Vivo चा कारनामा : फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज होईल 4,000एमएएच बॅटरी असलेला फोन, सादर केली अशी जबरदस्त टेक्नॉलॉजी

स्मार्टफोनची टेक्नॉलॉजी सतत बदलत आहे. फोनचा डिस्प्ले, डिजाईन, कॅमेरा पासून पावरफुल स्पेसिफिकेशन्स आणि एडवांस फीचर्स सह स्मार्टफोन बाजारात येत आहेत. डिवाईसेजना पावर बॅकअप देण्यासाठी कंपन्या आपल्या स्मार्टफोन्स मध्ये 5,000एमएएच पर्यंतची बॅटरी देऊ लागले आहेत. मोठ्या बॅटरी सोबत फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचा सपोर्ट पण फोन मध्ये येऊ लागला आहे. पण आज टेक कंपनी Vivo ने या टेक्नॉलॉजीला नवीन रूप दिले आहे. Vivo ने खूप जबरदस्त टेक्नॉलॉजी आज जगासमोर सादर केली आहे ज्यामुळे स्मार्टफोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज केला जाईल.

Vivo ने शांघाई मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस ईवेंटच्या मंचावरून आपली हि नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च केली आहे. Vivo च्या या नवीन टेक्नॉलॉजीचे नाव आहे ‘Vivo Super FlashCharge 120W’. नावावरून समजलेच असली कि वीवो द्वारा सादर झालेली हि नवीन टेक्नॉलॉजी स्मार्टफोनची बॅटरी वेगाने चार्ज करू शकते. Vivo चा दावा आहे कि या टेक्नॉलॉजीमुळे 4,000एमएएच बॅटरी वाला स्मार्टफोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज केला जाऊ शकतो.

Vivo Super FlashCharge 120W बद्दल कंपनीने सांगितले आहे कि 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करणारा स्मार्टफोन या टेक्नॉलॉजी द्वारे फक्त 5 मिनिटांतच 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो. या एडवांस टेक्नॉलॉजी बद्दल बोलायचे तर Super FlashCharge नवीन चार्ज पंप टेक्नॉलॉजी द्वारे 120W (20V/6A) पर्यंतच्या स्पीडने फोन चार्ज करते. हि टेक्नॉलॉजी कंपनीच्या एडप्टर आणि यूएसबी टाईप-सी केबल सोबतच चालते. तसेच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) चार्जिंग दरम्यान विजेचा वॉल्ट कंट्रोल करून बॅलेंस करते.

विशेष म्हणजे Vivo येत्या 3 जुलैला भारतात आपला नवीन स्मार्टफोन Vivo Z1 Pro लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन देशात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. Vivo Z1 Pro भारतीय स्मार्टफोन बाजारात येणारा पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात क्वालकॉम 700 सीरीजचा स्नॅपड्रॅगॉन 712 AIE चिपसेट दिला जाईल.

Vivo Z1 Pro

Vivo Z1 Pro चे काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर ठेवत कंपनीने सांगितले आहे कि झेड सीरीजचा आगामी स्मार्टफोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलिजी असलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. तर दुसरीकडे Vivo Z1 Pro मध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल. फोन मधील बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला पण सपोर्ट करेल. भारतात लॉन्च होणार हा पहिला वीवो फोन आहे जो इन-डिस्प्ले कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या डिस्प्ले मधील होल मध्ये सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo Z1 Pro भारतात 32-मेगापिक्सलच्या सेेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल. रियर कॅमेरा सेटअप पाहता फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर मिळतील.

Vivo Z1 Pro ची डिजाईन पाहता हा भारतात लॉन्च होणार वीवोचा पहिला ऐसा स्मार्टफोन आहे ज्यात पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेव्हा वरच्या बाजूला छोटेसे छिद्र देण्यात आले आहे आणि याच छिद्रता सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात वर्टिकल शेप मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅशलाईट पण आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आले आहे व डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here