big battery phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Jul 2023 12:02:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7,000mAh Battery असलेला भारतातील पहिला स्मार्टफोन झाला लाँच; किंमत 9 हजारांपेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/7000mah-battery-smartphone-itel-p40-plus-launched-in-india-check-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/7000mah-battery-smartphone-itel-p40-plus-launched-in-india-check-price-specification/#respond Wed, 12 Jul 2023 12:02:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22356 लो बजेट सेग्मेंटमध्ये नवीन आणि मोठे फीचर्स घेऊन येणाऱ्या टेक ब्रँड आयटेलनं भारतात आणखी एक लेटेस्ट मोबाइल फोन itel P40+ लाँच केला आहे. आयटेल पी40 प्लस इंडियन मार्केटमधील पहिला स्मार्टफोन आहे जो 9 हजारांपेक्षा कमी किंमतीत 7,000एमएएचची बॅटरी देतो. ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे. itel P40+ ची किंमत आयटेल पी40+ कंपनीनं […]

The post 7,000mAh Battery असलेला भारतातील पहिला स्मार्टफोन झाला लाँच; किंमत 9 हजारांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा फोन फक्त 499 रुपयांमध्ये बुक करता येईल.
    • पहिला फोन आहे जो ह्या बजेटमध्ये 7,000एमएएचची बॅटरी देत आहे.
    • ह्यात 100 दिवसांपर्यंत वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट मिळते.

    लो बजेट सेग्मेंटमध्ये नवीन आणि मोठे फीचर्स घेऊन येणाऱ्या टेक ब्रँड आयटेलनं भारतात आणखी एक लेटेस्ट मोबाइल फोन itel P40+ लाँच केला आहे. आयटेल पी40 प्लस इंडियन मार्केटमधील पहिला स्मार्टफोन आहे जो 9 हजारांपेक्षा कमी किंमतीत 7,000एमएएचची बॅटरी देतो. ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

    itel P40+ ची किंमत

    आयटेल पी40+ कंपनीनं सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे ज्यात 4जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. itel P40+ फक्त 8,099 रुपयांमध्ये शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर Force Black आणि Ice Cyan कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. याची विक्री 14 जुलैपासून सुरु होईल जो 499 रुपयांमध्ये प्री-बुक केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे अ‍ॅमेझॉन इंडिया प्राइम डे सेल 2023 नंतर ह्याची किंमत वाढवली जाऊ शकते.

    itel P40+ स्पेसिफिकेशन्स

    स्क्रीन : आयटेल पी40 प्लस स्मार्टफोन 720 x 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो पंच-होल स्टाईलवर बनला आहे. ही आयपीएस स्क्रीन आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.

  • प्रोसेसर : itel P40+ अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो Unisoc T606 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ह्या फोनमध्ये 4जीबी वचुर्अल रॅम देण्यात आला आहे जो इंटरनल 4जीबी रॅमसह मिळून 8जीबी रॅमची ताकद देतो. फोनमध्ये 128जीबी स्टोरेज आहे.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात फ्लॅश लाईट असलेली 13 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी एआय लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी आयटेल पी40+ स्मार्टफोनमध्ये 7,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे. कंपनीनुसार हा मोबाइल 18 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देऊ शकतो.

The post 7,000mAh Battery असलेला भारतातील पहिला स्मार्टफोन झाला लाँच; किंमत 9 हजारांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/7000mah-battery-smartphone-itel-p40-plus-launched-in-india-check-price-specification/feed/ 0
Samsung Galaxy M31S ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-price-slashed-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-price-slashed-in-india/#respond Wed, 24 Feb 2021 15:41:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10162 Samsung Galaxy M31s कंपनीने अँड्रॉइड 10 वर सादर केला आहे जो सॅमसंग वनयूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे.

The post Samsung Galaxy M31S ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी लॉन्च झालेला Samsung Galaxy M31S मिड सेग्मेंट मध्ये खूप पॉप्युलर आहे आणि आज कंपनीने आपल्या एम सीरीज युजर्ससाठी खास भेट आणली आहे. कंपनीने Galaxy M31S च्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात केली आहे. खास बाब अशी आहे कि कंपनीने या फोनच्या दोन्ही मॉडेल 6 RAM रॅम आणि 8 GB RAM ची किंमत कमी केली आहे. किंमत कमी केल्यानंतर या फोन्सची किंमत क्रमशः 18,499 रुपये आणि 20,499 रुपये झाली आहे. आधी Samsung Galaxy M31S च्या 6 GB मॉडेलची किंमत 19,499 रुपये होती तर 8 GB रॅम मॉडेल 21,499 रुपयांमध्ये उपलब्ध होता. (samsung galaxy m31s price slashed in india)

आम्हाला हि माहिती ऑफलाइन रिटेल स्टोरच्या माध्यमातून मिळाली आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार या फोन्सच्या किंमतीत अधिकृतपणे कपात करण्यात आली आहे. हि लिमिटेड पिरियड ऑफर नाही. अर्थात हि कपात कायमस्वरूपी करण्यात आली आहे त्यामुळे आज पासून नवीन किंमत लागू होईल. सॅमसंगचा हा फोन चांगल्या कॅमेरा क्वालिटी आणि शानदार बॅटरी बॅकअपसाठी ओळखला जातो.

Samsung Galaxy M31S चे स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन बेजल लेस आहे जिच्यात वरच्या बाजूला मधोमध पंच-होल देण्यात आला आहे. सॅमसंगने या स्क्रीनला इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्लेचे नाव दिले आहे.

Samsung Galaxy M31s कंपनीने अँड्रॉइड 10 वर सादर केला आहे जो सॅमसंग वनयूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम31एस भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यातील बेस वेरिएंट 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरीएंट मध्ये 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M31s क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फोन बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M31s डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या उजव्या पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच फोन फेस अनलॉक फीचर सह येतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी हा सॅमसंग फोन 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Samsung Galaxy M31S ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-price-slashed-in-india/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा असलेला हा शानदार फोन, फक्त 9,999 रुपयांमध्ये 17 जूनला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-power-2-launching-on-17-june-in-india-with-6000mah-battery-price-rs-9999-sale-specs/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-power-2-launching-on-17-june-in-india-with-6000mah-battery-price-rs-9999-sale-specs/#respond Mon, 15 Jun 2020 09:29:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7398 Tecno Spark Power 2 स्मार्टफोन याच आठवड्यात 17 जूनला भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा असलेला हा शानदार फोन, फक्त 9,999 रुपयांमध्ये 17 जूनला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tecno ब्रँड बद्दल गेल्या आठवड्यात बातमी समोर आली होती कि कंपनी भारतात आपल्या ‘स्पार्क सीरीज’ अंतर्गत अजून एक नवीन स्मार्टफोन जोडण्याची योजना बनवत आहे जो या महिन्यात भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. तर आता टेक्नोने या फोनच्या नावासह लॉन्च डेट पण सांगितली आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि येत्या 17 जूनला टेक्नो ब्रँडचा नवीन आणि पावरफुल बॅटरी असलेला स्मार्टफोन Tecno Spark Power 2 भारतात लॉन्च केला जाईल.

Tecno Spark Power 2 स्मार्टफोन याच आठवड्यात 17 जूनला भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन कंपनीच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून टीज केला गेला आहे तसेच ई-कॉर्मस साइट फ्लिपकार्ट वर पण स्पार्क पावर 2 चे प्रोडक्ट पेज लाईव झाले आहे. कंपनीने सांगितले आहे कि Tecno Spark Power 2 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च केला जाईल आणि हा फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

अशी असेल पावर

टेक्नो स्पार्क पावर 2 ची किंमत 9,999 रुपयांपासून सुरु होईल. हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च होईल कि जास्त हे 17 जूनला दुपारी 12 नंतर समजेल. टीजरच्या माध्यमातून कंपनीने खुलासा केला आहे कि स्पार्क पावर 2 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल तसेच फोन मधील 6,000एमएएच ची बॅटरी सिंगल चार्ज मध्ये 4 दिवसांचा बॅकअप देऊ शकेल. तसेच 10 मिनिटांच्या चार्ज मध्ये हा फोन 3 तास चालेल.

फ्लिपकार्टच्या लिस्टिंगवरून समजले आहे कि Tecno Spark Power 2 वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर लॉन्च केला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबतच क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फ्लिपकार्ट वर हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये दिसेल. टेक्नो स्पार्क 2 च्या इतर स्पेसिफिकेशन्ससाठी आता 17 जूनची वाट बघितली जात आहे.

Tecno Spark 5

इंटरनेशनल मार्केट मध्ये अलीकडेच लॉन्च झालेल्या टेक्नो स्पार्क 5 बद्दल बोलायचे तर यात 6.6 इंचाच्या डिस्प्ले सह 90.2 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो देण्यात आला आहे. फोनचा पॅनल 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन सह येतो. कंपनीने हा डिवाइस पंच होल डिस्प्ले डिजाइन सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये कोणता ऑक्टा कोर चिपसेट आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. फोन मध्ये 2जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. स्मार्टफोन एंडरॉयड 10 सह HiOS 6.1 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Tecno Spark 5 बॅक मध्ये प्राइमरी सेंसर 13मेगापिक्सलचा आहे जो f/1.8 अपर्चर सह येतो. तसेच 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, जो ड्यूल LED फ्लॅश सह येतो. तसेच मागे फिंगरप्रिंट रीडर पण आहे. फोन मध्ये फेस अनलॉकचा पण ऑप्शन मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी आहे. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये 4G सह VoLTE आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे.

टेक्नो स्पार्क पावर वीडियो

The post 6,000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा असलेला हा शानदार फोन, फक्त 9,999 रुपयांमध्ये 17 जूनला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-power-2-launching-on-17-june-in-india-with-6000mah-battery-price-rs-9999-sale-specs/feed/ 0
6000एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि 64एमपी कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M31 लॉन्च, किंमत 14999 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-launched-price-sale-6000mah-battery-6gb-ram-full-specs/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-launched-price-sale-6000mah-battery-6gb-ram-full-specs/#respond Tue, 25 Feb 2020 13:33:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6669 Samsung Galaxy M31 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 6000एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि 64एमपी कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M31 लॉन्च, किंमत 14999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आज भारतात आपली ‘गॅलेक्सी एम सीरीज’ वाढवत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M31 लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मीड बजेट मध्ये आणला आहे जो पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा सारखे खास फीचर्स आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एम31 सोबतच सॅमसंगने मीड बजेट मध्ये प्रतिस्पर्धी ब्रँड्सना चांगली टक्कर दिली आहे. हा स्मार्टफोन 14,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च झाला आहे जो येत्या 5 मार्च पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा डिवाईस सॅमसंगच्या वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अमेझॉन वरून पण विकत घेता येईल.

Samsung Galaxy M31 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम मेमरी सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. गॅलेक्सी एम31 के 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटने 15,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन येत्या 5 मार्च पासून सॅमसंगच्या वेबसाइट सोबतच अमेझॉन इंडिया वर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy M31 बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा पूर्णपणे साईड पॅनल्सशी मिळतात तसेच खालच्या बाजूला थोडासा चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. रियर पॅनल बद्दल बोलायचे तर हा Samsung Galaxy M31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो वर उजविकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. फोनचा हा कॅमेरा सेटअप उलट्या L शेप मध्ये देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये चार सेंसर्स सह फ्लॅश लाईट आणि सेंसर डिटेल्स पण लिहिण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन इनफिनिटी ‘यू’ डिस्प्लेला सपोर्ट करतो तसेच या स्मार्टफोन मध्ये 6.4 इंचाची फुलएचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. सॅमसंगने गॅलेक्सी एम31 एंडरॉयड 10 वर लॉन्च केला आहे ज्या सोबत फोन मध्ये 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या थर्ड सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या चौथ्या सेंसरला सपोर्ट करेल. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी गॅलेक्सी एम31 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे

Samsung Galaxy M31 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये यूएसबी टाईपी सी पोर्ट सह 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

The post 6000एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि 64एमपी कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M31 लॉन्च, किंमत 14999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-launched-price-sale-6000mah-battery-6gb-ram-full-specs/feed/ 0
Vivo चा कारनामा : फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज होईल 4,000एमएएच बॅटरी असलेला फोन, सादर केली अशी जबरदस्त टेक्नॉलॉजी https://www.91mobiles.com/marathi/vivo-super-flash-charge-120w-announced-mwc-shanghai-phone-full-charge-under-13-minute/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-super-flash-charge-120w-announced-mwc-shanghai-phone-full-charge-under-13-minute/#respond Wed, 26 Jun 2019 11:28:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4664 हि टेक्नॉलॉजी कंपनीच्या एडप्टर आणि यूएसबी टाईप-सी केबल सोबतच चालते.

The post Vivo चा कारनामा : फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज होईल 4,000एमएएच बॅटरी असलेला फोन, सादर केली अशी जबरदस्त टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोनची टेक्नॉलॉजी सतत बदलत आहे. फोनचा डिस्प्ले, डिजाईन, कॅमेरा पासून पावरफुल स्पेसिफिकेशन्स आणि एडवांस फीचर्स सह स्मार्टफोन बाजारात येत आहेत. डिवाईसेजना पावर बॅकअप देण्यासाठी कंपन्या आपल्या स्मार्टफोन्स मध्ये 5,000एमएएच पर्यंतची बॅटरी देऊ लागले आहेत. मोठ्या बॅटरी सोबत फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचा सपोर्ट पण फोन मध्ये येऊ लागला आहे. पण आज टेक कंपनी Vivo ने या टेक्नॉलॉजीला नवीन रूप दिले आहे. Vivo ने खूप जबरदस्त टेक्नॉलॉजी आज जगासमोर सादर केली आहे ज्यामुळे स्मार्टफोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज केला जाईल.

Vivo ने शांघाई मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस ईवेंटच्या मंचावरून आपली हि नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च केली आहे. Vivo च्या या नवीन टेक्नॉलॉजीचे नाव आहे ‘Vivo Super FlashCharge 120W’. नावावरून समजलेच असली कि वीवो द्वारा सादर झालेली हि नवीन टेक्नॉलॉजी स्मार्टफोनची बॅटरी वेगाने चार्ज करू शकते. Vivo चा दावा आहे कि या टेक्नॉलॉजीमुळे 4,000एमएएच बॅटरी वाला स्मार्टफोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज केला जाऊ शकतो.

Vivo Super FlashCharge 120W बद्दल कंपनीने सांगितले आहे कि 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करणारा स्मार्टफोन या टेक्नॉलॉजी द्वारे फक्त 5 मिनिटांतच 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो. या एडवांस टेक्नॉलॉजी बद्दल बोलायचे तर Super FlashCharge नवीन चार्ज पंप टेक्नॉलॉजी द्वारे 120W (20V/6A) पर्यंतच्या स्पीडने फोन चार्ज करते. हि टेक्नॉलॉजी कंपनीच्या एडप्टर आणि यूएसबी टाईप-सी केबल सोबतच चालते. तसेच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) चार्जिंग दरम्यान विजेचा वॉल्ट कंट्रोल करून बॅलेंस करते.

विशेष म्हणजे Vivo येत्या 3 जुलैला भारतात आपला नवीन स्मार्टफोन Vivo Z1 Pro लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन देशात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. Vivo Z1 Pro भारतीय स्मार्टफोन बाजारात येणारा पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात क्वालकॉम 700 सीरीजचा स्नॅपड्रॅगॉन 712 AIE चिपसेट दिला जाईल.

Vivo Z1 Pro

Vivo Z1 Pro चे काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर ठेवत कंपनीने सांगितले आहे कि झेड सीरीजचा आगामी स्मार्टफोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलिजी असलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. तर दुसरीकडे Vivo Z1 Pro मध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल. फोन मधील बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला पण सपोर्ट करेल. भारतात लॉन्च होणार हा पहिला वीवो फोन आहे जो इन-डिस्प्ले कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या डिस्प्ले मधील होल मध्ये सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo Z1 Pro भारतात 32-मेगापिक्सलच्या सेेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल. रियर कॅमेरा सेटअप पाहता फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर मिळतील.

Vivo Z1 Pro ची डिजाईन पाहता हा भारतात लॉन्च होणार वीवोचा पहिला ऐसा स्मार्टफोन आहे ज्यात पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेव्हा वरच्या बाजूला छोटेसे छिद्र देण्यात आले आहे आणि याच छिद्रता सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात वर्टिकल शेप मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅशलाईट पण आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आले आहे व डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

The post Vivo चा कारनामा : फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज होईल 4,000एमएएच बॅटरी असलेला फोन, सादर केली अशी जबरदस्त टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-super-flash-charge-120w-announced-mwc-shanghai-phone-full-charge-under-13-minute/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी असलेले बेस्ट स्मार्टफोन, जे यावर्षी झाले आहेत भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/top-latest-smartphone-with-4000mah-and-more-battery-launched-in-india-2019-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/top-latest-smartphone-with-4000mah-and-more-battery-launched-in-india-2019-specifications-price/#respond Tue, 02 Apr 2019 17:32:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4001 पुढे आम्ही यावर्षी भारतात लॉन्च झालेल्या अशाच 5 बेस्ट स्मार्टफोन्सचा उल्लेख केला आहे जो 4,000एमएएच किंवा यापेक्षा जास्त बॅटरी सह येतात.

The post 4,000एमएएच बॅटरी असलेले बेस्ट स्मार्टफोन, जे यावर्षी झाले आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन वेळेसोबत ऍडव्हान्स होत आहेत. स्मार्टफोन्सचा डिस्प्ले मोठा झाला आहे तसेच बॉडी व बेजल्स छोटे. फोन मध्ये फिजिकल बटण कमी झाले आहेत तर कॅमेरा सेंसर वाढले आहेत. फोनचे डायमेंशन आणि वजन कमी होत आहे तर प्रोसेसर दमदार व पावरफुल. आज स्मार्टफोन यूजर्स कडे अनेक ऑप्शन्स आहेत ज्यामुळे ते पूर्णपणे खात्री करून आपल्यासाठी नवीन स्मार्टफोन निवडू शकतात. पण हे सर्व गोष्टी निरर्थक ठरतात जर फोनची बॅटरी चांगली नसेल.

फोनची बॅटरीच त्यात जीव ओतू शकते ज्यामुळे फोन चालतो. याचमुळे एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याआधी सामान्य माणूस फोनची बॅटरी आवर्जून बघतो कि ती किती एमएएच ची आहे म्हणजे किती दमदार आहे. जर तुम्ही पण एखादा नवीन फोन विकत घेऊ इच्छित असाल ज्याची बॅटरी पावरफुल असावी, तर पुढे आम्ही यावर्षी भारतात लॉन्च झालेल्या अशाच 5 बेस्ट स्मार्टफोन्सचा उल्लेख केला आहे जो 4,000एमएएच किंवा यापेक्षा जास्त बॅटरी सह येतात.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो
शाओमी ने गेल्याच महिन्यात देशात आपली रेडमी नोट सीरीज वाढवत दोन नवीन फोन रेडमी नोट 7 आणि नोट 7 प्रो लॉन्च केले होते. हे दोंन्ही स्मार्टफोन 4,000एमएमएच बॅटरी सह येतात. हे दोन्ही स्मार्टफोन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी ने सुसज्ज आहेत ज्यामुळे काही मिनिटांतच फोनची बॅटरी 50 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज होते. रेडमी नोट 7 प्रो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो तर रेडमी नोट 7 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे.

किंमत पाहता रेडमी नोट 7 चा 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपये तर 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तसेच 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए50
गॅलेक्सी ए50 पण सॅमसंग द्वारा 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. भारतात गॅलेक्सी ए50 चा 4जीबी रॅम / 64जीबी मेमरी वेरिएंट 19,990 रुपये तर 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट 22,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन इनफिनिटी यू डिस्प्ले वर लॉन्च हुआ आहे ज्यात 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट ने सुसज्ज ​​आहे. एंडरॉयड पाई सह गॅलेक्सी ए50 एक्सनॉस 9610 चिपसेट वर चालतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच 8-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी गॅलेक्सी ए50 मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. गॅलेक्सी ए50 ब्लॅक, वाईट, ब्लू आणि कोलर लाईट कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

ओपो एफ11
ओपो ने पण अलीकडेच दोन नवीन स्मार्टफोन मॉडेल एफ11 आणि एफ11 प्रो भारतात लॉन्च केले आहेत. ओपो एफ11 प्रो मध्ये वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे तसेच ओपो एफ11 4,020एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. ओपो एफ11 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर ओपो एफ11 प्रो ची किंमत 24,990 रुपये आहे. विशेष म्हणजे ओपो एफ11 प्रो पॉप-अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो तर ओपो एफ11 मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हा फोन मीडियाटेक के हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो.

स्पेसिफिकेशन्स पाहता ओपो एफ11 प्रो 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वर लॉन्च केला गेला आहे तर ओपो एफ11 4जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हे दोन्ही मॉडेल 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. फोटोग्राफी साठी ओपो एफ11 प्रो मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रियलमी 3
रियलमी ने पण गेल्या महिन्यात इंडियन मार्केट मध्ये नवीन स्मार्टफोन रियलमी 3 लॉन्च केला आहे. हा फोन 4,230 एमएएच च्या बॅटरी सह सादर केला गेला आहे तसेच रियलमी 3 5वॉल्ट वाल्या 2 ऍम्पीयरच्या चार्जर सह येतो. रियलमी 3 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स पाहता ​रियलमी 3 मध्ये 6.2-इंचाचा ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. हा फोन कलर ओएस 6.0 आधारित एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे जो मीडियाटेक हेलियो पी70 चिपसेट वर चालतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तर 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल सिम, 4जी वोएलटीई व फिंगरप्रिंट सारखे फीचर्स आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एम20
मोठी बॅटरी असलेल्या फोन्सचा विषय सुरु असेल तर सॅमसंगचा गॅलेक्सी एम20 मागे ठेऊन चालणार नाही. हा फोन भारतात उपलब्द असलेल्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स पैकी एक आहे जो 5,000एमएएच बॅटरी आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सह फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 5,000एमएएच ची बॅटरी दिली आहे. गॅलेक्सी एम20 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 10,990 रुपये आणि 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम20 मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह एक्सनॉस 7904 वर चालतो. गॅलेक्सी एम20 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी वाईड एंगल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम20 डुअल सिम सह 4जी ला सपोर्ट करतो तसेच सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे.

The post 4,000एमएएच बॅटरी असलेले बेस्ट स्मार्टफोन, जे यावर्षी झाले आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-latest-smartphone-with-4000mah-and-more-battery-launched-in-india-2019-specifications-price/feed/ 0
4,500एमएएच बॅटरी आणि 13-एमपी कॅमेरा सह लॉन्च झाला एलजी एक्स5 (2018) https://www.91mobiles.com/marathi/lg-x5-2018-launched-with-4500mah-battery-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-x5-2018-launched-with-4500mah-battery-feature-specifications-in-marathi/#respond Tue, 19 Jun 2018 07:05:58 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=952 एलजी ने आपल्या या फोन मध्ये दोन्ही कॅमेरा सेटअप सोबत एलईडी फ्लॅश दिला आहे.

The post 4,500एमएएच बॅटरी आणि 13-एमपी कॅमेरा सह लॉन्च झाला एलजी एक्स5 (2018) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी एलजी ने आज आपल्या स्मार्टफोन्स मध्ये अजून एक डिवाईस जोडला आहे. एलजी ने एक्स5 (2018) स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कपंनी ने सध्या हा फोन आपल्या होम मार्केट साउथ कोरिया मध्ये लॉन्च केला आहे तिथे याची किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 22,800 रुपये ठेवण्यात आली आहे. आगामी दिवसांमध्ये एलजी हा स्मार्टफोन इतर बाजारांमध्ये पण लॉन्च करू शकते.

एलजी एक्स5 (2018) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ट्रेंड मध्ये असलेल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.5-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित आहे तसेच 1.5गीगाहर्ट्ज 64बिट आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6750 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने हा फोन 2जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. एलजी ने आपल्या या फोन मध्ये दोन्ही कॅमेरा सेटअप सोबत एलईडी फ्लॅश दिला आहे.

एलजी एक्स5 (2018) डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. एनएफसी तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. एलजी ने हा फोन दक्षिण कोरियन टेलीकॉम कंपनी सोबत बंडल आॅफर मध्ये सादर केला आहे. एलजी एक्स5 (2018) च्या भारत लॉन्च बद्दल सध्या तरी काहीच बोलता येणार नाही.

The post 4,500एमएएच बॅटरी आणि 13-एमपी कॅमेरा सह लॉन्च झाला एलजी एक्स5 (2018) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-x5-2018-launched-with-4500mah-battery-feature-specifications-in-marathi/feed/ 0