Airtel ने लाँच केला 155 रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लॅन! स्वस्तात मिळणार डेटा, कॉलिंग आणि एसएमएसही

Bharti Airtel नं कमी किंमतीत प्रीपेड प्लॅन्सच्या यादीत अजून एक नवीन मोबाइल रिचार्ज प्लॅन जोडला आहे. नवीन एयरटेल प्रीपेड प्लॅन 155 रुपयांमध्ये लाँच झाला आहे जो महिनाभराचा इंटरनेट डेटा, व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देतो. 155 रुपयांच्या Airtel prepaid plan देशातील अनेक सर्कल्समध्ये उपलब्ध करण्यात आला आहे तसेच एयरटेल सिम युजर आपल्या मोबाइल नंबरला हा रिचार्ज करू शकतात. पुढे आम्ही या नवीन एयरटेल प्लॅन (Airtel Plan) ची संपूर्ण माहिती दिली आहे.

Airtel 155 Plan

एयरटेलचा नवीन 155 रुपयांचा रिचार्ज प्लॅन एक प्रीपेड प्लॅन आहे जो सध्या काही निवडक सर्कल्समध्ये उपलब्ध झाला आहे. कंपनीनं हा प्लॅन आपल्या अधिकृत वेबसाइटवर देखील लिस्ट केला आहे. हा एयरटेल प्लॅन 24 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. 155 रुपयांच्या एयरटेल रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 1 जीबी इंटरनेट डेटा दिला जात आहे जो जवळपास संपूर्ण महिनाभरा म्हणजे 24 दिवस पर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहतो. हे देखील वाचा: तयार व्हा! येतोय नवा फ्लॅगशिप कीलर OnePlus Ace 2; 16GB RAM आणि 100W चार्जिंगसह सर्वात पावरफुल प्रोसेसर

1GB 4G Data कोणत्याही डेली लिमिटविना येतो आणि एयरटेल युजर प्लॅनच्या संपूर्ण वॅलिडिटीमध्ये कधीही हा डेटा वापरू शकतात. इंटरनेट व्यतिरिक्त या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 300 एसएमएस दिले जात आहेत. हे एसएमएस देखील कोणत्याही डेली लिमिटविना येतात आणि एयरटेल युजर 24 दिवसांपर्यंत कधीही हे एसएमएस वापरू शकतात. हे एसएमएस संपूर्ण देशात कधीही मोफत पाठवता येतात.

व्हॉइस कॉलिंग पाहता Airtel 155 plan मध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देते. या प्लॅनमध्ये प्रीपेड युजर्सना फ्री कॉलिंग दिली जाते जिचा वापर संपूर्ण महिनाभर व्हॅलिडिटी संपेपर्यंत केला जाऊ शकतो. हे व्हॉइस कॉल ऑन-नेटवर्क तसेच ऑफ-नेटवर्क दोन्हीवर मोफत मिळतील तसेच रोमिंग दरम्यान देखील मोफत राहतात. एयरटेलनं प्लॅनमध्ये मोफत हेलोट्यून्स आणि फ्री विंक म्यूजिक सब्सक्रिप्शन देखील दिलं आहे. हे देखील वाचा: 128GB मेमरी आणि 6GB रॅम असलेल्या रेडमी 5G फोनवर जबराट डिस्काउंट; दीर्घकाळ टिकणारी बॅटरी

Airtel 199 Plan

मार्केटमध्ये आधीपासून एयरटेलचा 199 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे, या प्रीपेड प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 3जीबी डेटा मिळतो. हा प्लॅन 30 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो तसेच संपूर्ण महिनाभर 3जीबी डेटाचा वापर कोणत्याही डेली लिमिटविना करता येतो. या प्लॅनमध्ये देखील 300एसएमएस मिळतात तसेच एयरटेल युजर्सना महिनाभर फ्री अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळते. दोन्ही प्लॅन्समध्ये फरक हाच आहे की 155 च्या प्लॅनमध्ये कमी वॉलिडिटी आणि डेटा मिळतो परंतु अन्य बेनिफिट्स सारखेच आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here