6,000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा असलेला हा शानदार फोन, फक्त 9,999 रुपयांमध्ये 17 जूनला होईल लॉन्च

Tecno ब्रँड बद्दल गेल्या आठवड्यात बातमी समोर आली होती कि कंपनी भारतात आपल्या ‘स्पार्क सीरीज’ अंतर्गत अजून एक नवीन स्मार्टफोन जोडण्याची योजना बनवत आहे जो या महिन्यात भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. तर आता टेक्नोने या फोनच्या नावासह लॉन्च डेट पण सांगितली आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि येत्या 17 जूनला टेक्नो ब्रँडचा नवीन आणि पावरफुल बॅटरी असलेला स्मार्टफोन Tecno Spark Power 2 भारतात लॉन्च केला जाईल.

Tecno Spark Power 2 स्मार्टफोन याच आठवड्यात 17 जूनला भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन कंपनीच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून टीज केला गेला आहे तसेच ई-कॉर्मस साइट फ्लिपकार्ट वर पण स्पार्क पावर 2 चे प्रोडक्ट पेज लाईव झाले आहे. कंपनीने सांगितले आहे कि Tecno Spark Power 2 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च केला जाईल आणि हा फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

अशी असेल पावर

टेक्नो स्पार्क पावर 2 ची किंमत 9,999 रुपयांपासून सुरु होईल. हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च होईल कि जास्त हे 17 जूनला दुपारी 12 नंतर समजेल. टीजरच्या माध्यमातून कंपनीने खुलासा केला आहे कि स्पार्क पावर 2 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल तसेच फोन मधील 6,000एमएएच ची बॅटरी सिंगल चार्ज मध्ये 4 दिवसांचा बॅकअप देऊ शकेल. तसेच 10 मिनिटांच्या चार्ज मध्ये हा फोन 3 तास चालेल.

फ्लिपकार्टच्या लिस्टिंगवरून समजले आहे कि Tecno Spark Power 2 वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर लॉन्च केला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबतच क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फ्लिपकार्ट वर हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये दिसेल. टेक्नो स्पार्क 2 च्या इतर स्पेसिफिकेशन्ससाठी आता 17 जूनची वाट बघितली जात आहे.

Tecno Spark 5

इंटरनेशनल मार्केट मध्ये अलीकडेच लॉन्च झालेल्या टेक्नो स्पार्क 5 बद्दल बोलायचे तर यात 6.6 इंचाच्या डिस्प्ले सह 90.2 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो देण्यात आला आहे. फोनचा पॅनल 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन सह येतो. कंपनीने हा डिवाइस पंच होल डिस्प्ले डिजाइन सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये कोणता ऑक्टा कोर चिपसेट आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. फोन मध्ये 2जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. स्मार्टफोन एंडरॉयड 10 सह HiOS 6.1 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Tecno Spark 5 बॅक मध्ये प्राइमरी सेंसर 13मेगापिक्सलचा आहे जो f/1.8 अपर्चर सह येतो. तसेच 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, जो ड्यूल LED फ्लॅश सह येतो. तसेच मागे फिंगरप्रिंट रीडर पण आहे. फोन मध्ये फेस अनलॉकचा पण ऑप्शन मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी आहे. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये 4G सह VoLTE आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे.

टेक्नो स्पार्क पावर वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here