big-discount-flipkart-sale-after-iphone-14-launch/feed/ 0
Apple iPhone 12 ची खरी किंमत फक्त 30,300 रुपये! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण https://www.91mobiles.com/marathi/iphone-12-128gb-price-in-india-costs-only-rs-30300/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-12-128gb-price-in-india-costs-only-rs-30300/#respond Fri, 08 Jan 2021 08:25:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9594 iPhone 12 बनवण्यासाठी खर्च वाढण्यामागे 5G ची सुरवात आणि एलसीडी वरून OLED डिस्प्ले मध्ये झालेला बदल ही कारणे आहेत.

The post Apple iPhone 12 ची खरी किंमत फक्त 30,300 रुपये! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या वर्षी एका वर्चुअल इवेंटच्या माध्यमातून एॅप्पलने आपली सर्वात महाग सीरीज iPhone 12 सादर केली होती. या सीरीज मध्ये 4 नवीन फोन iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max आले होते. किंमतीसाठी नेहमीच चर्चेत असणार्‍या या फोन्सची किंमत पण लाखात होती. पण आता एक रिपोर्ट समोर आला आहे ज्यात iPhone 12 ची मटेरियल कॉस्ट iPhone 11 पेक्षा 21 टक्के जास्त आहे. याचा खुलासा काउंटरप्वाइंट रिसर्च फर्मने आपल्या एका रिपोर्ट मध्ये केला आहे. रिपोर्ट मध्ये Bill of Materials (BoM) च्या आधारावर सांगण्यात आले आहे की iPhone 12 128GB मॉडेल बनवण्याची किंमत $414 (जवळपास 30,300 रुपये) आहे, जो यूएस आणि भारतात 84,900 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर iPhone 12 मॉडेल फक्त $431 (जवळपास 31,500 रुपये) मध्ये बनतो.

iPhone 12 बनवण्यासाठी खर्च वाढण्यामागे 5G ची सुरवात आणि एलसीडी वरून OLED डिस्प्ले मध्ये झालेला बदल ही कारणे आहेत. तसेच Apple चे घटक जसे की A14 बायोनिक, PMIC, ऑडियो आणि UWB चिप BoM मधील 16.7 टक्के जागा घेतात. एलसीडी वरून OLED पॅनल मध्ये बदल केल्यामुळे $ 23 (जवळपास 1,600 रुपये) पेक्षा जास्त खर्च वाढला आहे.

रिपोर्टनुसार, सॅमसंग डिस्प्ले आणि एलजी डिस्प्लेला iPhone साठी जास्त पॅनल पुरवण्यास सांगण्यात आले आहे. 5G संबंधित कॉम्पोनेंट्स जसे की 5G मॉडेम, ट्रांसीवर आणि RF-फ्रंट-एंड सिस्टम एकत्रितपणे $ 34 (जवळपास 2,400 रुपये) यामुळे खर्च वाढतो. Apple ने TSMC चा 5nm प्रोसेस-संचालित अप्लिकेशन प्रोसेसरचा वापर केला आहे, ज्यांची किंमत $ 17 (जवळपास 1,200 रुपये) पेक्षा जास्त आहे.

डिस्प्ले कॉम्पोनेंट्स, ऑडियो आणि बॅटरीसाठी सप्लायर्ससाठी ब्रॉडकॉम, सिरस लॉजिक, एनएक्सपी, नोल्स, गोएर्टेक, एसटी, एएसई / यूएसआई, एएसी टेक्नोलॉजीज आणि टीआईचा समावेश आहे. काउंटरपॉइंटचा दावा आहे कि वाढलेल्या खर्च आटोक्यात आणण्यासाठी रॅम, स्टोरेज, कॅमेरा सबसिस्टम, फेस आईडी सारख्या कंपोनेंट्स वर खर्च कमी केला गेला आहे.

अॅप्पल आयफोन 12 विडिओ

The post Apple iPhone 12 ची खरी किंमत फक्त 30,300 रुपये! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-12-128gb-price-in-india-costs-only-rs-30300/feed/ 0
Apple का सर्वात पावरफुल फोन iPhone 12 Pro Max झाला लॉन्च, याच्या फीचर्सना देणार नाही कोणीच टक्कर https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-pro-max-officially-launched-feature-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-pro-max-officially-launched-feature-specs-price/#respond Wed, 14 Oct 2020 13:35:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8512 iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max मध्ये मुख्य फरक स्क्रीन साइज आणि बॅटरीचा आहे.

The post Apple का सर्वात पावरफुल फोन iPhone 12 Pro Max झाला लॉन्च, याच्या फीचर्सना देणार नाही कोणीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple ने काल ऑनलाइन इवेंट मध्ये आपल्या नवीन टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ऍडव्हान्स प्रोडक्ट्स सादर केले आहेत. यात स्मार्टहोम गॅजेट HomePod Mini पासून नवीन आयफोन 12 सीरीजचा पण समावेश आहेत. सर्वात खास बाब अशी कि प्रथमच कंपनीने एक साथ 4 फोन लॉन्च केले आहेत. Apple ने iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max लॉन्च केले आहेत. तसेच आयफोन 12 सीरीज सोबतच ऍप्पल ने 5G फोन सेग्मेंट मध्ये पण एंट्री केली आहे. काल लॉन्च झालेले ऍप्पलचे हे चारही फोन्स 5जीला सपोर्ट करतात. पुढे मी Apple iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

लुक व डिजाईन

Apple iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max कंपनीने मेटल यूनिबॉड डिजाईन वर सादर केले आहेत आणि याची बॉडी स्टेनलेश स्टीलची बनली आहे. फोनचा डिस्प्ले बेजल लेस आहे तसेच स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध रुंद नॉच देण्यात आली आहे. कंपनीने जुनी डिजाइन पुन्हा वापरली आहे. त्याचप्रमाणे फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चोकोनी आकाराचा आहे. बॅक पॅनल वरच मधोमध Apple चा लोगो आहे.

डिस्प्ले

iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max मध्ये मुख्य फरक स्क्रीन साइज आणि बॅटरीचा आहे. प्रो मॉडेल मध्ये 6.1 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. तर प्रो मॅक्स मध्ये 6.7 इंचाची स्क्रीन आहे. कंपनीने सेरॉमिक शिल्ड कर्व्ड डिस्प्लेचा वापर केला आहे.

iPhone 12 Pro मध्ये 2532 X 1170 पिक्सल रेजल्यूशन असलेला OLED डिस्प्ले पॅनल आहे आणि पिक्सल डेनसिटी 460 पीपीआई आहे. तसेच iPhone 12 Pro Max मध्ये पण पॅनल OLED आहे परंतु पिक्सल रेजल्यूशन 2778 X 1284 आहे आणि याची पिक्सल डेनसिटी 458 पीपीआई आहे. दोन्ही फोन्सची स्क्रीन 2,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 1200nits ब्राइटनेसला सपोर्ट करते.

फोटोग्राफी

Apple iPhone 12 Pro आणि Pro Max फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह फोनच्या बॅक पॅनल वर आहे. यात 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.6 अपर्चर सह येतो. हा सेंसर अल्ट्रावाइड अँगल लेंस आहे जी 26एमएम फोकल लेंथला सपोर्ट करते. नवीन आयफोनचा हा सेंसर OIS फीचर सह येतो.

तसेच दुसरा सेंसर एफ/2.0 अपर्चर सह येतो आणि हि 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आहे. फोनचा हा कॅमेरा सेंसर 52एमएम फोकल लेंथ सह 4एक्स डिजीटल जूमला सपोर्ट करतो. हि लेंस पण ओआईएस फीचर सह येते. तिसरा सेंसर पण 12 मेगापिक्सलचा आहे जो डेफ्थ सेंसिंगसाठी आहे.

पावरफुल प्रोसेसर

वर सांगितल्याप्रमाणे आयफोन 12 सीरीज ऍप्पलची पहली 5जी आयफोन सीरीज आहे. Apple iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max दोन्ही मध्ये 5जी सपोर्ट आहे. हे फोन्स 5 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बनलेल्या ऍप्पल बॉयोनिक ए14 चिपसेट वर चालतात. विशेष म्हणजे हा चिपसेट 16-कोर न्यूरल इंजन वर बनला आहे कंपनीचा दावा आहे कि हा परफॉर्मेंस 80 टक्क्यांपर्यंत बूस्ट करुस शकतो. ऍप्पलचा हा चिपसेट आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी सह येतो आणि AR tasks म्हणजे आग्यूमेंटेड रियालिटी संबंधित कामे फास्ट आणि लॅग फ्री पद्धतीने करतो. ऍप्पलने हा सुपर फास्ट, जास्त ऍडव्हान्स आणि आधीपेक्षा जास्त सिक्योर असल्याचे म्हटले आहे. तुम्हाला तर माहित आहे कंपनी कधीच रॅमची माहिती देत नाही. यावेळी पण कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

iOS 14

ऍप्पलने आपली iPhone 12 सीरीज लेटेस्ट आयओएस 14 सह बाजारात आणली आहे. हि नवीन ऑपरेटिंग सिस्टम आधीपेक्षा जास्त कस्टमाइजेशन फीचर्स सह रीडिजाइन केलेल्या होम स्क्रीन सह येते. iOS 14 मध्ये जुन्या टुडे व्यू सह, विजेट्स वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकारात होम स्क्रीन वर ऍड करता येतील. यूजर्ससाठी विजेट जोडण्यासाठी आणि कस्टमाइज करण्यासाठी एक नवीन “विजेट गॅलरी” आणि “स्मार्ट स्टॅक” विजेट आहे. नवीन ऍप लाइब्रेरी सोबतच सिक्योरिटी आणि ऍप मॅनेजमेंटचे शानदार फीचर्स पण आयओएस 14 मध्ये आहे.

वेरिएंट्स व किंमत

Apple iPhone 12 Pro भारतात तीन स्टोरेज वेरिएंट्स उपलब्ध होईल. 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,19,900 रुपये असेल तर 256 GB स्टोरेज वेरिएंट 1,29,900 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच 512 GB स्टोरेज वेरिएंटसाठी तुम्हाला 1,49,900 रुपये द्यावे लागतील.

Apple iPhone 12 Pro Max चे पण तीन वेरियंट आहेत. कंपनीने 128 GB, 256 GB आणि 512 GB चा ऑप्शन सादर केला आहे आणि यांची किंमत क्रमश: 1,29,900 रुपये 1,39,900 रुपये आणि 1,59,900 रुपये आहे.

6 नोव्हेंबर पासून यांची बुकिंग भारतात सुरु होईल आणि 13 नोव्हेंबर पासून हे फोन्स भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्स वीडियो

The post Apple का सर्वात पावरफुल फोन iPhone 12 Pro Max झाला लॉन्च, याच्या फीचर्सना देणार नाही कोणीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-pro-max-officially-launched-feature-specs-price/feed/ 0
जगातील सर्वात वेगवान 5G नेटवर्क सह लॉन्च झाला Apple iPhone 12 5G, जाणून घ्या या फोन बाबत सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-5g-launch-with-a14-a14-bionic-chip-know-price-detail/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-5g-launch-with-a14-a14-bionic-chip-know-price-detail/#respond Wed, 14 Oct 2020 12:58:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8509 या पोस्ट मध्ये iPhone 12 5G आणि iPhone 12 Mini 5G ची माहिती घेऊया. आयफोन 12 आणि आयफोन 12 मिनी मध्ये डिस्प्ले साइजचा फरक आहे.

The post जगातील सर्वात वेगवान 5G नेटवर्क सह लॉन्च झाला Apple iPhone 12 5G, जाणून घ्या या फोन बाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सर्व लीक आणि बातम्यांना पूर्णविराम देत Apple ने अखेरीस काल आपल्या स्पेशल इवेंट मध्ये iPhone 12 5G सीरीज सादर केली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने iPhone 12 5G, iPhone 12 Pro 5G, iPhone 12 Pro Max 5G आणि iPhone 12 Mini 5G सादर केले आहेत. या इवेंट दरम्यान नवीन iPhone 12 5G आणि iPhone 12 Mini blue, red, black, white आणि green कलर सादर केले गेले आहेत. सर्वात खास बाब अशी कि कंपनीचा दावा असा आहे कि हा जगातील सर्वात वेगवान 5जी फोन आहेत. iPhone 12 सीरीज सोबत Apple ने HomePod mini, AirPods Studio वायरलेस हेडफोन आणि MagSafe वायरलेस चार्जर पण लॉन्च केले आहेत.

आयफोन 12 आणि आयफोन 12 मिनी मध्ये डिस्प्ले सह एचडीआर 10 सपोर्ट आणि बॉडी प्रोटेक्शनसाठी सर्वात मजबूत ग्लासचा वापर झाला आहे. तसेच सर्व फोन वायरलेस चार्जिंग आणि डुअल सिमला सपोर्ट करतात. फोन मध्ये दुसरा सिम ई-सिम असेल. चला या पोस्ट मध्ये iPhone 12 5G आणि iPhone 12 Mini 5G ची माहिती घेऊया.

आयफोन 12 आणि आयफोन 12 मिनी मध्ये डिस्प्ले साइजचा फरक आहे. दोन्ही फोन्स मध्ये देण्यात आलेले सर्व फीचर्स एक सारखेच आहेत. इतकेच नव्हे तर iPhone 12 Mini जगातील सर्वात बारीक आणि छोटा 5जी स्मार्टफोन आहे. यात आयफोन 12 चे सर्व फीचर्स मिळतील. डुअल रियर कॅमेरा, नाइट मोड मिळेल.

डिस्प्ले

Apple iPhone 12 5G मध्ये 6.1-इंचाचा आणि iPhone 12 Mini 5G मध्ये 5.4-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोन मध्ये ऐज-टू-ऐज OLED Super Retina XDR डिस्प्ले 2,532 x 1,170p रिजोल्यूशन, 460ppi पिक्सल डेंसिटी, HDR 10, HLG HDR support, आणि फ्रंटला सुपर वाइड नॉच आहे. या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आणि फेस आइडी आहे. कंपनीने म्हटले आहे कि स्क्रीनला मजबूत करण्यासाठी सेरेमिक शील्डचा वापर केला गेला आहे. यामुळे आयफोन आधीपेक्षा जास्त ड्यूरेबल झाला आहे.

नवीन प्रोसेसर

दोन्ही फोन्स मध्ये अपग्रेडेड A14 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे जो ए13 चिपसेटच्या तुलनेत खूप वेगाने काम करेल. A14 मध्ये सीपीयू चा जवळपास 40 टक्के आणि GPU 50 टक्के भागावर असेल, त्यामुळे प्रोसेसरचा आकार 7nm वरून 5nm पर्यंत कमी होईल. आशा आहे कि A14 मुळे नवीन iPhone ची बॅटरी लाइफ चांगली होईल. या नवीन चिप मध्ये 11.8 बिलियन ट्रांजिस्टर आणि 40% वेगवान सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (सीपीयू) आहे. यात 30% फास्ट ग्राफिक्स पण आहेत आणि या 5-नॅनोमीटर मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रिया सह बनवण्यात आला आहे.

कॅमेरा

iPhone 12 5G आणि iPhone 12 Mini 5G मध्ये कंपनीने मागे चौकोनी कॅमेरा मॉड्यूल दिला आहे, ज्यात डुअल कॅमेरा आहे. या डुअल कॅमेरा मध्ये OIS, 120-डिग्री FoV, f / 1.8, 7 एलिमेंट लेंस आणि 2x ऑप्टिकल जूम सह डुअल 12MP सेंसर आहेत. फोनच्या फ्रंटला सेल्फी आणि वीडियो चॅटसाठी 12MP अपर्चर f / 2.2 ट्रू डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. कॅमेरा नवीन स्मार्ट मोड (फ्रंट कॅमेऱ्यासह), स्मार्ट एचडीआर 3, नाइट मोड आणि टाइम-लॅप्स सह येतो.

फास्ट चर्जिंग

दोन्ही फोन सह 50 वॉट पर्यंत वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. चांगल्या वायरलेस चार्जिंगसाठी आयफोन 12 मध्ये मॅगसेफ टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. एकाच चार्जरने आयफोन 12 आणि ऍप्पल वॉच चार्ज करता येईल. तसेच iPhone 12 सह USB-C केबल येईल. तसेच यात Lightning केबलचा वापर पण करता येईल.

किंमत

iPhone 12 आणि iPhone 12 mini तीन स्टोरेज वेरिएंट- 64GB, 128GB, आणि 256GB मध्ये सादर केला गेला आहे. iPhone 12 च्या 64GB वेरिएंटची किंमत 79,900 रुपये, 128GB वेरिएंटची किंमत 89,900 रुपये आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 99,900 रुपये आहे. तर iPhone 12 mini च्या 64GB वेरिएंटची किंमत 69,900 रुपये, 128GB वेरिएंटची किंमत 74,900 रुपये आणि 256GB वेरिएंटची किंमत 84,900 रुपये आहे. दोन्ही फोन blue, green, black, white आणि PRODUCT(RED) मध्ये येतात. फोन भारतात 30 ऑक्टोबर पासून मिळतील.

The post जगातील सर्वात वेगवान 5G नेटवर्क सह लॉन्च झाला Apple iPhone 12 5G, जाणून घ्या या फोन बाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-5g-launch-with-a14-a14-bionic-chip-know-price-detail/feed/ 0
13 ऑक्टोबरला होईल Apple चा स्पेशल इवेंट, iPhone 12 सीरीज करेल धमाकेदार एंट्री! https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-event-scheduled-for-october-13th-official/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-event-scheduled-for-october-13th-official/#respond Wed, 07 Oct 2020 13:20:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8422 13 ऑक्टोबरला iPhone 12 लॉन्च इवेंटची सुरवात भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरु होईल.

The post 13 ऑक्टोबरला होईल Apple चा स्पेशल इवेंट, iPhone 12 सीरीज करेल धमाकेदार एंट्री! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple या महिन्यात 13 ऑक्टोबरला आपला स्पेशल इवेंट आयोजित करणार आहे. त्यामुळे कंपनीने मीडिया इन्वाइट पाठवायला सुरवात केली आहे. Apple ने पाठवलेल्या इन्वाइट मध्ये Hi Speed लिहिण्यात आले आहे आणि वर Apple चा लोगो पण आहे. लोगो व्यतिरिक्त इन्वाइट पोस्टर मध्ये वेगवेगळ्या शेड्स आहेत, त्यात ऑरेंज हाईलाईट केला गेला आहे. आशा आहे कि या इवेंट मध्ये कंपनी आपली नवीन आणि बहुप्रतिक्षित iPhone 12 सीरीज सादर करेल. कंपनीने इवेंट मध्ये सादर केल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्सची माहिती दिली नाही.

भारतात यावेळी होईल इवेंट

13 ऑक्टोबरला iPhone 12 लॉन्च इवेंटची सुरवात भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरु होईल. कोरोनावायरसमुळे लॉन्च इवेंट वर्चुअल होईल. अलीकडेच Apple ने ऍप्पल वॉच टाइम फ्लाइस इवेंटचे आयोजन पण वर्चुअली केले होते.

4 मॉडेल होतील लॉन्च

यावर्षी Apple आपल्या नवीन iPhone 12 सीरीज मध्ये चार मॉडेल लॉन्च करू शकते, ज्या बाबत अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. या सर्व मॉडेल्सची स्क्रीन साइज वेगवेगळ्या असतील. iPhone 12 मध्ये 5.4-इंच डिस्प्ले, iPhone 12 Max आणि iPhone 12 Pro मध्ये 6.1-इंच डिस्प्ले आणि टॉप-एंड मॉडेल मध्ये म्हणजे iPhone 12 Pro Max मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले असू शकतो.

तसेच Apple चे विश्लेषक मिंग-ची कूओ यांनी म्हटले होते सर्व चार आयफोन्स 5G सह येतील, पण फक्त हाई एंड प्रो लेवल मॉडेलच फास्टेस्ट 5G स्पीड सह येईल. साल 2019 मध्ये ऍप्पलने तीन मॉडेल्स सादर केले होते, त्यात iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max चा समावेश होता.

किंमत

मीडिया रिपोर्टनुसार iPhone 12 ची किंमत $699 (जवळपास 51,200 रुपये) आणि 749 डॉलर (जवळपास 54,800 रुपये) दरम्यान असू शकते, iPhone 12 Max ची किंमत $ 799 (जवळपास 58,500 रुपये) आणि 849 डॉलर (जवळपास 62,200 रुपये) दरम्यान असू शकते.

iPhone 12 Pro ची किंमत $ 1,049 (जवळपास 76,800 रुपये) आणि $ 1,099 (जवळपास 80,500 रुपये) दरम्यान असू शकते आणि तर iPhone 12 Pro Max ची किंमत $ 1,149 (जवळपास 84,100 रुपये) ते $ 1,199 (जवळपास 87,800 रुपये) दरम्यान असू शकते.

The post 13 ऑक्टोबरला होईल Apple चा स्पेशल इवेंट, iPhone 12 सीरीज करेल धमाकेदार एंट्री! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-event-scheduled-for-october-13th-official/feed/ 0
6GB रॅम आणि A14 Bionic SoC सह Apple iPhone 12 Pro Max झाला वेबसाइट वर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-pro-max-spotted-on-antutu-benchmark-platform-with-a14-soc/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-pro-max-spotted-on-antutu-benchmark-platform-with-a14-soc/#respond Fri, 18 Sep 2020 13:23:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8225 iPhone 12 Pro Max कंपनीचा पहिला फोन असेल जो 6GB रॅम सह येईल.

The post 6GB रॅम आणि A14 Bionic SoC सह Apple iPhone 12 Pro Max झाला वेबसाइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक्नोलॉजी विश्वातील दिग्गज कंपनी ऍप्पल लवकरच आपली नवीन आयफोन 12 सीरीज सादर करणार आहे. कंपनीने या सीरीजच्या लॉन्च डेट बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. लीक्सनुसार या नवीन सीरीज मध्ये iPhone 12, iPhone 12 Max, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max सादर केला जाईल. आता आलेल्या रिपोर्टनुसार आयफोन 12 प्रो मॅक्स बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म AnTuTu वर दिसला आहे, जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. बेंचमार्किंग साइट वर स्कोर गेल्यावर्षीच्या iPhone 11 Pro Max पेक्षा जास्त आहे.

असे वाटत आहे कि iPhone 12 Pro Max कंपनीचा पहिला फोन असेल जो 6GB रॅम सह येईल. त्याचबरोबर फोन मध्ये 128GB इंटरनल स्टोरेज दिली जाईल. हि माहिती बेंचमार्किंग लिस्टिंग मध्ये समोर आली आहे. स्क्रीन शॉट मध्ये पण माहिती समोर आली आहे कि iPhone 12 Pro Max लेटेस्ट iOS 14.1 सॉफ्टवेयर सह येईल. 5nm A14 बायोनिक ए 13 बायोनिकच्या तुलनेत सीपीयू आणि जीपीयूचे प्रदर्शन दमदार असेल.

अलीकडेच एका विडियोच्या माध्यमातून आयफोन 12 प्रो बाबत माहिती समोर आली होती. विडियो मध्ये 6.1-इंचाच्या आयफोन 12 प्रो मॉडेलची चॅसी (Chassis) दाखवण्यात आली होती. फोनच्या चारही बाजूंना फ्लॅट साइड बेजल्स दिसत आहेत. तसेच मागे तीन रियर कॅमेऱ्यांसह LiDAR सेंसर पण दिसला होता.

किंमत

मीडिया रिपोर्टनुसार iPhone 12 ची किंमत $699 (जवळपास 51,200 रुपये) आणि 749 डॉलर (जवळपास 54,800 रुपये) दरम्यान असू शकते, iPhone 12 Max ची किंमत $ 799 (जवळपास 58,500 रुपये) आणि 849 डॉलर (जवळपास 62,200 रुपये) दरम्यान असू शकते.

iPhone 12 Pro ची किंमत $ 1,049 (जवळपास 76,800 रुपये) आणि $ 1,099 (जवळपास 80,500 रुपये) दरम्यान असू शकते आणि तर iPhone 12 Pro Max ची किंमत $ 1,149 (जवळपास 84,100 रुपये) ते $ 1,199 (जवळपास 87,800 रुपये) दरम्यान असू शकते.

The post 6GB रॅम आणि A14 Bionic SoC सह Apple iPhone 12 Pro Max झाला वेबसाइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-pro-max-spotted-on-antutu-benchmark-platform-with-a14-soc/feed/ 0
येत आहे ‘Made in india’ iPhone 12, पुढल्या वर्षी सुरु होईल मॅन्युफॅक्चरींग https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-made-in-india-2021-mid-month-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-made-in-india-2021-mid-month-launch-soon/#respond Thu, 20 Aug 2020 10:15:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7824 न्यूज वेबसाइट Business Standard च्या रिपोर्टनुसार अपकमिंग iPhone 12 भारतात बनवला जाईल.

The post येत आहे ‘Made in india’ iPhone 12, पुढल्या वर्षी सुरु होईल मॅन्युफॅक्चरींग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात ऍप्पल आईफोनच्या निर्मितीची माहिती अनेक वर्ष समोर येत आहे. सध्या अनेक असे आईफोनचे मॉडेल आहेत, जे भारतात असेंबल केले जात आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी कॉमर्स एंड इंडस्ट्री (वाणिज्य आणि उद्योग) मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले होते कि iPhone 11 ची निर्मती लवकरच भारतात सुरु होईल. आता अजून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमी नुसार Apple भारतात iPhone 12 स्थानिक पातळीवर बनवण्याची योजना बनवत आहे. अपकमिंग Apple iPhone 12 ची भारतात निर्मिती ऍप्पल पार्टनर विस्ट्रॉन द्वारे पुढच्यावर्षी सुरु केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

न्यूज वेबसाइट Business Standard च्या रिपोर्टनुसार अपकमिंग iPhone 12 भारतात बनवला जाईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि ऍप्पलची निर्माता कंपनी विस्ट्रॉन आपल्या बँगलोर प्लांट मध्ये नवीन आईफोन मॉडेलचे उत्पादन करेल. iPhone 12 सीरीज ऑक्टोबरच्या सुरवातीला सादर केली जाऊ शकते. नवीन मॉडेलच्या शिपमेंट मध्ये COVID-19 मुले काही आठवड्यांचा उशीर होऊ शकतो.

रिपोर्टनुसार, विस्ट्रॉन भारतात जवळपास 2,900 कोटी रुपये का निगुंतवणुकीची योजना बनवत आहे आणि यातून 10,000 लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. Wistron प्लांट मध्ये जवळपास 1,000 कर्मचारी आधीपासून काम करत आहेत. काही आठवड्यांपूर्वी एक दुसरा रिपोर्ट समोर आला होता, ज्यानुसार चेन्नई मधील फॉक्सकॉन प्लांट मध्ये स्थानिक स्थरावर ऍप्पल ने iPhone 11 असेंबल करण्यास सुरवात केली आहे. iPhone 11 नंतर Apple iPhone SE 2020 पण भारतातच बनवला जाईल. आईफोन 11 बनवण्याचा कॉन्ट्रेक्ट Foxconn ला देण्यात आला आहे तर नवीन आईफोन एसई 2020 ची निर्मिती Wistron कंपनी करेल. फॉक्सकॉनचा मान्यफॅक्चरिंग यूनिट चेन्नई जवळ आहे तर विस्ट्रॉनची मॅन्युफॅक्चरींग फॅक्टरी बँगलोर जवळ आहे. आईफोन एसई 2020 चा बेस वेरिएंट सध्या 42,500 रुपयांमध्ये विकला जात आहे आणि येत्या काही दिवसांत हि किंमत अजून कमी होईल.

55,000 नोकऱ्या

प्रसिद्ध अमेरिकन कंपनी Apple ने भारतात प्रोडक्शन सुरु केल्याने फक्त जगभरात ‘इंडिया’ निर्मित आईफोन व इतर प्रोडक्ट्स विकले जातील असे नाही तर या नवीन लाईन्समुळे देशात हजारो लोकांना नोकऱ्या मिळतील. मीडिया रिपोर्टनुसार ऍप्पलने जर चीन मधील आपले काम बंद करून ते भारतात सुरु केले तर देशात जवळपास 55,000 नवीन नोकऱ्या सुरु होतील आणि मोठ्या प्रमाणात भारतीयांना रोजगार मिळेल.

सोर्स

The post येत आहे ‘Made in india’ iPhone 12, पुढल्या वर्षी सुरु होईल मॅन्युफॅक्चरींग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-made-in-india-2021-mid-month-launch-soon/feed/ 0
या ‘खास’ डिजाइन सह येत आहे iPhone 12, लॉन्चच्या आधी बघा लुक https://www.91mobiles.com/marathi/iphone-12-design-copy-from-old-iphone-4-says-new-report/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-12-design-copy-from-old-iphone-4-says-new-report/#respond Wed, 19 Aug 2020 09:21:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7800 सीरीज अंतर्गत चार मॉडेल्स- iPhone 12, iPhone 12 Max, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max येतील.

The post या ‘खास’ डिजाइन सह येत आहे iPhone 12, लॉन्चच्या आधी बघा लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple iPhone 12 बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. आता पर्यंत या फोन बाबत अनेक लीक्स समोर आले आहेत. जर टिप्सटर Jon Prosser द्वारे देण्यात आलेल्या माहिती वर विश्वास ठेवला तर आईफोन 12 ची घोषणा ऑक्टबर मध्ये होऊ शकते. आता लॉन्च इवेंटच्या आधी आईफोन 12 च्या डिजाइन बाबत नवीन माहिती समोर आली आहे. अधिकृत लॉन्चच्या आधी आईफोन 12 च्या 5.4-inch, 6.1-inch, 6.7-inch मॉडेल व आईफोन 12 प्रो मॉडेलचे फोटो ऑनलाइन लीक झाले आहेत. हे फोटो केस मेकरने दिले आहेत जे 9to5Mac च्या एका रिपोर्ट मध्ये समोर आले आहेत.

या डमी यूनिट्स वरून फोनच्या डिजाइन बाबत बरीच माहिती मिळाली आहे. असे वाटते आहे कि Apple फ्लॅट-कडा असेलल्या डिजाइन सह आपले नवीन फोन सादर करण्याची योजना बनवत आहे. आईफोन 6 द्वारे कंपनी आपल्या फोन मध्ये कर्व्ड डिजाइन उपलब्ध करत आहे. रिपोर्टनुसार नवीन आईफोनची डिजाइन iPhone 4 सारखी असू शकते जो 10 वर्षांपूर्वी लॉन्च झाला होता. याआधी पण अनेक लीक्स मध्ये असा दावा केला गेला आहे.

लॉन्चला उशीर

यावेळी iPhone 12 मार्केट मध्ये येण्यास उशीर होऊ शकतो. आता पर्यंत समोर आलेल्या अनेक रिपोर्ट्सनुसार हा उशीर आईफोन प्रोडक्शनमुळे होत आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः कंपनीने कन्फर्म केले होते कि iPhone 12 सीरीज यावर्षी उशिरा येईल.

स्पेसिफिकेशन्स

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार आईफोन 12 मधील डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सह येईल. तसेच ऍप्पल आईफोन 12 मोठ्या बॅटरी सह सादर केला जाऊ शकतो. तसेच बेस मॉडेल मध्ये कंपनी 5.4 इंचाचा OLED डिस्प्ले, A14 चिपसेट, 5जी कनेक्टिविटी आणि ड्यूल-कॅमेरा सेटअप सारखे फीचर्स देऊ शकते.

चार मॉडेल होतील लॉन्च

वर सांगितल्याप्रमाणे समोर आलेल्या माहिती नुसार या सीरीज अंतर्गत चार मॉडेल्स- iPhone 12, iPhone 12 Max, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max येतील. हे मॉडेल्स 5.4 इंच, 6.1 इंच आणि 6.7 इंच मध्ये सादर केले जातील. तसेच एक वीडियो समोर आला होता, ज्यानुसार iPhone 12, iPhone 12 Max मध्ये डुअल कॅमेरा सेटअप आणि iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार असल्याचे सांगितले आहे.

The post या ‘खास’ डिजाइन सह येत आहे iPhone 12, लॉन्चच्या आधी बघा लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-12-design-copy-from-old-iphone-4-says-new-report/feed/ 0