EV in India - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 22 Nov 2022 09:27:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Matter Energy ने सादर केली गियर बॉक्स असलेली पहिली इलेक्ट्रिक बाइक; जोडीला वॉटरप्रूफ बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/matter-energy-introduced-the-first-electric-bike-with-a-gear-box/ https://www.91mobiles.com/marathi/matter-energy-introduced-the-first-electric-bike-with-a-gear-box/#respond Tue, 22 Nov 2022 09:27:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15224 Matter Energy नं भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. ही पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे, ज्यात गियरबॉक्स देण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये कंपनीनं 4 स्पीड गियरबॉक्स दिला आहे. तसेच यात ABS सिस्टम देखील देण्यात आली आहे. तसेच लिक्विड कूलिंग सिस्टम, 5.0 kWh ची बॅटरी देखील आहे. Matter Energy चा दावा आहे की ही […]

The post Matter Energy ने सादर केली गियर बॉक्स असलेली पहिली इलेक्ट्रिक बाइक; जोडीला वॉटरप्रूफ बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Matter Energy नं भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. ही पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे, ज्यात गियरबॉक्स देण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये कंपनीनं 4 स्पीड गियरबॉक्स दिला आहे. तसेच यात ABS सिस्टम देखील देण्यात आली आहे. तसेच लिक्विड कूलिंग सिस्टम, 5.0 kWh ची बॅटरी देखील आहे. Matter Energy चा दावा आहे की ही इलेक्ट्रिक बाइक सिंगल चार्जमध्ये 125 किमी ते 150 किमीची रेंज ऑफर करते.

Matter Energy electric bike: बॅटरी, मोटर आणि पावरट्रेन डिटेल्स

Matter Energy इलेक्ट्रिक बाइकमध्ये IP67-रेटेड लिक्विड कूल, 5.0 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे जी घरातली रेग्युलर 5A हाउसहोल्ड सॉकेटद्वारे चार्ज करता येते. ही बाइक फक्त 5 तासांमध्ये फुल चार्ज होते. या बाइकमध्ये 10.5kW ची मोटर देण्यात आली आहे जी रियर व्हील मध्ये 520Nm चा टॉर्क जनरेट करते. या बाइकमध्ये तीन मोड मिळतील. ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे ज्यात पारंपरिक गियरबॉक्स देण्यात आला आहे, ज्यात 4 स्पीड यूनिट मिळतात. तसेच यात ड्युअल चॅनेल ABS सिस्टम आहे. हे देखील वाचा: दगडासारखा मजबूत मोबाइल फोन! झेलू शकतो आग आणि पाण्याचा मारा, बॅटरी टिकेल 1150 तास!

Matter Energy electric bike: फीचर्स

Matter ची इलेक्ट्रिक बाइक फीचर पॅक टू व्हीलर व्हेईकल आहे, ज्यात 7 इंचाचा टच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे जो निवेगेशन, नोटिफिकेशन अलर्ट आणि म्यूजिक प्लेबॅक डिस्प्ले करतो. तसेच ऑल कंट्रोल बटन आणि हँडलबार माउंटेड स्विचगेयर देखील मिळतात. या इलेक्ट्रिक बाइकला वेळोवेळी सॉप्टवेयर अपडेट देण्याचा शब्द देखील कंपनीनं दिला आहे.

Matter e-bike मध्ये की-लेस ऑपरेशन फीचर देण्यात आलं आहे. तसे ऑनबोर्ड चार्जर आणि 5 लीटरचा ग्लव्हबॉक्स टँक देण्यात आला आहे. ही बाइक अ‍ॅपच्या माध्यमातून पण कनेक्ट करता येते, ज्यात युजर्स थेफ्ट डिटेक्शन, चार्जिंग प्रसेंटेज, राइड स्टेट्स अशी माहिती मिळवूं शकतात. या बाइकमध्ये पार्किंग असिस्ट देखील देण्यात आला आहे.

Matter Energy electric bike: डिजाइन आणि व्हेरिएंट

Matter Energy इलेक्ट्रिक बाइकची डिजाइन पाहता ही नेकेड स्ट्रीटफाइटर लुकसह येते. या बाइकमध्ये LED लाइट आणि ऑटो कॅन्सलिंग इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. तसेच स्प्लिट सीट देखील आहेत. ही बाइक ग्रे, नियॉन, ब्लू आणि गोल्ड, ब्लॅक आणि गोल्ड आणि रेड, व्हाइट, ब्लॅक अशा चार कलर ऑप्शनमध्ये येते. हे देखील वाचा: Airtel ने लाँच केला 155 रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लॅन! स्वस्तात मिळणार डेटा, कॉलिंग आणि एसएमएसही

Matter Energy electric bike: इंडिया लाँच आणि प्राइस

Matter Energy च्या या इलेक्ट्रिक बाइकची बुकिंग 2023 च्या पहिला तिमाहीत सुरु होईल. कंपनीनं अजूनतरी किंमतीची घोषणा केली नाही. मॅटर एनर्जी इलेक्ट्रिक बाइकची विक्री एप्रिल 2023 मध्ये सुरु होईल. ही बाइक तीन व्हेरिएंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Matter Energy ने सादर केली गियर बॉक्स असलेली पहिली इलेक्ट्रिक बाइक; जोडीला वॉटरप्रूफ बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/matter-energy-introduced-the-first-electric-bike-with-a-gear-box/feed/ 0
Battery Swapping म्हणजे काय? या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार Electric Vehicle ची किंमत https://www.91mobiles.com/marathi/what-is-battery-swapping-policy-know-the-benefit-electric-vehicle-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/what-is-battery-swapping-policy-know-the-benefit-electric-vehicle-in-india/#respond Sun, 23 Oct 2022 04:23:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14249 Electric Vehicle जेव्हा भारतात नवीन होते तेव्हा हे चालणार नाहीत, असा दावा लोक करत होते. काहींच्या मते यांचा पिक-अप चांगला नाही तर काहींना या वाहनांवर काडीमात्र विश्वास नव्हता. परंतु आता लोकांना इलेक्ट्रिक व्हेईकल्स आवडू लागेल आहेत. परंतु एक समस्या आहे की सध्या Electric Car, Electric Scooter आणि Electric Bike च्या किंमती भारतात थोड्या जास्त आहेत […]

The post Battery Swapping म्हणजे काय? या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार Electric Vehicle ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Electric Vehicle जेव्हा भारतात नवीन होते तेव्हा हे चालणार नाहीत, असा दावा लोक करत होते. काहींच्या मते यांचा पिक-अप चांगला नाही तर काहींना या वाहनांवर काडीमात्र विश्वास नव्हता. परंतु आता लोकांना इलेक्ट्रिक व्हेईकल्स आवडू लागेल आहेत. परंतु एक समस्या आहे की सध्या Electric Car, Electric Scooter आणि Electric Bike च्या किंमती भारतात थोड्या जास्त आहेत आणि त्यामुळे सामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. परंतु येत्या काही महिन्यांमध्ये देशात इलेक्ट्रिक व्हेईकल्सचं मार्केट बदलणार आहे. विजेवर चालणाऱ्या या वाहनांची किंमत कमी होईल आणि याला Battery Swapping Policy कारणीभूत असेल.

Battery Swapping Policy

नावावरून समजलं असेल की बॅटरी स्वॅपिंग म्हणजे बॅटरीची अदलाबदल. समजा तुमच्या इलेक्ट्रिक कारची बॅटरी डाउन झाली आहे, आता ही चार्ज करण्यासाठी 5-6 तास लागू शकतात. परंतु तुमच्याकडे तितका वेळ नाही. अशावेळी तुम्ही चार्जिंग स्टेशनवर जाल तुमची डिस्चार्ज बॅटरी तिथे ठेवाल आणि त्याबदल्यात दुसरी फुल्ली चार्ज बॅटरी घेऊन याल. हेच आहे बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी मध्ये. म्हणजे युजरला बॅटरी चार्ज करण्याची गरज नाही आता डिस्चार्ज बॅटरी देऊन त्याबदल्यात फुल्ली चार्ज्ड बॅटरी घेता येईल. हे तुमच्या गॅस सिलेंडर सारखं आहे जो संपला की तुम्ही रिकामा सिलेंडर देऊन भरलेला घेता. हे देखील वाचा: How to port SIM: नंबर तोच ठेवून मोफत मिळवा 5G सिम, जाणून घ्या सिम पोर्ट करण्याची सोपी पद्धत

वरील माहिती वाचून समजलं असेल की बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी म्हणजे काय. परंतु गॅस सिलेंडर असलेलं उदाहरण वाचून असं समजू नका की प्रत्येक चार्ज बॅटरीसाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील, असं होणार नाही. डिस्चार्ज बॅटरी देऊन चार्ज बॅटरी घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार नाही. इथे जास्तीत जास्त तेवढेच पैसे घेतले जातील जितकं चार्जिंग दरम्यान पावर कंजप्शन होतं. आणि येत्या काळात वेगवेगळे चार्जिंग स्टेशन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सब्सक्रिप्शन पॅक देखील विकू शकतात.

युजरला होईल फायदा

Battery Swapping Policy मुळे इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या किंमती कमी होतील तर बॅटरी स्वॅपिंगची ही प्रक्रिया ग्राहकांना उपयुक्त ठरेल. प्रवासात युजर एक एक्स्ट्रा बॅटरी फुल चार्ज करून वाहनात ठेऊ शकतात ज्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होण्याची भीती आणि तासंतास चार्जिंग स्टेशनवर उभं राहण्याचं झंझट संपेल. जे काम मोबाइल फोनसाठी पावरबँक करते तोच बॅटरी स्वॅपिंगमुळे इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल. चार्जिंग कनेक्शन उपलब्ध नसल्यास पावर डाउन होण्याची भीती कमी होईल आणि बॅटरी डिस्चार्ज होण्याचं टेंशन राहणार नाही.

कोरियामध्ये कशी होते बॅटरी स्वॅपिंग पाहा :-

ATM सारखे असतील बॅटरी स्वॅपिंग सेंटर

पाश्चात्य देश अशाप्रकारच्या पॉलिसीवर आधीपासून काम करत आहेत. जवळपास प्रत्येक 5 किलोमीटरवर एक बॅटरी स्वॅपिंग सेंटर मिळू शकतं. अशा सेंटर्ससाठी मोठ्या सेटअपची गरज नाही. बॅटरी स्वॅपिंग मशीन एखाद्या एटीएम मशीन प्रमाणे असेल जिथे 8 ते 10 चार्ज्ड बॅटरीज ठेवल्या जातील. कोणताही युजर टोकन वैगरे घेऊन त्या मशीनमधून चार्ज्ड बॅटरी काढू शकेल आणि खाली झालेल्या स्लॉटमध्ये आपली डिस्चार्ज बॅटरी ठेऊ शकेल. तसेच डिस्चार्ज बॅटरी मशीनमध्ये जाताच चार्ज होण्यास सुरु होईल. हे देखील वाचा: टेलिकॉम क्षेत्रानंतर आता लॅपटॉप सेगमेंटची बारी; Reliance च्या स्वस्त लॅपटॉप JioBook ची विक्री सुरु

बॅटरी स्वॅपिंगचा फायदा

बॅटरी स्वॅपिंगसाठी Electric Vehicle मधील बॅटरी सहज काढता येणं आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे दोन बॅटरीज असणं देखील आवश्यक आहे जेणेकरून एक फुल चार्ज्ड बॅटरी वाहनात राहील आणि दूसरी डिस्चार्ज बॅटरी बाहेर चार्जिंगवर लावता येईल. देशात बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी लागू होताच बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल्सचा वेगळा पार्ट बनेल. बॅटरी वेगळी झाल्यामुळे इलेक्ट्रिक वाहन बनवणारे ब्रँड्स फक्त व्हेईकलचं प्रोडक्शन करतील त्यामुळे वाहनाच्या प्रोडक्शन कॉस्टमध्ये बॅटरीची कॉस्ट नसेल. याचा अर्थ असा की इलेक्ट्रिक व्हेईकलच्या किंमती कमी होतील. यासाठी आम्ही स्मार्टफोन ब्रँड्सचं उदाहरण घेऊ शकतो जे आपले मोबाइल फोन्स वेगळे बनवतात तसेच ईयरफोन व इअरबड्स फोन बॉक्समध्ये न देता वेगळे विकतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Battery Swapping म्हणजे काय? या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार Electric Vehicle ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/what-is-battery-swapping-policy-know-the-benefit-electric-vehicle-in-india/feed/ 0