Samsung Galaxy M31S ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

गेल्यावर्षी लॉन्च झालेला Samsung Galaxy M31S मिड सेग्मेंट मध्ये खूप पॉप्युलर आहे आणि आज कंपनीने आपल्या एम सीरीज युजर्ससाठी खास भेट आणली आहे. कंपनीने Galaxy M31S च्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात केली आहे. खास बाब अशी आहे कि कंपनीने या फोनच्या दोन्ही मॉडेल 6 RAM रॅम आणि 8 GB RAM ची किंमत कमी केली आहे. किंमत कमी केल्यानंतर या फोन्सची किंमत क्रमशः 18,499 रुपये आणि 20,499 रुपये झाली आहे. आधी Samsung Galaxy M31S च्या 6 GB मॉडेलची किंमत 19,499 रुपये होती तर 8 GB रॅम मॉडेल 21,499 रुपयांमध्ये उपलब्ध होता. (samsung galaxy m31s price slashed in india)

आम्हाला हि माहिती ऑफलाइन रिटेल स्टोरच्या माध्यमातून मिळाली आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार या फोन्सच्या किंमतीत अधिकृतपणे कपात करण्यात आली आहे. हि लिमिटेड पिरियड ऑफर नाही. अर्थात हि कपात कायमस्वरूपी करण्यात आली आहे त्यामुळे आज पासून नवीन किंमत लागू होईल. सॅमसंगचा हा फोन चांगल्या कॅमेरा क्वालिटी आणि शानदार बॅटरी बॅकअपसाठी ओळखला जातो.

Samsung Galaxy M31S चे स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन बेजल लेस आहे जिच्यात वरच्या बाजूला मधोमध पंच-होल देण्यात आला आहे. सॅमसंगने या स्क्रीनला इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्लेचे नाव दिले आहे.

Samsung Galaxy M31s कंपनीने अँड्रॉइड 10 वर सादर केला आहे जो सॅमसंग वनयूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम31एस भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यातील बेस वेरिएंट 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरीएंट मध्ये 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M31s क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फोन बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M31s डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या उजव्या पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच फोन फेस अनलॉक फीचर सह येतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी हा सॅमसंग फोन 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here