Apple iPhone 12 ची खरी किंमत फक्त 30,300 रुपये! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

गेल्या वर्षी एका वर्चुअल इवेंटच्या माध्यमातून एॅप्पलने आपली सर्वात महाग सीरीज iPhone 12 सादर केली होती. या सीरीज मध्ये 4 नवीन फोन iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max आले होते. किंमतीसाठी नेहमीच चर्चेत असणार्‍या या फोन्सची किंमत पण लाखात होती. पण आता एक रिपोर्ट समोर आला आहे ज्यात iPhone 12 ची मटेरियल कॉस्ट iPhone 11 पेक्षा 21 टक्के जास्त आहे. याचा खुलासा काउंटरप्वाइंट रिसर्च फर्मने आपल्या एका रिपोर्ट मध्ये केला आहे. रिपोर्ट मध्ये Bill of Materials (BoM) च्या आधारावर सांगण्यात आले आहे की iPhone 12 128GB मॉडेल बनवण्याची किंमत $414 (जवळपास 30,300 रुपये) आहे, जो यूएस आणि भारतात 84,900 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर iPhone 12 मॉडेल फक्त $431 (जवळपास 31,500 रुपये) मध्ये बनतो.

iPhone 12 बनवण्यासाठी खर्च वाढण्यामागे 5G ची सुरवात आणि एलसीडी वरून OLED डिस्प्ले मध्ये झालेला बदल ही कारणे आहेत. तसेच Apple चे घटक जसे की A14 बायोनिक, PMIC, ऑडियो आणि UWB चिप BoM मधील 16.7 टक्के जागा घेतात. एलसीडी वरून OLED पॅनल मध्ये बदल केल्यामुळे $ 23 (जवळपास 1,600 रुपये) पेक्षा जास्त खर्च वाढला आहे.

रिपोर्टनुसार, सॅमसंग डिस्प्ले आणि एलजी डिस्प्लेला iPhone साठी जास्त पॅनल पुरवण्यास सांगण्यात आले आहे. 5G संबंधित कॉम्पोनेंट्स जसे की 5G मॉडेम, ट्रांसीवर आणि RF-फ्रंट-एंड सिस्टम एकत्रितपणे $ 34 (जवळपास 2,400 रुपये) यामुळे खर्च वाढतो. Apple ने TSMC चा 5nm प्रोसेस-संचालित अप्लिकेशन प्रोसेसरचा वापर केला आहे, ज्यांची किंमत $ 17 (जवळपास 1,200 रुपये) पेक्षा जास्त आहे.

डिस्प्ले कॉम्पोनेंट्स, ऑडियो आणि बॅटरीसाठी सप्लायर्ससाठी ब्रॉडकॉम, सिरस लॉजिक, एनएक्सपी, नोल्स, गोएर्टेक, एसटी, एएसई / यूएसआई, एएसी टेक्नोलॉजीज आणि टीआईचा समावेश आहे. काउंटरपॉइंटचा दावा आहे कि वाढलेल्या खर्च आटोक्यात आणण्यासाठी रॅम, स्टोरेज, कॅमेरा सबसिस्टम, फेस आईडी सारख्या कंपोनेंट्स वर खर्च कमी केला गेला आहे.

अॅप्पल आयफोन 12 विडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here